Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:41:11.574761 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / चार्‍यासाठी वन्य गवते
शेअर करा

T3 2019/10/14 06:41:11.579303 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:41:11.604398 GMT+0530

चार्‍यासाठी वन्य गवते

भारतातील सुपरिचित वन्य गवतांपैकी हे एक गवत आहे. मैदानी प्रदेशात व 910 मीटर उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागात हे बहुवर्षायू गवत आढळते.

मारवेल

 

भारतातील सुपरिचित वन्य गवतांपैकी हे एक गवत आहे. मैदानी प्रदेशात व 910 मीटर  उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागात हे बहुवर्षायू गवत आढळते. द‘खनच्या पठारावर जवळजवळ सर्वत्र पवना गवताबरोबर मारवेल आढळते. उत्तर भारतात प्रकारच्या कुरणात ही सर्वात महत्त्वाची तृणजाती आहे; कुरणाचा विकास सर्वोच्च पातळीवर होतो तेव्हा मारवेल गवत त्यात प्रामु‘याने दिसते. कर्नाटकात बेल्लारी येथील कुरण विकासाच्या सर्वोच्च पातळीवर आहे. हे मारवेल व मोशी या दोन तृणजाती दाखवतात. मारवेल गवत हे उघड्या माळरानावर तसेच सागाच्या कोरड्या जंगलातील विरळ सावलीत दिसते. हे गवत उभे व झुपकेदार असते. त्याचे खोड पेरेदार व बारीक असते. चरण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागात गवत आडवे वाढते आणि प्रत्येक पेरापासून मुळे फुटतात. दमट ओलसर जागेत हे चांगले वाढते. पूर्ण वाढलेल्या गवताची उंची 1.2 मीटर पर्यंत असते. खोडे जांभळट लाल किंवा निळसर असून पेरांवर पांढरट केसांचे स्पष्ट वलय असते. पाने साधी, 23-45 सें.मी. लांब,अरुंद आणि निळसर हिरव्या रंगाची पाने असून पानाची मध्यशीर पिवळसर असते. याचा फुलोरा संयुक्त मंजिरी प्रकारचा व जांभळट असतो. तुसांवर खाचा नसणे हे या जातीचे वैशिष्ट्य आहे. मारवेल गवत विविध प्र‘कारच्या जमिनीवर वाढते. तथापि उत्तम निचर्‍याची दमट जमीन याला चांगली मानवते. कमी पावसाच्या प्रदेशातील सखल भाग या गवताच्या लागवडीच्या दृष्टीने चांगला असतो. याला बरीचशी लवणयुक्त, खारी जमीन चालते पण आम्ल जमिनीवर गवत वाढत नाही. क्षारयुक्त जमिनीवर याच्याबरोबर हे गवत आढळते. मारवेलची मुळे भुसभुशीत जमिनीत 3 फुटांपर्यंत खोल जातात. त्यामुळे गवत अवर्षण सहन करते. आसपास अल्पकाळ पुराचे पाणी राहिले तरी चालते. या गवताचे बी गोळा करणे अवघड व खर्चाचे असल्याने लागवड साधारणपणे ठोंब लावून करतात. दोन ओळींत व दोन ठोेंबांत 60ु 60 सेंटीमीटर अंतर ठेवून पावसाच्या सुरुवातीस गवताचे ठोेंब लावतात. फ?क्त पावसाच्या पाण्यावरसुद्धा या गवताचे भरपूर उत्पादन येते. मारवेल गवत जून ते नोव्हेंबरपर्यंत वाढते. ते नोव्हेंबरमध्ये वैरणीसाठी कापतात. हे गवत खताला चांगला प्रतिसाद देते. एका वर्षात 3-4 कापण्या करून हेक्टरी सुारे 706 क्विंटल गवताचे उत्पादन झाल्याची नोंद आहे. मारवेल गवताचा उपयोग वैरणीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. गवत खाण्यास चवदार आहे. ह्यात प्रथिने कमी असली तरी जनावरांना फार आवडते. वैरणीच्या दृष्टीने ओला हिरवा चारा, वैरण, चराऊ रान या सर्व दृष्टीने हे एक उत्तम गवत आहे. मेंढ्यांना हे फारसे आवडत नाही पण गाई-गुरे, म्हशी,घोड्यांना हे विशेष मानवते. याच्यापासून मुरघास तयार करता येते. ओल्या गवतात 66%

पाणी,2.2% प्रथिने,11.6% तंतू व 3.7 % खनिजे असतात. वाळलेल्या गवतात 35.2 % तंतू, 3.1% प्रथिने व 10% खनिजे असतात. यात कॅल्शिअम,फॉस्फरस व पोटॅशिअमचे प्रमाण अनुक‘मे 0.44%, 0.14% आणि 1% एवढे असते. महाराष्ट्रात लागवडीसाठी मारवेल 8 या प्रजातीची शिफारस केली आहे. धूप थांबवण्यासाठी हे गवत चांगले आहे. गुजरातमध्ये घळ्यातून घातलेले बांध स्थिर करण्यासाठी इतर गवतांबरोबर मारवेल गवत लावले आहे. याची मुळे जमिनीत खोल जातात व हे जमिनीवर आडवे पसरते. त्यामुळे 200 पर्यंत उतार असलेल्या जागी जमीन झाकण्यास मारवेल उपयोगी पडते. फिलीपाईन्समध्ये कुरणाचे पुनरुज्जीवन करण्यास याचा उपयोग केला आहे. राजस्थानच्या वाळवंटी भागातील या गवताच्या कुरणात प्रती हेक्टरी 7 मेंढ्या पोसता येतात. पवना, शेडा पवना हे मध्यम उंचीचे, बहुवर्षायू,झुपकेदार गवत आहे. कमी ते मध्यम पावसाच्या प्रदेशात मध्यम काळ्या जमिनीवर वाढताना दिसते. याचा वर्षायू प्रकार कमी पावसाच्या प्रदेशात मध्यम काळ्या जमिनीवर आढळतो. याचा उपयोगही बहुवर्षायु प्रकाराप्रमाणे केला जातो. हे गवत 30 सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते. गवत 250 ते 1375 मि.मी.पावसाच्या प्रदेशात दिसते. 1000 मि.मी.पावसाच्या प्रदेशात गवताची वाढ उत्तम होते. पवना गवत कोकणात

आढळत नाही. हे गवत खडकाळ टेकड्यांवर किंवा उघड्यावर झाडांच्या विरळ सावलीत वाढते. भारताशिवाय मध्यपूर्व आफि‘का, सुदान,आग्नेय आशिया,ऑस्ट्रेलियात पवना गवत आढळते. समुद्रसपाटीपासून 2750 मी.उंचीपर्यंत हे गवत वाढताना दिसते.हे गवत अवर्षणाचे कोरडे महिने चांगले सहन करते आणि उन्हाळ्यात लागणार्‍या वणव्यांना तोंड देते. हे गवत वाळूमिश्रित गाळाच्या 6.5 सामू (झक)असलेल्या जमिनीवर चांगले वाढते पण याची उत्तम वाढ काळ्या जमिनीवर होते. काळ्या जमिनीत जशी ओल वाढते तशी उत्पादनात वाढ होते. नैसर्गिक कुरणात खताशिवाय वाढते. पण नत्र व फॉस्फरसयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देते. नत्र जास्त दिल्याने

प्रथिनात वाढ होते. पण उत्पादनात वाढ होत नाही. लागवडीअगोदर जमीन चांगली नांगरून घेतात. प्रती हेक्टरी 15 ते 16 कि. बी फेकून लावतात. गवताची कापणी 15 सें.मी. उंचीवर करतात. 60 दिवसांच्या अंतराने कापल्यास वैरणीच्या उत्पादनात वाढ होते. पवना मारवेल मिश्रण भारतात फार महत्त्वाचे आहे. पवना हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या वैरणीच्या गवतांपैकी एक आहे. कुरणासाठी हे उत्तम गवत आहे. या गवतात गुरांना चरू देता येते. हे गवत अतिशय चवदार गवत आहे. हिरवा चारा व वैरण म्हणून गवत चांगले समजले जाते. फुले येतात तेव्हा गवत कापून हिरवा चारा जनावरांना देणे उत्तम. हिरवा चारा,वैरण, मुरघास या तिन्ही प्रकारे पवना गवताचा उपयोग करून देता येतो. खते दिल्याने वैरणीचे उत्पादन प्रती हेक्टरी 4126 कि.हून 7561 कि.पर्यंत वाढले.

 

 

मुसेल , मोशी

 

हे बहुवर्षीय गवत 15 ते 50 सें.मी.उंच वाढते. याची धावती मुळे 105 सें.मी.पर्यंत खोल जातात. पण त्यांचे बरेचसे कार्य 38 सें.मी.च्या पातळीवर चालते. हे गवत समुद्रसपाटीपासून 760 मीटर उंचीपर्यंत 500 ते 1375 मि.मी.पावसाच्या प्रदेशात आढळते. खोलगट जागी जिथे पाणी वर्षातील 2-4 महिने साठून राहते तिथे मोशी गवत उगवते. या गवताला मध्यम ते मऊ बारीक कण असलेली गाळाची माती मानवते. जमिनीचा सामू (झश्रीं) 6:1 ते 7:4 असावा. भारी काळ्या जमिनीवर पाणथळ जागी गवत आढळते. जमिनीत काही प्रमाणात क्षार असले तरी चालते. लागवड करण्याअगोदर जमीन चांगली नांगरून घेतात. प्रती हेक्टरी 4.5 ते 6.7 कि. बियाणे लागते. मोशी गवत पहिल्या दर्जाच्या चांगल्या गवतांपैकी एक आहे. जनावरांना गवत आवडते. आंध‘ प्रदेशातील ओंगोल जातीच्या बैलांचे हे मु‘य खाद्य आहे. या गवताला चांगली किंमत येत असल्याने भाताऐवजी शेतजमिनीवर लावतात. मुंबईच्या बाजारात चांगला भाव मिळतो. गुरांना या गवतावर चरू देता येते. पण गवत बहुधा चार्‍यासाठी कापले जाते. याची वैरण मोठ्या प्रमाणात केली जाते. अंजन,धामण हे गवत भारतातील अतिरुक्ष, अतिउष्ण,विषम हवामानाच्या प्रदेशात आढळते. हे बहुवर्षायू गवत मध्यम ते काळ्या जमिनीवर 20’ ते 30’ पर्जन्यमान असलेल्या भागात जोाने वाढते. गाळाच्या जमिनीवर आणि तांबड्या मातीवरही गवत चांगले वाढते. मातीचा सामू (हि) 5.5 ते 7 असावा लागतो. दूर्वा व ब्ल्यु बन्सीशी तुलना करता या गवताला क्षार तितके सहन होत नाही. भारी चिकण मातीवर गवत वाढत नाही. अंजन गवत काटक असून त्यांची मुळे जमिनीत खोल जातात. त्यामुळे ते अवर्षणाला चांगले तोंड देते आणि गुरांनी तुडवले तरी ते टिकून राहते. पावसाळ्यात सुरुवातीस किंवा पाणी देण्याची सोय असल्यास थोडे आधी

बी पेरतात. एका किलोत 450000 ते 703000 बिया असतात. ताजे बी लावण्यापेक्षा 3 ते 12 महिन्यांचे बी लावणे चांगले. अंजन गवत, र्‍होडस् गवताबरोबर किंवा णीेलहश्रेर ोीरालळ लशपीळी बरोबर लावता येते. तसेच याच्याबरोबर लसूण घासाच्या वर्षायू जाती लावता येतात. कुरणात लावण्यास हे गवत चांगले आहे. गवत चांगले वाढले की जनावरांना बर्‍याच प्रमाणात चरू दिले तरी चालते. एकदा लावल्यानंतर 3-4 वर्षांपर्यंत कापणी करता येते. पाऊस चांगला असल्यास 20 दिवसांनी आणि कमी पावसाच्या वर्षात 30 दिवसांच्या अंतराने 17 सेंटिमीटरच्या वर गवत कापले असता राजस्थानमध्ये कमाल उत्पादन मिळाले. गवत लावल्यानंतर सुरुवातीस 60 दिवसांच्या अंतराने कापले असता 2010 किलो प्रती हेक्टर उत्पन्न एका वर्षात मिळाले. याला फु ले येऊ लागली की लगेच कापले असता प्रत्येक कापणीबरोबर प्रती हेक्टरी 2500 किलो वैरण मिळाली. जमीन कडक झाल्यास पावसाळ्यानंतर व उन्हाळ्यात नांगरल्यास उत्पन्नात वाढ होते. वैरणीत 6 ते 10 % प्रथिने असतात. बी काढून घेतल्यावर जून गवत, अवर्षणाच्या काळात खाण्यासाठी वैरण म्हणून वापरता येते. अंजन गवताचा मुरघास करता येतो आणि हिवाळ्यात गुरांना देता येतो. कोवळे गवत खाण्यास अतिशय चांगले असते. परंतु वाढीच्या सर्व काळात जनावरे हे गवत खाऊ शकतात. पावसाळ्यात कोवळे लुसलुशीत गवत अधिक प्रमाणात खाल्ल्याने घोड्यांना विषबाधा होऊ शकते. त्यासाठी गवताबरोबर दुसरा पूरक आहार देणे आवश्यक आहे. बियांसाठी लावलेल्या क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यास वसंत ऋतूच्या शेवटी व उन्हाळ्याच्या सुरुवातीस गुरांना चरू देता येते त्यानंतर क्षेत्र बंद करून ठेवतात. सर्व वाढ एकसारखी व्हावी म्हणून एका पातळीवर कापणी करतात. बी पिकल्यावर 14 ते 20 दिवस राहते. पाऊस चांगला असल्यास तीनदा बी गोळा करता येते. एका हेक्टरमधून 10 ते 60 किलो स्वच्छ बी एका वर्षात मिळते. 2 ते 32 वर्षे बी चांगल्या स्थितीत राहते. रुक्ष व अर्धरुक्ष प्रदेशात मातीची धूप थांबवण्यास हे गवत लावता येईल. धामण हे बहुवर्षायू गवत 60 सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते. हे गवत उष्ण हवामान व अवर्षण सहन करू शकते आणि रुक्ष,अर्धरुक्ष प्रदेशात येऊ शकते. वर्षात 200 मि.मी.पेक्षा कमी पाऊस असलेल्या प्रदेशातही हे गवत वाढते अंजन गवतापेक्षा अवर्षणाचा जास्त चांगला प्रतिकार करते आणि अंजन गवतापेक्षा जास्त प्रकारच्या जमिनीवर येऊ शकते. रेताड, भुसभुशीत जमिनीवर गवत चांगले वाढते. अल्कली असलेल्या जमिनीवरही गवत दिसते. कमी पावसाच्या प्रदेशात कुरणासाठी लावण्यास हे योग्य गवत आहे. बी 2 सेंटिमीटरपेक्षा खोल पेरू नये. बहुतेक वेळा बी पृष्ठभागावर पेरून त्यावर मातीचा किंवा पालापाचोळ्याचा पातळ थर पसरतात. पाऊस सुरू होण्याअगोदर प्रति हेक्टरी 1.5 ते 3 किलो बी पेरतात. एका किलोत 350000 बिया असतात. धामण गवत स्टायलोबरोबर वाढते, पण स्टायलोपेक्षा जास्त आक‘मक आहे. गवत एकदा प्रस्थापित झाले की, नंतर चरण्याने फारसा प्रतिकूल परिणाम होत नाही. गवताची दाटी वाढण्यासाठी दर 2 किंवा 3 वर्षांनी बी तयार होऊ द्यावे. वणव्याने वरचे गवत जळाले तरी पावसाळ्यात परत फुटते. मात्र उन्हाळ्यात वणवा लागू नये म्हणून काळजी घेणे जरूरीचे आहे. दहा दिवसांच्या अंतराने गवत कापले असता प्रती हेक्टरी 400 किलो आणि 60 दिवसांच्या अंतराने कापले असता 2120 किलो कोरडी वैरण मिळाली. धामण या गवताची वैरण करता येते पण उत्पन्न फार जास्त मिळत नाही. गवत अतिशय काटक असल्याने व कमी पावसाच्या प‘देशात वाढत असल्यामुळे त्या भागात तातडीच्या काळात खाद्य म्हणून महत्त्वाचे आहे. गुरे गवत आवडीने खातात. पावसाच्या अगदी हलक्या सरी आल्या तरी गवत वाढते आणि 8 आठवड्यांत भरपूर बिया येऊन पक्व होतात. बी हाताने गोळा करता येते. राजस्थानच्या वाळवंटी भागात 2॥ हेक्टरवरील या गवतावर एक मेंढी पोसता येते. कोरड्या व निमकोरड्या प्रदेशातील हे मोलाचे गवत असून मातीची धूप थांबवण्यासाठी काही प्रमाणात उपयोगी आहे.

 

 

हरळी, दूर्वा

 

हरळी हे सगळीकडे विपुल प्रमाणात आढळणारे गवत आहे. हे 90 सेंटीमीटरपर्यंत उंच वाढते. याची खोडे जमिनीत आडवी पसरतात व त्यांना ठिकठिकाणी खालच्या बाजूने मुळे व वरच्या बाजूस पाने फुटतात. 625 ते 1750 मिलिमीटर पाऊस असलेल्या प्रदेशात हरळी येऊ शकते. हे गवत अवर्षण व पुराला चांगले तोंड देते. हरळी कोणत्याही जमिनीवर येऊ शकते. पण गुरांनी फार तुडवले तर गवताला इजा पोहोचते. अवर्षण फार काळ टिकले तर गवत जळते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका या देशांधून गुरेढोरे व घोड्यांसाठी गवत पौष्टिक समजले जाते. अमेरिकेत याला वर्म्युडा ग‘ास म्हणतात. तिथे दक्षिणेकडील लुइझियाना, टेक्सास व इतर राज्यात फार पूर्वीपासून कुरणांसाठी मु‘यत: याच गवताची लागवड केलेली आहे. गुरांचे मोठाले कळप हरळीवरच चरतात. गुरे, ससे, मेंढ्यांना गवत आवडते व मानवते. गवताच्या ठोंबाचे तुकडे लावून किंवा बी फोकून लागवड करता येते. प्रति हेक्टरी 9 ते 12 किलो बी लागते. एका किलोत 4,489000 बिया असतात. गवत एकदा प‘स्थापित झाले की जोाने वाढते. हरळीला विरळ सावली चालते, परंतु मध्यम ते दाट सावलीत गवत मरते. ईशान्य थायलंडमध्ये स्टायलोबरोबर

हरळी लावतात. गुरांनी जमिनीलगत चरले तरी चालते. जमीन कडक झाल्यास नांगरून घ्यावी. नत्रयुक्त सेंद्रीय खते घालावीत. खते दिल्याने गवतातील अन्नद्रव्ये वाढतात. हरळी अतिशय गोड व पौष्टिक गवत आहे. दुभत्या गुरांना पुष्ट करण्यासाठी व त्यांचे दूध वाढविण्यासाठी हे उत्तम गवत आहे. हरळीवर गुरांना चरता येते. तसेच या गवतापासून चांगली वैरण करता येते. तीही सत्त्वयुक्त असून पुष्कळ काळ चांगल्या स्थितीत राहते. गवत लवकर वाढते. 8 आठवड्यांनी कापले तर वैरणीचे उत्पादन वाढते पण 4 आठवड्यांनी कापलेल्या गवतात प्रथिने जास्त असतात. हरळीचा मुरघास चांगला होतो. एक टन गवतात 41 किलो मक्याचे दाणे टाकून मुरघास करतात. कुरण चरण्यासाठी बंद केल्यास चार्‍याचा तुटवडा पडतो तेव्हा हिरवा चारा मिळू शकतो. बदके,हंस, शेळ्या-मेंढ्या, गुरे, म्हशी यांना चरण्यास गवत उत्तम आहे. मात्र म्हशींना गवत तुडवू देऊ नये. जमीन व हवामानातील फरकांशी गवत जुळवून घेते. हरळीने पाणी व वार्‍याने होणारी धूप थांबवली जाते. हे गवत काटक व वसाहतवाले आहे. हे नवीन मोकळ्या जागी प‘थम लावता येते. हरळी उघड्या जागी पसरते,माती धरून ठेवते व गोळा करते. हरळी रस्त्याच्या कडेने लावल्यास कडेची माती बांधली जाते. हिरवळीसाठी हरळीच लावावी. विलायती गवतांऐवजी खाजगी व सार्वजनिक बागांतून, खेळाच्या मैदानांवर हरळीची लागवड करणे योग्य ठरेल. हिरवळ कापली जाते तेव्हा काढलेले गवत फेकून न देता ते गुरांना खाण्यासाठी वापरावे.

 

 

बन्सी

 

हे बहुवर्षीय गवत आहे. 500 ते 750 मि.मी.पावसाच्या भागात गवत येते. राजस्थानमध्ये 130 मि.मी.हून कमी पावसाच्या पण पाणी देण्याची सोय असलेल्या भागात वाढू शकते. या गवताची अवर्षणाला तोंड देण्याची क्षमता फार उच्च आहे. उन्हाळ्यात पडणार्‍या पावसाला हे चांगला प्रतिसाद देते. मुळे मातीत खूप खोल जातात. पुराचे पाणी जमिनीवर अल्पकाळ राहिले तर चालते. सुपीक जमिनीवर बन्सी गवताची उत्तम वाढ होते. याबाबतीत अंजन गवतापेक्षा हे जास्त चोखंदळ आहे. मध्यम काळ्या जमिनीवर गवत फ ोफावते. भारी गाळाची जमीन किंवा चुन्याचे प्रमाण जास्त असलेल्या काळ्या चिकण मातीवर किंवा आम्लयुक्त सेंद्रीय द्रव्ये कमी असलेल्या रेताड जमिनीवर गवत चांगले वाढत नाही. जमिनीत काही प्रमाणात क्षार असले तरी चालते. पण

सोडियम व मॅग्नेशियमचे क्षार चालतात, क्लोराईडचे क्षार चालत नाहीत. समतोल सेंद्रिय खते दिल्याने फायदा होतो. लागवड करण्याअगोदर जमीन नांगरून घेतात. बी ओळीत किंवा फोकून

लावतात. ओळींमध्ये 45 सेंटिमीटर अंतर ठेवतात. बी 1 सें.मी.पेक्षा जास्त खोल लावीत नाहीत. पावसाळ्याच्या अगोदर 6 ते 7 किलो बी लागते. 1 किलोत 1299000 बिया असतात. बन्सी गवत विरळ सावलीत वाढू शकते पण पूर्ण सूर्यप्रकाश पसंत करते. पाऊस चांगला असल्यास गवत 20 दिवसांच्या अंतराने 10 सें.मी.वर कापतात. पाऊस बर्‍यापैकी असल्यास 30 दिवसांच्या अंतराने 15 सेें.मी. उंचीवर गवत कापतात. गवत एकदा प्रस्थापित झाले की जनावरांना चरू देता येते. चरल्यानंतर 25 ते 30 सें.मी. उंचीचे बुडखे राहावेत. खोडे लवकर कडक होतात. त्यासाठी गुरांना चरू द्यावे, किंवा फुले येण्यापूर्वी कापणी करावी. गवत भराभर वाढत असल्यामुळे कापून, वाळवून वैरण करावी, नंतर उरणारी खोडे कापून गवताची मुळापासून नवी फू ट होऊ द्यावी. ठराविक कालावधीनंतर सेंद्रिय खत पसरावे. एकदा लावल्यानंतर तीन वर्षेपर्यंत गवताची चार्‍यासाठी कापणी करता येते. फुले येईपर्यंत गवत अतिशय चवदार असते. राजस्थानमध्ये या गवतापासून सर्वात जास्त चारा मिळतो. गुजरातमध्ये या गवतापासून वर्षाला प्रती हेक्टरी 4733 किलो चारा मिळालेला आहे. वर्षाला प्रती हेक्टरी 2500 ते 6000 कि. वैरण मिळू शकते. फुले येण्याच्या सुारास गवत कापले असता वैरण चांगली मिळते. या गवताचा बर्‍यापैकी मुरघास करता येतो. बन्सी गवताचे सर्व बी एकाच वेळी तयार होत नाही. पुष्कळ बी स्फोट होऊन उधळते. बियाणाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी फळे फुटण्याअगोदर विळ्याने कापून बी काढावे. पावसाच्या पाण्यावर प्रती हेक्टरी 100 ते 160 कि.बी मिळते. सिंचनाची व्यवस्था असल्यास प्रती हेक्टरी 250 ते 600 कि.बी मिळते. पश्‍चिम राजस्थानमधील रुक्ष प्रदेशात 341 हा प्रकार लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. अमेरिकेत मैदानी प्रदेशात वार्‍याने होणारी धूप थांबविण्यासाठी वार्‍याच्या दिशेला 900 कोन करणार्‍या ओळींमध्ये हे गवत लावतात. पाण्याने होणारी धूप थांबविण्यास गवत फारसे उपयोगी नाही. या गवताबरोबर गवार व घेवड्यासार‘या शिंबीवर्गीय वनस्पती चार्‍यासाठी लावता येतात.

 

 

कुसळी

 

कुसळी गवताचे दोन प्रकार आहेत. वर्षायू प्रकारचे गवत आकाराने लहान असून हलक्या ते साधारण बर्‍यापैकी जमिनीवर वाढते. हे 70 सें.मी.पर्यंत उंच वाढते. दुसरे बहुवर्षायू मोठ्या आकाराचे कुसळी गवत महाराष्ट्रात मध्यम ते चांगल्या जमिनीवर सर्वत्र आढळते. हे 500 ते 1500 मि.मी. पावसाच्या प्रदेशात आढळते. गवत अल्पकाळ अवर्षण सहन करू शकते. पण निमकोरड्या प्रदेशात दिसत नाही. याला जमिनीवर पुराचे पाणी साचलेले चालत नाही. गाळमिश्रित रेतीवर या गवताची उत्तम वाढ होते. भारी चिकण मातीवर गवत येणे व वाढणे अवघड असते. याला जमिनीचा सामू 5.0 ते 6.0 इतका असावा लागतो. हे हलक्या जमिनीवर वाढते पण मातीत क्षारांचे प्रमाण जास्त झाले असल्यास याला सहन होत नाही. निसर्गाध्ये या गवताच्या मुळाशी नत्र गोळा होण्याची प्रकि‘या जलद गतीने होते. स्वत:चे नत्र हे काही प्रमाणात स्वत: तयार करते. जिथे वणवा नेहमी लागतो किंवा गवत नियमित जाळले जाते. तिथे कुसळी गवत पसरते. बी जमिनीत गाडले गेल्याने वणव्यापासून त्याचा बचाव होतो. वर्षायू गवताला ऑगस्टच्या सुरुवातीपासून सप्टेंबरपर्यंत आणि बहुवर्षायू गवताला सप्टेंबरच्या मध्यापासून फुले येतात. फुले येतात तेव्हा गवतात सर्वात जास्त सत्त्वे असतात. पण त्यावेळी त्याच्यावर कुसळे असतात. ही गुरांना त्रासदायक व इजा करणारी असतात, म्हणून फुले येण्यापूर्वी गवत कापून गुरांना हिरवा चारा द्यावा किंवा त्यांना चरू द्यावे. गवत सुरुवातीच्या वाढीच्या काळात चवदार असते. परंतु नंतर ते जसे वाढते तसा त्याचा रुचकरपणा कमी होतो. गुरांना चारा म्हणून गवत चांगले आहे. या गवतापासून वैरण व मुरघास तयार केला जातो. उन्हाळ्यात चार्‍यासाठी हे चांगले समजले जाते. कुसळी गवत क्वचितच मुद्दाम पेरले जाते. नैसर्गिक कुरणातील गवताचा

उपयोग केला जातो. हे गवत स्टायलोबरोबर लावले व सेंद्रिय खते दिली तर एका हेक्टरवर एक जनावर चरू शकते. कुसळी गवताबरोबर अंजन गवत लावता येते. चार्‍यासाठी इतर वन्य गवते

घान्या मारवेल हे गवत काळी जमीन पसंत करते. हे जमिनीवर पसरते. जमिन नांगरल्याने याची उंची वाढते व पाने भरपूर येतात. याचा चारा चांगला असून गवत कुरणात लावण्यास योग्य आहे. याचा मुरघास करता येतो. हे पसरत असल्यामुळे जमीन बांधली जाते.

 

 

लाल गवत, तांबरूट

 

हे वर्षायू, बुटके गवत कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशात आढळते. हे बहुधा काळ्या, मध्यम काळ्या जमिनीवर दिसते. गुरे हिरवे व वाळलेले गवत खातात. पण ती हिरवे गवत जास्त पसंत करतात.

 

 

शिंपी

 

हे नाजूक वर्षायू गवत सुपीक जमिनीवर, बागायती पिकांध्ये तण म्हणून आढळते. याचा हिरवा चारा उत्कृष्ट समजला जातो. तो जनावरांना आवडतो व ती जास्त दूध देतात.

 

 

अंजन,धामण

 

हे वर्षायू किंवा बहुवर्षायू गवत नदीकाठच्या वाळूच्या जमिनीवर गुजरात व खानदेशात दिसते. हे गवत चार्‍याच्या दृष्टीने चांगले आहे. दुभत्या जनावरांना याचा चारा देतात. त्याने त्यांचे दूध वाढते. या गवताची वैरण चांगली होते.

 

 

दांड, डोंगरी गवत

 

हे गवत अतिवृष्टीच्या तसेच अल्पवृष्टीच्या प्रदेशात आढळते. शेताच्या बांधावर व डोंगर उतारावर याची बेटे होतात. फुले येण्याअगोदर याचा चारा उत्तम समजला जातो. बैलांना हा चारा आवडतो.

 

माहिती लेखन : वनराई संस्था

2.88
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:41:11.958145 GMT+0530

T24 2019/10/14 06:41:11.964359 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:41:11.448929 GMT+0530

T612019/10/14 06:41:11.467573 GMT+0530

T622019/10/14 06:41:11.564269 GMT+0530

T632019/10/14 06:41:11.565149 GMT+0530