অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बदलती शेती आणि बदलता शेतकरी

बदलती शेती आणि बदलता शेतकरी

प्राचीन काळी आदिमानव जंगलातच राहून कंदमुळे आणि फळे खाऊन शिकार करून जगत होता.

आदिमानवाला इतर सजीवांपेक्षा बुद्धीची देणगी जास्त असल्याने त्याच्यात दिवसेंदिवस विकास होवू लागला.  अगदी फारच प्राचीन काळी पाण्याच्या प्रवाहाच्या कडेकडेने फिरते वास्तव्य करून खाण्याच्या पदार्थांच्या शोधात राहू लागला.  आवडणाऱ्या फळाकडे आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थांकडे त्यांचे लक्ष जाऊ लागले.  त्या पदार्थांच्या अभिवृधीची युक्ती निसर्गाने त्याला शिकवली आणि ऋषीमुनींच्या अगोदरच कृषिसंस्कृतीचा जन्म झाला.  ऋषीमुनींनी आपल्या आश्रमाच्या आसपास ऋषी कृषी सुरु केली.

कृषिसंस्कृतीचा खरा विकास ऋषीमुनींच्या काळापासून सुरु झाला.

नदीकाठांनी त्या काळातल्या कृषिमित्रांच्या वस्त्या सुरु झाल्या.  दगडाच्या आणि लाकडी औजाराच्या साह्याने अनुभवाला आलेल्या धान्याची पेरणी करून ते धान्य पिकवू लागले.  शेकडो हजारो वर्षांनी कृषी धान्य पिकविण्यासाठी जनावरांचा वापर करण्यास सुरुवार झाली.  जनावरांपासून मिळणाऱ्या दूध, मांस याचीही त्यांना जाणीव झाली आणि मोठ्या प्रमाणात नदीकाठची सुपीक जमीन शोधून त्या ठिकाणी धान्य घेऊ लागले आणि खऱ्या अर्थाने भटका आदिमानव शेतकरी झाला.  शेती करू लागला.

मानवी वस्त्या वाढू लागल्या, मानवांची संख्या वाढू लागली तशी समाजसंस्कृती उदयास आली.  राजघरानेशाही सुरु झाली.  अनेक राजवटी उदयास आल्या नि गेल्या.  त्या सगळ्यांनी कृषीव्यवसाय आणि कृशिसंस्कृती जोपासली आणि वाढवली.  मुघल राजवट – शिवाजी महाराजांची राजवट, इंग्रज राजवट इ.  राजवटीत कृषी व्यवसायाकडे प्रजेचा व्यवसाय म्हणून लक्ष दिले गेले

पण खऱ्या अर्थाने शेती व्यवसाय आणि शेतकरी जीवन बदलले ते स्वातंत्र्यानंतर.  गेल्या ६०-६५ वर्षात अनेक गोष्टीत बदल झाला.  उत्क्रांती झाली.  ७०-८० वर्षापूर्वी वाडवडील, आजोबा –पणजोबा शेती करीत होते ती फक्त पावसाच्या जीवावर.  पण त्या वेळी हुकुमी पाउस पडत होता.  त्या मुले शेती उत्पादने हुकुमी मिळत होती.  त्यावेळी फक्त पावसाळ्यातली शेती केली जात होती.  उन्हाळ्यातली शेती नव्हती. पण पुढे थोड्याफार प्रमाणात भूपृष्टातल्या पाण्याचा विहिरीच्या माध्यमातून पिके पिकविण्यासाठी वापर होऊ लागला.  मोटे वरच्या बागायातीनंतर इंजिनावर बागायती शेती करू लागले.  अलीकडे सरास इलेक्ट्रिकच्या (विजेचा) वापरावरच शेती व्यवसाय अवलंबून आहे.  लाकडी अवजारावरून लोखंडी अवजार आणि आता सध्या कृषी यांत्रिकीकरणामुळे आधुनिक औजारांच्या सहाय्याने शेती करू लागले.  पारंपारिक जुन्या स्थानिक वाणांच्या बियाण्याऐवजी निवड पद्धतीच्या वाणांचा वापर वाढू लागला.

१९६७ च्या आसपास संकरित बियाणांची हरितक्रांती घडवून आणली.  त्यामुळे खात धान्य आणि इतर उत्पादनांची आयात थांबली.  (मिलोसारख्या धान्याची चव आताच्या बुजुर्गांना चांगलीच माहित आहे) संकरीत अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला.  पाण्याची सुविधा वाढली.  त्यामुळे खऱ्या अर्थाने हरितक्रांती यशस्वी होवून देशातल्या जनतेची भूकामारी संपून देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

सध्याच्या बदलत्या शेती व्यवसायाचे अवलोकन करताना हायटेक शेतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात होवू लागल्याचे दिसते.  संकरीत वानाबरोबरच जी. एम.  पिके येवू घालतील जैवतंत्रज्ञानाने मोठीच आघाडी घेतली आहे.  ग्रीनहाऊस, शेडनेट पद्धतीचा अवलंब वाढू लागला आहे.  कृषी यान्त्रीकीकरणात प्रचंड वाढ झाली आहे.  नगदी पिकांच्या उत्पादनांत हायटेकचा वापर करून कित्येक पटींनी उत्पादनात वाढ झाली आहे.

देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठ खुली झाल्याने शेती व्यवसायाला सोनेरी दिवस आलेत.  त्याचबरोबर हि सोनेरी संधी शेतकऱ्यांना चालून आलेली आहे.  त्यामुळे अतिवेगाने आपली शेती बदलू लागली आहे.  त्याचबरोबर शेतकरी आणि त्याचे जीवनही बदलू लागले आहे.

कृषी उत्पादन वाढल्यामुळे शेतकरी जीवन उंचावलेले आहे.  त्यांच्या राहणीमानात अमुलाग्र बदल झाला आहे.  आर्थिक स्तर उंचावला आहे आणि हा विकास उत्तरोत्तर असाच होत राहणार यात शंका नाही

स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate