অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेततळ्याचा कार्यक्षम वापर

शेततळ्याचा कार्यक्षम वापर

सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील मागील दोन वर्षांचा दुष्काळ लक्षात घेऊन शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे तसेच उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. जमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून आपण ते शेतात एक खडुा करून साचवितो, कार्यक्षम वापराचाच विचार करत होतो, पण आता कमी पर्जन्यमानाच्या काळात आपण पाणी कार्यक्षमतेने साठविणे हे देखील लक्षात घेणे आवश्यक

आहे. त्यासाठीच प्रस्तुत लेखात महत्वाच्या म्हणजेच शेततळ्याचा कार्यक्षम वापर या विषयावर माहिती दिली आहे.

शेततळे

शेतजमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालिन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीच्या काठावरील पडीक क्षेत्रात घेतले जाते. शेतात तळे करून त्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठविले जाते व त्याचा उपयोग आपणास संरक्षित सिंचनासाठी करता येतो. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशावेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता येते व त्यामुळे हमखास पीक येते. तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीस जर शेततळ्यात पाणी साठविले असेल तर त्या पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून रब्बी हंगामात सुरुवातीस जर शेततळ्यात पाणी साठविले असेल तर त्या पाण्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून रब्बी हंगामात मर्यादित क्षेत्रात एखादे पिक घेता येईल .

तसे पाहिले तर पावसाचे वाहून जाणारे पाणी शेतात आडविण्याच्या शेततळ्याच्या वरच्या बाजूस पाणलोट क्षेत्राची आवश्यकता असते. जेणेकरून वाहून जाणारे पावसाचे पाणी या खोदलेल्या तळ्यात साठविता येईल. पण ब-याच वेळा जेव्हा शेताचे क्षेत्र अल्प किंवा कमी असते अशा वेळी जरी शेतात तळे घेतले तरी आवश्यक तेवढे पाणी त्यामध्ये साठू शकत नाही. परंतू शेतक-यांनी पिके घेतल्यानंतर ती उन्हाळ्यामध्ये जगवायची असतात. त्यांच्याकडे शेतात पाण्याचे स्त्रोत नसते अशावेळी शेतक-यांना इतरत्र ठिकाणाहून पाणी आणून शेतात ते साठविण्याची व्यवस्था करून व साठवणूक तलाव उपयोगी पडतात.

शेततळ्याचे फायदे

  1. आपत्कालिन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.
  2. पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
  3. पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
  4. चिबड व पाणथळ जमीन सुधारण्यासाठी शेततळ्याचा चांगला उपयोग होतो.
  5. मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो. दुग्धव्यवसायासारखे जोडधंदे करु शकतो.
  6. पिकांवर औषधे फवारणीसाठी शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते.

शेततळ्याचे प्रकार

शेततळ्याचे मुख्यत्वे खालीलप्रमाणे तीन प्रकार आहेत.

  1. नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून केलेले शेततळे
  2. सपाट जमिनीतील शेततळे - सपाट जमिनीतील शेततळे हे अर्धे खोदलेले व अर्धे बांधलेले किंवा पूर्ण खोदलेले असते.
  3. साठवणूक तलाव - जो पूर्णपणे जमिनीवर बांधला असतो किंवा अर्धा खोदला व अर्धा बांधलेला असती.

शेततळ्यासाठी जागेची निवड

  1. साधारणत: ज्या जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे, अशी जमीन असलेल्या जागेची शेततळ्यासाठी निवड करावी.
  2. काळ्या जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण जास्त आहे अशी जमीन शेततळ्यास योग्य आहे.
  3. पश्चिम घाट विभागामध्ये भात शेतीसाठी थराच्या वरील भागामध्ये लॅटराईट जमिनीत सुध्दा शेततळे घेणे फायद्याचे अस

शेततळ्याचे आकारमान

शेततळ्यामध्ये साधारणत: संरक्षित सिंचनाची गरज भागविण्यासाठी पाणी साठविले जाते. हे पाणी शेततळ्याचे जे पाणलोट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्रावरील जमिनीवर पडणा-या पावसाच्या अपधावामुळे शेतात येते. पावसाच्या पाण्याचा किती अपधाव होईल यावरून तेवढा अपधाव साठविण्याइतपत शेतातळ्याचा आकार असावा.

अपधाव काढणे

अपधाव काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर करावा. या सूत्रानुसार घन मीटरमध्ये एकूण अपधाव दिलेला आहे.

एकूण अपधाव =  क *प * अ /१०

क - सरासरी पावसापासून उपलब्ध होणारा अपेक्षित अपधाव (टक्के)

प - वार्षिक सरासरी पर्जन्यमान (मि.मी.)

अ - पाणलोटाचे एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वार्षिक सरासरी पावसावर उपलब्ध होणारा अपधाव (क) हा भारी जमिनीत ८ ते १0 टक्के, तांबड्या जमिनीत २0 टक्के आणि मध्यम भारी जमिनीत १0 ते १५ टक्के इतका धरावा. यासाठी एक उदाहरण घेऊ, जर शेतातळ्याचे पाणलोट क्षेत्र ५ हेक्टर असेल म्हणजेच 'अ', वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६00 मि.मी. असेल, म्हणजेच 'प' व जमिनीचा प्रकार मध्यम भारी असेल तर अपेक्षित अपधाव म्हणजेच कफ १0 असेल, तर ५ x ६00 x १0 म्हणजे ३0,000 भागिले १0 म्हणजे ३000 घनमीटर किंवा ३0 लाख लिटरपर्यंत पाणी आपधावाद्वारे शेततळ्यात साठविण्यासाठी उपलब्ध होऊ शकते.

आकारमान निश्चित करण्याची पद्धत

  1. प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्चित करावी.
  2. चाचणी खडे घेऊन शेततळ्याची खोली निश्चित करावी.
  3. शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे ते पाणलोट क्षेत्र निश्चित करून त्याचे क्षेत्र (अ) मोजावे.
  4. तालुक्याच्या वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची (प) खात्री करावी.
  5. पाणलोटातील जमिनीचा प्रकार प्रत्यक्ष शेत परिस्थितीनुसार निश्चित करावा व त्या प्रकारानुसारच अपेक्षित अपधाव (क) निश्चित करावा.
  6. याप्रमाणे पाणलोट क्षेत्र (अ), अपेक्षित अपधाव (क) आणि वार्षिक पर्जन्यमान (प) निश्चित केल्यानंतर वरील सूत्रानुसार त्याच्या किमती टाकून एकूण अपधाव (आर) काढावा.
  7. एकूण अपधावाच्या ५oते१०० टक्के पाणी साठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या शेततळ्याचे आकारमान निश्चिती करावे.आकारमान निश्चिती करताना शेततळ्याचा आकार नैसर्गिक परिस्थिती प्रमाणे असा असावाकी, या योगे कमीत कमी माती काम करून जास्तीत जास्त पाणी साठविता येईल. शेततळ्याची सर्वसाधारण खोली २ ते ३ मीटर असावी.
  8. शेततळ्याचा आतील उतार जमिनीच्या मगदुरानुसार १.१ किंवा १५ : १ ठेवावा.

शेततळ्याचे आकारमान व पाणी साठवणूकक्षमता शेततळ्याचा आकार पाणलोट क्षेत्रानुसार व त्यातून उपलब्ध होणा-या अपधावेतून होणा-या पाणीसाठ्याचा अनुषंगाने पुढीलप्रमाणे असावा.

पाणी साठवणक्षमता (लिटर)
खोली (मीटर) माथ्याची लांबी-रुंदी (मी.) तळाची लांबी-रुंदी (मी.) बाजूचा उतार
441000 3 1515 99 १:1
351000 3 1515 66 १:५:1
876000 3 2020 1414 १:1
741000 3 2020 1111 १:५:1
1461000 3 2525
1919 १:1
1281000 3 2525
1616 १:५:1
2196000 3 3030 2424 १:1
1972000 3 3030 2121 १:५:1

टीप: शेततळ्यातील पाण्याची खोली ३.0 मीटर एवढी गृहीत धरली आहे.

शेततळ्यांचे काम करताना घ्यावयाची काळजी

  1. शेततळ्यासाठी जागा निवडताना कठीण, मुरुम, खडक, जिवंत पाण्याचे झरे लागणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याकरीता जमीन निवडताना ट्रायल पीट घेवून तळ्याची जागा निश्चित करावी.
  2. शेततळ्याचे क्षेत्रफळ साठवणूक क्षमतेप्रमाणे निश्चीत करावे . शेततळ्यामुळे जमिनीचे कमीतकमी क्षेत्रफळ व्यापले जावे, त्यामुळे पाण्याचा पसारा कमी ठेवल्यामुळे भाष्पीयभवनामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकेल
  3. शेततळ्याच्या खोदाईचे काम करतानाच तळ्यांच्या बाजूचा उतार योग्य ठेवणे ,बाजूच्या भिंती सपाट व गुळगुळीत करून घेणे , शेततळ्यातील टोकदार दगड ,धारदार वस्तू , काचा , झाडांच्या मुळ्या इ. काढून टाकून त्यावर पाणी मारून ते धुमसून घेणे. अस्तरीकर्णाच्या दृष्ठीने हि सर्व पूर्वतयारी खोदाईचे काम करतानाच करून घेण्यात यावी .
  4. शैतळ्याचे काम प्रथम  खोदाई, नंतर कुंपण घालणे आणि त्यानंतर प्लॅस्ट्कि अस्तरीकरण अशा क्रमाने पूर्ण करण्यात यावे.
  5. प्रस्ताविंत जागेमध्ये खोदाई करुन काढलेली मती शैततळयाच्या आकारानुसार लावून व दबाई करुन बांध बनविण्यात यावा.
  6. शेततळ्याचे तिन्ही ट्प्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर त्या शैततळ्याची कोणत्याही प्रकारचा काडीकचरा होऊ न देण्याची खबदारी घ्यावी. यामुळे घुशी, उदीर, खेकडे इत्यादी पासून संक्षण होईल.
  7. शेततळ्यामध्ये जर्मनीवरुन वाहून जाणारे पाणी सप्तविंणे अपेक्षेित भसल्यामुळे वाढून येणा-या पाण्यातील गाळ शैततळ्यामध्ये जावू नये, करण्याकरीता २ × २ × २ मी. आकाराचा ख्रा करुन त्यामधून पाणी वाहून जाण्याची सोय करावी. जेणेकरुन पाण्यातील गाळ त्या खड्रयामध्ये बसून राठिंबाल वगळणी केलेले पाणी शेततळ्यामध्ये जाईल. त्यामुळे अस्तकिरण केलेल्या प्लॅस्ट्रेिक श्रीष्ठ्वर गाळ साचणार नाही. ८) अशा प्रकारच्या गाळण यंत्रणेमध्ये वस्च्या धरात ५० ते १०० मिलीमीटर जाडीची खडी, मथिल्या धारात ५ ते १० र्मिलीमीट्र जाडीची बारीक खडी आणि सविति खालच्या धरामध्ये २ ते ४ र्मिलीमीटर जाडीची वाळू वापरणे आवश्यक आहे.

पाणी आत येण्याचा मार्ग (इनलेट) व पाणी बाहेर जाण्याचा मार्ग (आकटलेट)

शेतात ज्या ठिंकाणी शेततळे घेतलेले आहे तेथून ओघळीपर्यंत

साधारण १० मी. लांबीचा व १.५ ते २ मीट्र रुंदीचा इनलेट चर तयार करावा. चराची खोली ०.५० मी. पर्यंत घ्यावी व त्यास भावश्यक पण बॅीन टक्क्यापेक्षा कमी उतार कैफन २० ते २५ सें.मी. जाडीच्या भाकाराचा

दगडाचे भाच्छादन करावे. तसेच भोघळींचे पाणी इनलेटमध्ये घेण्यासाठी ओघळीमध्ये छोटेसे लुजबोल्ड्र स्ट्रक्चर करावे किंवा सिमॅट्च्या मोकळ्या गोण्यांमध्ये वाळू भरुन त्या ओघळीत भाड्या टाकल्यात. शैततळे पाण्याने पूर्ण भरूयानंतर जादा झालेले पाणी ओघळीमध्ये सुरक्षितपणे सोडण्यासाठी भाउठलेट तयार करावे. इनलेट प्रमाणेच 3भाफ़ठलेंटने काम करावें. १.५ c तें २ मी. रुदांचा चर कशवा खोलीं ०.५० मीटर असावी. तळाची श्रुप होऊ नये म्हणून उतार दोन छक्के पेक्षा कमी ठेवून तळास दगडी आच्छादन करावे. तसेच भाऊठ्लेट्मथून बाहेर जाणारे पाणी शेतीसाठी जेव्हा पहिंजे तेव्हा घेण्यासाठी पट करुन घ्यावा. भाऊठलेट्ची लांबी शैततळ्यापासून ओघळीफ्र्यंत साधारणपणे १० मीटर ठेवावी. भाऊठलेटचे खोदकाम करूताना त्याला जर्मनीच्या प्रकारानुसार १.५:१ किंवा २:१ असे बाजू उतार द्यावेत.

शैततळ्यासाठी अस्तर

ज्या जर्मिनीत पाणी धरून  ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. तसेच पाणी पाश्मरण्याचा वेगही प्रचंड आहे. तेधे पावसाळ्यात पाण्याने पूर्ण भरूलेले शेततळे काही किंवसांत कोरडे होते. पर्यायाने अशा शेततळ्यातून अपेक्षित फायदा होत नाही शेततळ्यातील पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.   अस्तरासची बेन्टोनाईट, मातीं-मिंट र्मिश्रण, चिंकणमाती किंवा प्लॅस्ठ्कि फिल्मचा वापर करावा.

सिमेंट  व मातीचे प्रमाण १:८ व जाडी पाच सें.मी. इतकी ठेवतात. प्लॅस्लिक फिल्म वाफ्स्ताना त्याचीं जाड़ीं ३oc तें ५oo जी.एस.एम. अमावीं यावर उन्हाचा किंवा भर्तिनील किंग्णांचा विंपरीत परिणाम होत नाही. प्लॅस्लिकचे कापड शैततळ्यात पसखताना मुस्माची किंवा मातींची अणकुचिंदार ठोके वर येऊ नयेत, याची काळजी घ्यावी. तसे असल्यास सुक्या मातीचे किंवा वाळूचे धर पसरुन त्यावर प्लॅस्ट्किचे कापड घड्या पडणार नाही या पद्धतीने टाकावे. शैततळ्याच्या चारही बाजूंनी माथ्यावर ३० × ३० सॅमी. आकाराचे चर खोदून घ्यावेत. या चरात कापड घालून मातीने चर पाण्याच्या वजनामुळे खाली घसरणार नाही व शैततळ्यातील साठविलेले पाणी जर्मिनीमध्ये मुग्णार नाही. शेततळे तयार केल्यानंतर प्राणी कापड चावून खराब करु शकतात तसेच गाई किंवा म्हशींमृद्धा शैततळ्यात पडू शकतात. हे सर्व टाळण्यासाप्ती शैततळ्याच्या चारही बाजूंनी कुंपण करावे.

बाष्पीभवनामुळे होणारा शेततळ्यातील पाण्याचा -हास

शेततळ्यातून बाष्पीभवन प्रक्रियेद्वारे पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. तो टाळणे आवश्यक आहे .त्यासाठी खालील पर्यायाचा अवलंब करावा

  • शेततळ्याच्या सभोवताली झाडे लावावीत ,जेणेकरून वाऱ्याद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होऊ शकेल.

● पाणीसाठ्यावर प्लॅस्लिक भाच्छादन किंवा पालापाचोळा पसरविंल्यास बाघपीभवन कमी करुता येते.

● उन्हाळ्याच्या तीन ते चार महिंन्यात शैततळ्यातील पाण्याच्या पृष्ठभागावर रासायनेिक संयुगे किंवा प्रतिरोधके क्राविंक कालावधीने हे प्रतिरोधक वापरुतात. उत्पादकाने किंलेल्या माहितीनुसार हे एक फॅट्रीभंसीड संयुग आहे. ते पाण्यावर पसरविंल्याने पिंण्याचे पाणी, मासे केिंवा माणसे याना श्रोंका होत नाहीं. अथां एकर तलवाच्या पृष्ठभागासाती एक किलो इव्हॅलाॅक वापरावे.

● निंबोळी तेल किंवा नेिमतेल या वनस्पतीजन्य तेलाचाही वापर बाष्पीभवन नियंत्रणासप्ती करूता येतो. नैसर्गिक तेल असल्यामुळे हे वाफरण्यास भपायकास्क नाही. साधारणतः ३० ते ३५ चॉस मीटर

पाण्याच्या पृष्ठभागासाठी १ लिटर निंबोळी तेलाची आवश्यकता असते.

● थमोंकॉलच्या वापराने बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवता येते. औद्योगीक वसाहतीच्या भागात थमॉकॉल मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने उपलब्ध होतात. थर्मोकॉलचे तुकडे शेततळ्यात सहजपणे पसरविता येतात व त्याचा वापर जास्त कालावधीसाठी करता येवून त्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

शेततळ्याची निगा

शेततळे घेण्यापूर्वी मृद व जलसंधारणाचे उपाय करावेत. जेणेकरून पावसाच्या वाहून येणा-या पाण्याबरोबरच गाळ वाहून येणार नाही. शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या ठिकाणी गाळण यंत्रणा बसवावी विशेष करून शेतामध्ये उताराला आडवी किंवा समतल मशागत करावी. ब-याच ठिकाणी शेततळे भरल्यानंतर जास्तीचे पाणी खालच्या तोंडातून मोकळे न वाहता ते शेततळ्याच्या वरच्या बाजूने शेतात मागे पसरलेले दिसते. याचा अर्थ असा, की शेततळ्याचे खालचे तोंड हे वरच्या तोंडापेक्षा उंच ठेवलेले आहे. त्यामुळे शेततळ्यात पाणी आत येणा-या तोंडापेक्षा पाणी बाहेर जाणारे तोंड हे किमान सहा इंच तरी खाली असावे. बाष्परोधकामुळे पाण्यावर अत्यंत पातळ थर तयार होतो व त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी वातावरणात बाष्प किंवा वाफेच्या स्वरूपात जाणे ४0 ते ५0 टक्क्यांनी कमी होते. याचा वापर पावसाळा सोडल्यास २५0 ते ३00 दिवस करणे उपयोगाचे आहे. वा-याचा वेग जेव्हा जास्त असतो तेव्हा मात्र बाष्परोधके तलावाच्या कडेला जमा होतात व त्यामुळे त्याचा प्रभाव पडत नाही.

शेततळ्याद्वारे सिंचन

सपाट जमिनीवरील अर्धे खोदलेल्या व अर्धे बांधलेल्या शेततळ्यामध्ये (हॉफ, डग आउट) पावसाच्या अपवाधाचे, पावसाचे तसेच बाहेरून इतर स्त्रोताद्वारे पाणी साठवून ठेवू शकतो. अशा शेततळ्याच्या पाणीसाठ्यातून वर्षभर साधारणतः किती क्षेत्र भिजविता येऊ शकते याचे एक उदाहरण माहितीसाठी पुढे दिले आहे.

● शेततळ्याचा प्रकार : हॉफ डग आउट

● शेततळ्याचे जमिनीच्या पृष्ठभागावरील मोजमाप : ३o x ३० मी.

● शेततळ्याच्या आतील बाजूचा उतार : १.१

● शेततळ्याची खोली : ५ मीटर (जमिनीच्या पृष्ठभागावर २ मीटर व पृष्ठभागाखाली ३ मीटर)

अ) शेततळ्याची पाणी साठविण्याची एकूण क्षमता

● जमिनीच्या पृष्ठभागाखाली २७ x २७ x ३ = २१८७ घनमीटर

● जमिनीच्या पृष्ठभागावर ३२ x ३२ × २ = २o४८ घनमीटर एकंदर = ४२३५ घनमीटर = ४२३५o00 लीटर

ब) शेततळ्यातून झिरपा व बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय

शेततळ्याचे अस्तरीकरण केलेल्यो तसेच वर्षभराचे सरासरी पाण्याचे

बाष्पीभवन प्रतिदिवस ४ मि.मी. व वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५00 मि.मी.

असे गृहीत धरून शेततळ्यातून एका वर्षात अंदाजे ६,३0,000 लिटर पाण्याचा या प्रक्रियेद्वारे अपव्यय होईल.

क) सिंचनासाठी उपलब्ध पाणी = ४२,३५,000-६,३0,000 लीटर

=३५,०५,००० लिटर

ड) भाजीपाला पिकाची पाण्याची गरज

एक हेक्टर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन पध्दतीद्वारे दर दिवशी सरासरी ३२,000 लिटर पाण्याची गरज भासू शकते. हंगाम, स्थळ, पीक/पिकाचा तसेच पाण्याची सिंचनासाठी गरज ३६५ दिवसांपैकी ३oo दिवस आहे असे गृहीत धरून एका हेक्टरवर वर्षभरात भाजीपाल्याची तीन पिके घेण्याकरिता ९६,oo,ooo लिटर पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता आहे.

इ) डाळिंब पिकाची पाण्याची गरज

डाळिंब लागवड ४ x ३.५ मीटरवर केली असता दर हेक्टरी ७१५ झाडे बसतात. एका झाडाची सरासरी पाण्याची गरज २५.0 लिटर गृहीत धरून एका हेक्टरला प्रतिदिन सरासरी १७८७५ लिटर पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता आहे. त्यानुसार ३00 दिवसासाठी ५३,६२,५00 लिटर एवढे पाणी आवश्यक आहे.

फ) एकंदर भिजू शकणारे क्षेत्र वर नमूद केलेल्या शेततळ्याच्या पाणी साठ्यातून वर्षभरात भाजीपाल्याची तीन पिके घेतली असता साधारणत: प्रत्येक हंगामात एक पीक घेतले असता साधारणपणे १.५ एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. वर नमूद केलेली आकडेवारी ही उदाहरणासाठी आहे. प्रत्यक्ष पीक/ घेता या आकडेवारीत थोडाफार बदल होऊ शकतो.


स्त्रोत -  कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate