Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:50:59.757391 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / नालापात्रामध्ये बंधारा
शेअर करा

T3 2019/05/24 20:50:59.762638 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:50:59.790011 GMT+0530

नालापात्रामध्ये बंधारा

नालापात्रामध्ये जलसंधारणासाठी बंधारा कसा बांधावा याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.


1) नालापात्रात उपलब्ध असलेल्या लहान ते मध्यम आकाराच्या दगडांचा वापर करून कुशल कामगारांच्या मदतीशिवाय "कोकण विजय बंधारा' बांधता येतो.

2) नालाप्रवाहाच्या दिशेने बंधारा वरच्या बाजूने प्लॅस्टिक अस्तरित केल्यास अपधावेच्या पाण्याचा साठा दीर्घकाळपर्यंत करता येतो. हा बंधारा बांधताना नालातळाचा उतार तीन टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावा.

3) बंधाऱ्याच्या वरच्या व खालच्या बाजूस नाला सरळ असावा. नाल्याची खोली कमीत कमी एक ते दोन मी. असावी. नालाकाठ सुस्पष्ट असावेत.

4) नाल्याच्या तळाशी जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 0.15 मीटर ते 0.30 मीटर खोल व 1.6 मीटर रुंद पायाचे खोदकाम करावे, तसेच पाया नाल्याच्या दोन्ही काठांच्या साधारणतः 0.50 मीटर आतमध्ये खोदावा, जेणेकरून दगड आणि धोंडे आतमध्ये घट्ट बसून, बंधाऱ्याला मजबुती देतील. पायामध्ये दगड व्यवस्थित रचून सांधेमोड पद्धतीने थर करावेत.

5) नाल्याच्या खोलीनुसार बंधाऱ्याची उंची एक मीटर ठेवावी. बंधाऱ्यास पाणी साठवण्याच्या बाजूस 75 जीएसएमचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यात येते आणि ते तळास चिकटून राहण्यासाठी त्यावर दगड- माती टाकावी. हा बंधारा बांधण्यास सोपा आहे. हे बंधारे सप्टेंबर- ऑक्‍टोबर महिन्यात बांधावेत.

 

संपर्क - 02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

स्त्रोत - अग्रोवन

2.87012987013
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:51:0.185065 GMT+0530

T24 2019/05/24 20:51:0.191320 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:50:59.630319 GMT+0530

T612019/05/24 20:50:59.650133 GMT+0530

T622019/05/24 20:50:59.745490 GMT+0530

T632019/05/24 20:50:59.746411 GMT+0530