Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:25:12.310036 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/26 00:25:12.314703 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:25:12.339933 GMT+0530

वळण बंधारा

प्रत्येक वर्षी गरजेनुसार शेतकरी दगड मातीचे कच्चे बंधारे घालून पाणी शेतात वळवुन पिकांना संरक्षित पाणी देतात, परंतू सदर मातीचे बंधारे दरवर्षी फुटतात.

कोकण तसेच घाट माथ्यावर बऱ्याच ठिकाणी डिसेंबर / जानेवारी अखेर नाल्यातून पाणी वाहताना आढळते. अशा नाल्यावर प्रत्येक वर्षी गरजेनुसार शेतकरी दगड मातीचे कच्चे बंधारे घालून पाणी शेतात वळवुन पिकांना संरक्षित पाणी देतात, परंतू सदर मातीचे बंधारे दरवर्षी फुटतात. तेंव्हा हेच बंधारे पक्के करुन नाल्यातुन वाहुन जाणारे पाणी शेतात वळवुन पिकांना उपलब्ध करुन दिल्यास त्याठिकाणचे भिजक्षेत्रात वाढ होतेे व पर्यायाने उत्पन्नात वाढ होते. अशा बंधाऱ्याचा खर्चही कमी येतो. अशा प्रकारे पाणी नैसर्गिकरीत्या वळवुन जोपर्यंत नाल्यातून पाणी वाहते तोपर्यंत 24 तास प्रवाहाचे पाणी शेतात पिकांना उपलब्ध होते. यामुळे पावसाळयामध्ये पावसाने ताण दिल्यास तसेच रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना 1 ते 2 खात्रीच्या पाण्याच्या पाळया देता येतात त्यामुळे या कामाची शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात मागणी आहे. अप्पर कृषि संचालक (अभि), म.रा.पुणे यांचे परिपत्रक क्र. मृदसं 7788/सिमेंट नालाबांध/कृषि-54, दि. 28.9.1989 अन्वये वळण बंधारे घेण्यास मान्यता दिली आ

नाल्यामधून वाहून जाणारे पाणी पाटाद्वारे शेतात वळविणेसाठी नालापात्रात जो सिमेंट बांध घातला जातो, त्यास वळण बंधारा असे म्हणतात.

उद्देश

नाल्यामधून वाहून जाणारे पाणी शेतपरिस्थितीनुसार पाटाद्वारे शेतात वळवुन पिकांना संरक्षित पाणी देणे. भिजक्षेत्रात वाढ करणे व पर्यायाने बागायती क्षेत्रात वाढ करणे.

जागेची निवड

  • ज्या नाल्याला नोव्हेंबर / डिसेंबर पर्यंत किमान 150 लिटर / सेकंद एवढा पाणी प्रवाह आहे अशा नाल्याची निवड केली जाते.
  • नाला तळात खडक उघडयावर असावा.
  • नाल्याची खोली 3 मी. पेक्षा जास्त नसावी.
  • नाल्याची रुंदी 30 मी. पेक्षा जास्त असू नये.
  • बंधाऱ्याच्या जागेपासून लगेच 50 ते 100 मी. अंतरावर वळविलेले पाणी शेतात पसरेल अशाच ठिकाणी बंधाऱ्याची जागा निवडली जाते.
  • नाल्यामध्ये शेतकरी मातीचे कच्चे बांध घालून शेतात हंगामी पाणी घेतात, अशा जागांची तांत्रिक योग्यता तपासून निवड केली जाते.
  • पाणलोट क्षेत्र 500 हे. पेक्षा कमी असावे
  • वळण बंधाऱ्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पुराचे पाणी शेतात पसरणार नाही, अशी जागा निवडली जाते.

स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:25:12.702158 GMT+0530

T24 2019/05/26 00:25:12.708821 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:25:12.210708 GMT+0530

T612019/05/26 00:25:12.229697 GMT+0530

T622019/05/26 00:25:12.299890 GMT+0530

T632019/05/26 00:25:12.300665 GMT+0530