অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जमिनीतला ओलावा

जमिनीतला ओलावा

कोरडवाहू क्षेत्रात अनियमित पडणारया पावसाच्या पाण्याला अडवून तिथेच मुरावण्यासाठी वेगवेगळी कामे करावी लागतात.जेवढा जमिनीत ओलावा साठवता येईल तेवढी शेती उत्पादनाची शाश्वती अधिक असते.किंबहुना जमिनितल्या ओलाव्यावरच कोरडवाहू भागातला शेती व्यवसाय अवलंबून असतो.पावसाचे पडणारे पाणी मुरावण्यासाठी मूलस्थानी जलसंधारनाच्या पद्धती फार उपयुक्त आहेत.कारण त्यामुळे पाण्याचे बाष्पिभवन होत नाही.पाणी जमिनीच्या पोटात साठावल्यामुळे पिकांना सहजपणे उपलब्ध होते.कोणतेही यांत्रिक बांधकाम करावे लागत नाही.पाणी पिकांच्या ठिकाणी वाहून आणावे लागत नाही.त्यामुळे मुळस्थानी जलसंधारानाची कामे जमिनितल्या ओलाव्यासाठी फारच उपयुक्त आणि परिणामकारक आहेत.शिवाराताले पाणी शिवारातच मुरवण्याच्या कृतिक आणि कृषक अशा दोन पद्धति आहेत.याशिवाय जास्तीच्या वाहनार्या पाण्याला अडवण्यासाठी कृतिक बांधकाम पद्धत अवलंबावी लागते.

  • भौतिक पद्धातिमधे जमिनीचे सपाटीकरण करुन घ्यावे सपाटीकरणामुळे क्षेत्रात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी मुरते.
  • उताराला आडवे सपाट वाफे म्हणजेच बंधिस्त वाफे काढावेत.ते पाणी तिथेच मुरते.सपाट वाफ्यामुळे ३० ते ४० टक्के जास्तीचा ओलावा साठवला जाऊन पिक उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते.
  • नांगराने सरी-वरंबे काढून त्यावर पाइक घेतली,टार पडणार्या पावसाचे पाणी सर्यामूळे अडविले जाऊन तिथेच मुरविले जाते.यामुळे उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते.
  • खरिपात उभ्या पिकांत दोन ओळीमध्ये ठिकठिकाणी अर्थात पाउण फुट खोलीचे खड्डे काढून ठेवल्यास त्यात पावसाचे पाणी साचते. अन् त्यामुळे जमिनितला ओलावा वाढतो.
  • फळझाडांना उताराच्या बाजूने फुटभर उंचीचा वरंबा असणारे अर्धचंद्राकृती आळे तयार केले असता पाणी फळझाडांच्या बुंध्याजवळ साचून मुरते.त्यामुळे ४० ते ५० टक्के जास्तीचा ओलावा साठविला जातो.

अशा आळे पद्धतीत झाडाच्या बुंध्याभोवती सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केले तर हाच ओलावा जास्त काळ टिकून राहतो.तय ओलाव्याचा फायदा फळझाडांना चांगलाच होतो.

कृषक पद्धतीमध्ये उताराला आडवी नांगरट, कुळवाच्या पाळ्या पेरणी, आंतरमशागतिची कामे करावीत.या मशागतीमुळेपाणी अड़विले जाते आणि मुरविले जाते.त्यामुळे जास्तीत जास्त ओलावा साठवला जातो.तो जास्त काळ टिकतो.

नांगरट उताराला आडवी केल्यास उन्हाळ्यातल्या वादळी पावसाचे पाणी अडवून जिरवले जाते, तसेच इतर मशागतीमुळे पावसाचे पाणी वाहून न जाता अडवून मुरवले जाते.

कोळपनी ही आंतरमशागत उभ्या पिकात असणारा ओलावा जास्त काळ पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी उपयोगी पडते.

दुबार पिक पद्धतीचा अवलंब केल्यास खरिपातल्या आणि रब्बीतल्या पिकंचं जमिनीवर आच्छादन होते.त्यामुळे जमिनितल्या ओलाव्याचे बाष्पीभवन होत नाही.जमिनीची धुप होत नाही.

आंतरपिक म्हणजे एकाच हंगामात त्याच जमिनीत पट्टा पद्धतीने उताराला आडवी दोन पिके पेरली, तर पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन पाणी त्या ठिकाणी मुरते.शिवाय आच्छादन झाल्यामुळे बाष्पीभवन होत नाही.ओलावा टिकून राहतो.जास्तीचा साठविला जातो.

पट्टा पद्धतीत भुईमुग, मटकी, हुलगा, सोयाबीन, यांसारख्या धुप प्रतिबंधक पिकाची उताराला आडवी पेरणी करुन पिक घेतली असता, पडणार्या पावसाची तीव्रता कमी केलीजाते. पट्ट्यामुळे पावसाच्या पाण्यास अडथळा निर्माण केला जातो.बाष्पीभवन रोखले जाते.त्यामुळे ओलावा पट्टा पद्धतीत जास्तीचा साठवून जास्त दिवस टिकवला जातो.

आच्छादन ही पद्धत ओलावा जास्त काळ साठवून सर्वात परिणामकारक पद्धत आहे.पिकाच्या दोन ओळीत वेगवेगळी सेंद्रिय मटेरियल, काडीकचरा, पालापाचोळा उष्टावळ कार्बारील पावडरचा थोडासा वापर करून पद्धतशीरपणे आच्छादन केल्यास पिकाला दोन पाणी देण्याइतका ओलावा मिळतो आणि तो जास्त काळ पिकांना उपलब्ध होतो.

जैविक बांध म्हणजे झुडुवजा वनस्पतींची उताराला एका रेषेत आडवी बांधासारखी लागन केली तर वाहून जाणार्या पाण्याला अड़थळा निर्माण होतो.पाणी तिथेच मुरते.धुप कमी होते.मारवेल, पवना, सुबाभुळ इ. चा वापर जैविक बांधासाठी करावा.या जैविक बांधामुळे जनावरांना चाराही मिळतो.ओलावा टिकावण्यासाठी जैविक बांध फायद्याचे ठरतात.

या मूलस्थानी जलसंधारणाच्या भौतिक आणि कृषक उपचाराबरोबरच जास्तीचे पाणी साठवून मुरण्यासाठी काही अभियांत्रिकी माती-पाणी संवर्धनाची कामे करावी लागतात.त्यामध्ये समपातळीत बांध उताराला आडवे घातल्यास पाणी अडविले जाते, साठवीले जाते.या बांधामुळे जमिनीत ३० ते ४० टक्के ओलावा जास्तीचा साठवीला जातो.पोटातील जादा पाणी ढाळीच्या बांधाकडून मुख्य चारीला पोचवले जाते.पाण्याचा वेग कमी होऊन बाहेर काढले जाते.जमीनी चिबडयुक्त होण्याचा धोका कमी होतो.

शोषखड्डे काढून पाणी साठवून जास्तीचा ओलावा साठवट येतो.सलग समपातळीत चर काढल्यामुळे उताराचे पाणी अडविले जाते.भरव्यावर लावलेली झाडे जोमाने वाढतात.शेततळी, सीमेंट नालाबांध यामुळेही ओढयावरचे पाणी अडविले जाते.त्याचा संरक्षित पाणी म्हणून वापर करता येऊन पिकांना ओलावा उपलब्ध करुन दिला जातो.अशा प्रकारे ओलावा साठवण्यासाठी उपचार करावेत.

संदर्भ - प्रल्हाद यादव(कृषी प्रवचने)

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate