অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चोपन्न रानभाज्यांचा खजिना

चोपन्न रानभाज्यांचा खजिना

पुस्तकाचे नाव - ओळख रानभाज्यांची 
लेखक - डॉ. मधुकर बाचूळकर, डॉ. अशोक वाली, डॉ. हरीश नांगरे 
प्रकाशक - निसर्गमित्र, कोल्हापूर 
पृष्ठ संख्या - 70

किंमत - 100 रुपये या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकांनी विसरून चाललेल्या व लोप पावत असलेल्या 54 प्रकारच्या रानभाज्यांची सचित्र माहिती प्रसिद्ध केली आहे. विविध भाज्यांची रंगीत छायाचित्रे, शास्त्रीय माहिती, स्थानिक व शास्त्रीय नावे व पाककृती अशा चोपन्न प्रकारच्या रानभाज्यांची माहिती देणारे हे पुस्तक संग्राह्य असेच आहे. अनेक लोकांना नियमित पालेभाज्यांशिवाय इतर पालेभाज्यांची माहिती नसते. निसर्गमित्र संस्थेच्या वतीने नुकतेच "रानभाज्या' या विषयावर प्रदर्शन, चर्चासत्र व प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. यातून पुढे आलेल्या विविध दुर्मिळ भाज्यांचा खजिना या पुस्तकाच्या निमित्ताने उपलब्ध झाला आहे.

जरा बदल म्हणून, आरोग्याला हितकारक म्हणून या रानभाज्या अतिशय फायदेशीर ठरतात.केना, टाकळा, कुर्डू, भारंग, वाघाटी, मायाळ, पेंढर, भोपळा अशा विविध प्रकारच्या भाज्या आरोग्यासाठी उपकारक आहेत. यासह अन्य भाज्यांची सचित्र माहिती, आयुर्वेदिक श्‍लोकासहित त्याची वैशिष्ट्ये, पानांचा- फुलांचा आकार, भाजी आढळणारे ठिकाण, त्या भाज्या कोणत्या रोगांवर उपयुक्त आहेत, याची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. विशेष करून विविध रोगांसाठी या भाज्या कशा उपयुक्त ठरतात, याची एकत्रित माहिती अगदी सोप्या शब्दांत लेखकांनी वाचकांना सादर केली आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate