Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/03/22 08:19:29.851332 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / जमिनीची धूप - उपाय
शेअर करा

T3 2019/03/22 08:19:29.856338 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/03/22 08:19:29.912894 GMT+0530

जमिनीची धूप - उपाय

मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाणे म्हणजे जमिनीची धूप होय.

मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाणे म्हणजे जमिनीची धूप होय. शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर ठरते. त्याचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.

उपाययोजना

  • जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या अपधाव पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करावी.
  • पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्थापन घडवून आणण्याची व्यवस्था करावी. पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घ्यावीत.
  • पट्टा पेर पद्धतीचा वापर करून सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्ट्यांमधून घ्यावीत.
  • शेतीसाठी करावयाच्या संपूर्ण मशागती, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इ. उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर करावी.
  • उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीतील बांधबंदिस्ती, ढाळीचे वरंबे , उताराला आडवे वाफे, पायऱ्यांचे मजगीकरण, नाला विनयन, तसेच समपातळीत चर खोदणे या उपाययोजना कराव्यात.
  • धूपनियंत्रण करण्यासाठी भुईमूग, मटकी आणि कुळीथ ही पिके अत्यंत कार्यक्षम आहेत.

 

संपर्क: 02482 - 235586, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना

स्त्रोत: अग्रोवन

2.96703296703
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
सचिन रोकडे मो.नं ९९२३७९४७४४ Sep 26, 2017 03:48 PM

बोर च्या पाण्यामधील शार कमी होण्यासाठी उपाय

सचिन रोकडे मो.नं ९९२३७९४७४४ Sep 26, 2017 03:40 PM

बोर च्या पाण्यामधील शार कमी होण्यासाठी उपाय

Amol जमादार Sep 26, 2017 07:22 AM

मला जमिनीची धुपाचे महत्त्व यावर माहिती हवी आहे

Aviraj Kale Feb 25, 2017 02:09 PM

मला मृदा प्रदूषण आणि मृदेची धूप यावर मार्गदर्शन हवे आहे .....

dhende rohit Feb 16, 2017 05:58 PM

Jaminichi dup कशी होते याचा अबीया karnee

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/03/22 08:19:30.377935 GMT+0530

T24 2019/03/22 08:19:30.384295 GMT+0530
Back to top

T12019/03/22 08:19:29.719799 GMT+0530

T612019/03/22 08:19:29.738397 GMT+0530

T622019/03/22 08:19:29.839297 GMT+0530

T632019/03/22 08:19:29.840248 GMT+0530