Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 04:22:28.325864 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / कमी खर्चात बंधारा
शेअर करा

T3 2019/05/21 04:22:28.330501 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 04:22:28.354408 GMT+0530

कमी खर्चात बंधारा

नाले-ओहोळावर घडीचा बंधारा सुयोग्य जागा निवडून बांधावा. या बंधाऱ्यासाठी गावातच उपलब्ध असलेले साहित्य योग्य पद्धतीने आखणी करून वापरता येते.

घडीचा बंधारा


नाले-ओहोळावर घडीचा बंधारा सुयोग्य जागा निवडून बांधावा. या बंधाऱ्यासाठी गावातच उपलब्ध असलेले साहित्य योग्य पद्धतीने आखणी करून वापरता येते. 
जागेची निवड - जेथे नाल्याची खोली दोन मीटरपेक्षा कमी व कमीत कमी रुंद असेल अशा ठिकाणी कमी उंचीच्या बंधाऱ्यामध्ये जास्त पाणी साठविता येईल. नाल्याच्या तळाचा उतार तीन टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावा. लागणारे साहित्य - पन्हाळी पत्रा, नट-बोल्ट, लोखंडी फ्रेम.

घडीच्या बंधाऱ्याच्या कामाची पद्धत

नाल्यातील जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 0.30 ते 0.50 मीटर खोल व 0.30 मीटर रुंदीचे पाया खोदकाम करावे. नाल्याच्या नियोजित जागेची निवड केल्याप्रमाणे तयार केलेला घडीचा बंधारा पायामध्ये व्यवस्थित बसवावा. पायातून काढलेली माती पुन्हा भरण करून व्यवस्थित दाबून घ्यावी. बंधाऱ्याची रुंदी निश्‍चित करताना बंधारा दोन्ही बाजूंस अंदाजे एक फूट आत जाईल याची काळजी घ्यावी. घडीचा बंधारा नीट बसवून झाल्यावर घडी बंद करावी. त्यानंतर बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस पाणी जमा होताना दिसेल. अशा प्रकारचे एकामागे एक घडीचे बंधारे साखळी पद्धतीने नाल्यांमध्ये बांधून पाणी अडविता येते व साठविलेले पाणी रब्बी हंगामातील पिकास जल पुनर्भरणास साह्यकारक ठरते. 

घडीच्या बंधाऱ्याचे फायदे


1) मृद्‌ व जलसंधारण होते व जल पुनर्भरणास मदत होते.
2) कमी खर्चात जास्त काळ टिकते. पुनःपुन्हा वापरात येत असल्यामुळे दर वर्षी खर्च करावा लागत नाही.
3) मजूर कमी लागतात. लावण्याची पद्धत, तसेच घडी करून ठेवण्याची पद्धत सहज आणि सोपी असल्यामुळे लोकसहभागातून बंधारा उभा करणे व काढणे सहज शक्‍य आहे.

संपर्क - 02358- 280558 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

स्त्रोत: अग्रोवन

3.01136363636
हेमंत मुढे Feb 17, 2015 11:07 PM

कृषी अधिकारी यांची मनमानी घडीचा बंधारा बंधण्यासाठी लेटर देऊन बंधरा बंधत नई मिसाल आटपाडी तालुका गाव मुढेवडि जिल्हा सांगली

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/21 04:22:28.710601 GMT+0530

T24 2019/05/21 04:22:28.716538 GMT+0530
Back to top

T12019/05/21 04:22:28.229068 GMT+0530

T612019/05/21 04:22:28.246035 GMT+0530

T622019/05/21 04:22:28.315822 GMT+0530

T632019/05/21 04:22:28.316593 GMT+0530