Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/22 07:08:53.713621 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / कमी खर्चाचे बंधारे
शेअर करा

T3 2019/05/22 07:08:53.718586 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/22 07:08:53.746902 GMT+0530

कमी खर्चाचे बंधारे

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा बंधारा विकसित केला आहे.

कोकण विजय बंधारा


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा बंधारा विकसित केला आहे. नालापात्रात उपलब्ध असलेल्या दगडांचा वापर करून कोकण विजय बंधारा बांधता येतो; त्यासाठी कुशल कारागिरांची गरज भासत नाही. बंधारा बांधल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूस म्हणजेच पाण्याकडील बाजूस प्लॅस्टिक अस्तरित केल्यास दगडांच्या पोकळ्यांतून होणारी पाण्याची गळती कमी करता येते. ज्या नाल्यावर बंधारा बांधावयाचा आहे, त्याचा उतार तीन टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावा. बंधाऱ्याच्या खालच्या व वरच्या बाजूस नाला सरळ असावा. नाल्यास सुस्पष्ट काठ असावेत. नाल्याची उंची एक ते दोन मीटर असावी. लोकसहभागातून अशा प्रकारचे बंधारे साखळी पद्धतीने बांधल्यास प्रभावीपणे जलसंधारण करता येईल.

फायदे

1) नाल्यातून वाहून जाणाऱ्या मातीची धूप थांबते.

2) पाणी अडविलेल्या जलसाठ्याचा वापर रब्बी पिकास सिंचनासाठी करता येतो.

3) भूगर्भात पाण्याचे पुनर्भरण होऊन परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते.

4) दुबार पिकांखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल.

वनराई बंधारा


वनराई बंधारा हा एक कच्च्या बंधाऱ्याचा प्रकार आहे. हे बंधारे नदी-ओहोळांवर बांधले जातात. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन हा बंधारा घातला जातो. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरून, पिशव्या शिवून बंधाऱ्यासाठी वापरल्या जातात.

नदीपात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहास आडव्या अशा रीतीने सांधेमोड पद्धतीने पिशव्या रचल्या जातात. वनराई बंधाऱ्याच्या बांधणीसाठी जागेची निवड हा महत्त्वाचा भाग आहे. प्रथम नालापात्राची पाहणी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जलसाठा करणे शक्‍य होईल, अशी जागा निवडावी. नालापात्र अरुंद व खोल असावे, जेणेकरून साठवणक्षमता पुरेशी होईल. नालापात्राचा उतार तीन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावा.

नालापात्रास स्पष्ट काठ असणे जरुरीचे आहे. वनराई बंधाऱ्यासाठी निवडलेली जागा वळणालगतची असू नये. गावोगावी श्रमदानातून अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात वनराई बंधारे बांधून जलसाठे निर्माण करता येतील.


संपर्क - 02358- 280558 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

स्त्रोत: अग्रोवन

3.02857142857
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/22 07:08:54.119072 GMT+0530

T24 2019/05/22 07:08:54.125508 GMT+0530
Back to top

T12019/05/22 07:08:53.606573 GMT+0530

T612019/05/22 07:08:53.625732 GMT+0530

T622019/05/22 07:08:53.702585 GMT+0530

T632019/05/22 07:08:53.703498 GMT+0530