Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/22 06:07:48.134256 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / नियोजन करा जलसंधारणाचे
शेअर करा

T3 2019/05/22 06:07:48.138823 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/22 06:07:48.164757 GMT+0530

नियोजन करा जलसंधारणाचे

कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जेथे पडतो, तिथेच ते मुरविल्यास जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून ठेवण्यास मदत होते.

कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जेथे पडतो, तिथेच ते मुरविल्यास जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून ठेवण्यास मदत होते, त्याचा फायदा पीक उत्पादनासाठी होतो. हे लक्षात घेता मशागत करताना जल, मृद्‌संधारणाच्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी ही कामे जमिनीच्या उतारास आडवी केल्यास जमिनीच्या भूपृष्ठांवरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी शेतातच मुरण्यास मदत होते. वहितीकरिता लागणारी मशागत, पेरणी व आंतरमशागत समपातळी रेषेला समांतर करण्याच्या पद्धतीला समतल मशागत असे म्हणतात. क्षेत्रावरील समउंचीच्या बिंदूमधून काढलेली रेषा म्हणजे त्या क्षेत्राची समपातळी रेषा होय. समतल मशागत असे म्हणतात. क्षेत्रावरील समउंचीच्या बिंदूमधून काढलेली रेषा म्हणजे त्या क्षेत्राची समपातळी रेषा होय. समतल मशागत सर्व प्रकारच्या मृद्‌ व हवामानविषयक भागांमध्ये उपयुक्त व प्रभावी आढळून आली आहे.

जैविक बांध


क्षेत्राच्या समपातळी रेषेवर अथवा उताराला आडवा मातीच्या बांधाप्रमाणेच साधारणतः मातीच्या बांधाच्या तुलनेत अर्ध्या अंतरावर, विविध वनस्पतींचा उपयोग करून निर्माण केलेला अडथळा म्हणजे जैविक बांध होय. बांध निर्माण करण्यासाठी खस, सुबाभूळ, गिरिपुष्प आदींचा उपयोग करण्यात यावा. मूलस्थानी जलसंधारण साधण्याकरिता अल्प उतारावरील (एक टक्‍क्‍यापेक्षा कमी) क्षेत्रावर केवळ जैविक बांधाचा, तर मध्यम उताराच्या क्षेत्रावर बांधबंदिस्तीच्या जोडीने उपयोग करून परिणामकारक मृद्‌ व जलसंधारण करणे शक्‍य आहे. जैविक बांधामध्ये खसचा बांध सर्व प्रकारच्या मृद्‌ व हवामानविषयक क्षेत्रांमध्ये अधिक कार्यक्षम आढळून आला आहे. मातीच्या बांधाच्या तुलनेत जैविक बांधाला कमी दुरुस्तीची गरज भासते. कालपरत्वे जैविक बांधात सुधारणा होऊन तो दीर्घकाळ टिकतो. जैविक बांधाचा समतल मशागतीकरिता मार्गदर्शक रेषा म्हणूनही उपयोग करता येतो.

बंदिस्त बांध


ज्या क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण भरपूर आहे. जमिनीला फारसा उतार नाही किंवा क्षेत्रफळ कमी आहे अशा ठिकाणी परिघावर बांध घालून अथवा क्षेत्रात चौकोनी वाफे करून मूलस्थानी जलसंधारण करणे शक्‍य आहे. बंदिस्त बांध पद्धतीमध्ये जलसंधारणाकरिता एक मीटर उंचीपर्यंतचा बांध व आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिरिक्त पाणी क्षेत्राबाहेर काढण्याकरिता योग्य सांडव्याची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

2.98936170213
vidula Arun Swami Jan 18, 2016 11:04 PM

जैविक बांधासाठी घायपात वापरणे खूपच फायदेशीर आहे.

गणेश दाभाडे Aug 02, 2014 09:02 PM

माझे शेत पानफस शेत आहे माझ्या शेता जवळील शेतात पाऊस पडला की 2 ते 3 दिवसात नांगर वखर चालतो व माझ्या शेतात 10 दिवसाने चालतो?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/22 06:07:48.542712 GMT+0530

T24 2019/05/22 06:07:48.554189 GMT+0530
Back to top

T12019/05/22 06:07:48.013349 GMT+0530

T612019/05/22 06:07:48.032740 GMT+0530

T622019/05/22 06:07:48.123740 GMT+0530

T632019/05/22 06:07:48.124664 GMT+0530