অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खरीप पिकांवरील रोग नियंत्रणाकडे हवे लक्ष

खरीप पिकांवरील रोग नियंत्रणाकडे हवे लक्ष

  1. भातावरील करपा : रोगाच्या तीव्रतेनुसार 10 ते 12 दिवसांच्या अंतराने कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 1250 ग्रॅम प्रतिहेक्‍टर किंवा कार्बेन्डाझिम 500 ग्रॅम प्रतिहेक्‍टर फवारणी करावी.
  2. भातावरील कडा करपा : रोगाच्या तीव्रतेनुसार कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 1250 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन (स्टार करावा......) 75 ग्रॅम प्रतिहेक्‍टरी 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  3. मूग आणि उडीद पिकांवरील भुरी रोग : 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 5 मि.लि. पेनकोनॅझोल किंवा 30 ग्रॅम विद्राव्य गंधक किंवा 10 मि.लि. डिनोकॅप 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता भासल्यास सल्ल्यानुसार 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
  4. कपाशीवरील जिवाणूजन्य करपा : 1 ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन (स्टार करावा.....) अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता भासल्यास 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. 10 दिवसांच्या अंतराने 5 टक्के निंबोळी अर्काच्या तीन फवारण्या केल्यास ते जिवाणुजन्य करपा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरते.
  5. कपाशीवरील दहिया रोग : 25 ग्रॅम विद्राव्य गंधक प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सकाळी किंवा दुपारनंतर फवारणी करावी किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  6. कपाशीवरील लाल्या : मॅग्नेशियम सूक्ष्म अन्नद्रव्य 20 ते 30 किलो प्रतिहेक्‍टरी जमिनीतून द्यावे. तसेच 100 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट किंवा 30 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट किंवा 30 ग्रॅम झिंक सल्फेट प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी फुले धरण्याच्या अवस्थेत व दुसरी फवारणी बोंडे धरण्याच्या अवस्थेत करावी.
  7. सोयाबीनवरील तांबेरा : प्रोपीकोनॅझोल किंवा हेक्‍झाकोनॅझोल यापैकी एका बुरशीनाशकाची 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
  8. सोयाबीनवरील मोझॅक : या रोगाचा प्रसार रसशोषक किडीमार्फत होत असल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
  9. केळीवरील सिगोटोका करपा रोग :  प्रोपीकोनॅझोल 5 मि.लि. अधिक खनिज तेल 100 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी या द्रावणाची पहिली फवारणी रोगाची लक्षणे दिसताच करावी. पुढील फवारण्या गरजेनुसार 20 दिवसांच्या अंतराने सल्ल्यानुसार करावी.
  10. अंजिरावरील तांबेरा : 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक क्‍लोरोथॅलोनील 20 मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल 10 मि.लि. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  11. टोमॅटोवरील करपा रोग : मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा टेब्युकोनॅझोल 5 ग्रॅम प्रति 10 लिटर याप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी गरजेनुसार सल्ल्याने करावी.
  12. कांदावरील करपा : मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड किंवा क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम प्रति 10 लिटर प्रमाणात फवारणी करावी.
  13. वांग्याच्या पानावरील ठिपके, फोमोप्सिस फळसड : मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

 

डॉ. राजेश राठोड, 7773952307
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत - अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate