Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 08:36:55.682119 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / कूपनलिका पुनर्भरण
शेअर करा

T3 2019/10/14 08:36:55.686917 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 08:36:55.712846 GMT+0530

कूपनलिका पुनर्भरण

पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.

पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा.

खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें.मी. अंतरावर सर्व बाजूने चार-पाच मि.लि. व्यासाची छिद्रे पाडावीत. 
या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी.

खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.

अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल. 
कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः 5,000 रुपये एवढा खर्च येतो. 

विहीर व कूपनलिका पुनर्भरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी


ओढ्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे. 
विहिरी पाणी तळापर्यंत पाइपद्वारे पोचवावे. 
पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खड्डे असावेत. 
पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा. 
पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे. 
ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरू नये. 
औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरू नये. 
साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरली जाते, त्या भागातील पाणी वापरू नये. 
सूक्ष्म जिवाणूजन्य तथा रोगराईस्थित क्षेत्रातील पाणी वापरू नये. 
वाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेली गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी. 

कूपनलिका पुनर्भरणासाठी लागणारे साहित्य


लोखंडी ड्रील (चार-पाच मि.मी.) काथ्या, गाळणी, धुतलेली वाळू, वाळूची चाळ, खडी आणि दगडगोटे. 

: 02426 - 243268/ 243326 
भूजल संशोधन प्रकल्प, 
जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

3.00909090909
Chandrashekhar Banda Jun 12, 2016 10:54 PM

घरगुती बोअरवेल पुनर्भरण कसे करावे पूर्ण साहित्य निशी डिटेल्स सांगा

अंशुमन वाणे Jun 06, 2016 11:38 AM

घरगुती बोअरवेल पुनर्भरण कसे करावे याचे घरगुती व सोपे उपाय सांगावे ...

सचिन दीक्षित Feb 12, 2015 11:53 AM

घरगुति कुपनालिका पुनर्भरण कसे करावे त्यविषयी माहिती द्यावी

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 08:36:56.972694 GMT+0530

T24 2019/10/14 08:36:56.979190 GMT+0530
Back to top

T12019/10/14 08:36:55.579841 GMT+0530

T612019/10/14 08:36:55.599007 GMT+0530

T622019/10/14 08:36:55.671497 GMT+0530

T632019/10/14 08:36:55.672425 GMT+0530