অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुले जयवंत चारा : दुष्काळात आधार

जनावरांच्या आहारात चा-याचा भाग हा जवळपास ७0 टक्के असणे आवश्यक आहे. तर, उरलेला ३० टक्के भाग हा पशुखाद्याचा असणे आवश्यक आहे. सद्य परिस्थितीत सर्वदूर दुष्कळसदृश परिस्थितीमुळे हिरव्या चान्याची कमतरता भासत आहे. हिरव्या चान्याच्या कमतरतेमुळे जनावरांची वाढ, उत्पादन व पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम घडतात. पशू उत्पादनासाठी नियमित संतुलित आहार देणे गरजेचे आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चारा संशोधन केंद्राने संकरित नेपियरचे फुले जयवंत' हे वाण प्रसारित केले आहे. कमी पावसात येणारे व सतत ३-४ वर्षे घेता येणा-या या वाणांची महाराष्ट्रासह दक्षिण भारतात लोकप्रियता वाढत चालली आहे.

वैशिष्ट्ये

  1. हे बहुवार्षिक चारापीक असल्याने सलग तीन ३-४ वर्षे याचे उत्पादन घेता येते. बाजरी व हतीगवत यांच्या संकरातून ही जात विकसित केली आहे.
  2. वर्षभरात कोणत्याही हंगामात लागवड करता येते. पहिली कापणी लागवडीपासून ९-१० आठवड्यांनी व नंतरच्या कापण्या दर ६-७ आठवड्यांनी करता येतात. वर्षभरात ८-९ कापण्या घेता येतात.
  3. चारयात ऑक्झिलीकआम्लाचे प्रमाण कमी आहे. फुले यशवंत या वाणात हे प्रमाण २.३८ टक्के एवढे असून तेच फुले जयवंत या वाणात १.९१ टक्के एवढेच आहे. या चा-यात प्रथिनांचे प्रमाण जवळपास १o.३५ टक्के एवढे आहे.
  4. हा चारा पालेदार, रसदार व अत्यल्प तुसाचे प्रमाण, प्रयोगशाळेत वाळलेल्या चान्याची पचनशक्ती फुले यशवंत पेक्षा जास्त (६१.८) एवढी असल्यामुळे हा जनावरांना अतिशय फायदेशीर आहे.
  5. चाराकापणीनंतर पुन्हा जोमाने लांब, भरपूर वाढतो. पाने रुंद तसेच फुटवे मउ , लांब होतात.

उत्पादन तंत्रज्ञान

जमीन व हवामान

हा वाण सर्व प्रकाराच्या जमिनीत वाढतो, तथापि अधिक उत्पादनासाठी कसदार, मध्यम ते भारी व उत्तम निच-याची जमीन निवडावी. साधारणपणे ३१ अंश से. तापमानात फुले जयवंतची वाढ उत्तम होते. १५ अंश से. खाली तापमान गेल्यास वाढ खुटते.

लागवडीचे अंतर व पद्धती

फुले जयवंत या गवताची लागवड ठोंबे (मुळासह कांड्या) लावून करावी लागते. साधारणपणे ३ महिने वाढ झालेल्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील २/३ भागातील २ किंवा ३ डोळे असणा-या कांड्या काढून लावल्यास त्यांची वाढ चांगली व भरपूर फुटवे येतात. लागवड करताना ९० x ६० सेंमीवर करावी. साधारणपणे प्रत्येक ठिकाणी २ ठोंबे लावल्यास हेक्टरी ३७,000 ठोंबे लागतील.

लागवडीचा काळ

पाण्याची उपलब्धता मुबलक असल्यास १५ अंश से.पेक्षा कमी तापमानाचा (थंडीचा) काळ वगळता वर्षभर केव्हाही लागवड करता येते. पावसाळ्यात जून ते ऑगस्ट व उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात लागवड केल्यास पिकांच्या वाढीसाठी व स्थिरतेसाठी योग्य असतो.

खतांचे नियोजन

हेक्टरी ३५-४० टन चांगले कुजलेले शेणखत मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावे.

लागवडीच्या वेळी हेक्टरी ६o किलोग्रॅम नत्र, ५० किलोग्रॅम स्फुरद आणि २५ किलोग्रॅम पालाश ध्यावे. भरपूर व पौष्टिक चारा उत्पादनासाठी प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी २५ किलोग्रॅम नत्र द्यावे. प्रत्येक २-३ कापण्या झाल्यावर रासायनिक नत्र व सेंद्रिय खते आळीपाळीने दिल्यास अधिक उपयोगी आहे.

पाणी व्यवस्थापन

उन्हाळी (फेब्रुवारी-मार्च) लागवडीसाठी सुरुवातीस २ व त्यानंतर दर १o-१५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात दर ३-४ आठवड्यांनी पाणी दिले, तरी पुरेसे आहे.

कापणी

फुले जयवंत चान्याची पहिली कापणी लागवडीपासून ९ ते १o आठवड्यांनी म्हणजे ६0-७0 दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या दर ६ ते ७ आठवड्यांनी (४०-५० दिवसांनी) कराव्यात. अशा रीतीने वर्षभरात जवळपास ८ ते ९ कापण्या सहज घेता येतात. कापणी जमिनीपासून १५ ते २० सेंमी. अंतरावर करावी म्हणजे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते.

चारा उत्पादन

काळ्या कसदार अशा चांगल्या जमिनीत लागवड केल्यास तसेच पाण्याची सोय व उत्तम अन्न व्यवस्थापन असल्यास फुले जयवंत या संकरित वाणापासून हेक्टरी २५०-३०० टन हिरवा चारासहज मिळू शकतो.

अ.क्र.गुणधर्म सरासरी वैशिष्ट्ये
पिकाची उंची (से.मी.) १६७.३
फुटव्यांची संख्या ६२.२
फुटव्यांची लांबी (से.मी.) १४३.५
फुटव्यांची जाडी (से.मी.) २.९
पानांची लांबी (से.मी.) ९६.२
पानांची रुंदी (से.मी.)

२.३

पाने व कांडी यांचे प्रमाण १.४२

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate