Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:21:37.218966 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / पाण्याची प्रत तपासणी
शेअर करा

T3 2019/05/26 00:21:37.223693 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:21:37.250211 GMT+0530

पाण्याची प्रत तपासणी

सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करावा. पुढील गोष्टी लक्षात घेऊन सिंचनाच्या पाण्याची तपासणी करावी. पाणी चवीस खारवट किंवा मचूळ वाटत असल्यास, पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास, पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास, जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी द्यावा. निरनिराळ्या सिंचन साधनांमधून घेतलेला पाण्याचा नमुना प्रा तिनिधिक असावयास पाहिजे. पाणी तपासणीच्या बाटलीवर शेतकऱ्याचे नाव व पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्‍यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभव लिहिलेले लेबल बाटलीला चिकटवून प्रयोगशाळेत पाठवावा. याबाबत अधिक माहिती पुढील क्रमांकावर संपर्क साधल्यास मिळू शकेल.

- 0724-2258200, विस्तार क्र. 1067,
मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

पाण्याचा नमुना घेताना


विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगले ढवळून घ्यावे. वि हिरीवर पंप बसविलेला असेल तर तो साधारण 15 ते 20 मिनिटे सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावे. काचेची किंवा प्लॅस्टिकची बाटली स्वच्छ धुऊन घ्यावी आणि त्यामध्ये एक लिटर पाणी भरावे. कूपनलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या साह्याने लहान बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घ्यावा.

 

स्त्रोत: अग्रोवन

2.975
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:21:37.648563 GMT+0530

T24 2019/05/26 00:21:37.655780 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:21:37.114865 GMT+0530

T612019/05/26 00:21:37.134231 GMT+0530

T622019/05/26 00:21:37.208316 GMT+0530

T632019/05/26 00:21:37.209128 GMT+0530