অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बागकामातून कमी होईल विस्मरणांचा आजार

बागकामातून कमी होईल विस्मरणांचा आजार

डिमेन्शिया या विस्मरणाशी संबंधित मेंदू विकारांमध्ये बागकामाचा चांगला उपचारात्मक फायदा होत असल्याचे एक्‍स्टर विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. हे संशोधन "जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल डायरेक्‍टर्स असोसिएशन'मध्ये प्रकाशित करण्यात आले.

डिमेन्शिया - वाढती समस्या

  • जागतिक आरोग्य सेवेसमोर डिमेन्शिया या आजारांचे मोठे आव्हान असून, दर वर्षी सुमारे 7.7 दशलक्ष नव्या रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या वयोमानासोबत दीर्घकालीन स्मृती कमी होत जातात. प्रत्येक घरामध्ये डिमेन्शियासारखी लक्षणे असणाऱ्या वयस्कर व्यक्ती दिसत असून, रुग्णालयातील रहिवासी पद्धतीत राहणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही एकूण प्रमाणाच्या तीन चतुर्थांशपेक्षा अधिक झाले आहे.
  • एक्‍स्टर विद्यापीठातील वैद्यकीय विद्यालयातील संशोधकांच्या गटाने हे संशोधन केले असून, राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेच्या अंतर्गत नैर्ऋत्य पेनिनसुला उपयोजित आरोग्य विभागाने साह्य केले आहे. उपचार केंद्रामध्ये मोकळ्या जागेमध्ये बागकामातून ताणमुक्ती, एखाद्या कार्यात बुडून गेल्याची अनुभूती, या दोन्ही बाबी एकाच वेळी अनुभवण्यास मिळतात. त्यामुळे मनातील खळबळ कमी होत असल्याचे या अभ्यासामध्ये 17 प्रकारे केलेल्या विविध प्रयोगांत दिसून आले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये डिमेन्शियावर औषधांशिवाय उपचाराकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामध्ये स्मरण, स्मृतींना चालना देण्यासाठी पर्यावरण आणि शेतीकाम अनेक वेळा फायदेशीर राहू शकते. त्यातून आनंद, ताणमुक्तीसोबतच आठवण्याची कौशल्ये आणि सवयीमध्ये वाढ होऊ शकते. उपचार केंद्रामध्ये रुग्णांच्या आपल्या नातेवाइकांशी भेटी बागेमध्ये ठेवल्यास डिमेन्शिया रुग्णांच्या स्मृतींना चालना मिळण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट झाले.

रिबेका व्हेर, मुख्य संशोधक.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate