অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय शेती आणि फायदे

कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !
असो. प्राचीन काळापासून जमिनीला मातेचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे आपण जमिनीला भूमाता असे संबोधतो. ज्याप्रमाणे पशुपक्षी, प्राणी व वनस्पती जिवंत आहे. त्याच प्रमाणे माती सुद्धा जिवंत आहे. त्यात असंख्य जीवजंतू वास्तव्य करून राहतात म्हणून आपण भूमाता सजीव आहे असे समजतो.
मनुष्य दिवसेंदिवस स्वार्थी होत आहे. तो स्वत:च्या फायद्यासाठी शेतजमिनीकडे दुर्लक्ष करतो. मनुष्य ज्या प्रमाणे श्वासोच्छ्वास करतो त्याप्रमाणे माती सुद्धा श्वास घेते. मनुष्याला जसे उन, वारा, पाऊस, रोग यापासून संरक्षणाची गरज आहे तसे मातीचे सुद्धा संरक्षण होणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजांनी ही संपत्ती पुढील पिढीकडे जशी जिवंत सोपवली तशी आपणसुद्धा तिचा सांभाळ करून येणाऱ्या पिढीला ती जिवंत स्थितीतच सोपवली पाहिजे. यामुळे अमुल्य अश्या मातीच्या थरांचे आपोआप जतन आणि संवर्धन होऊन मातीचा पोत टिकून राहील.
पूर्वी जमिनीवर झाडे-झुडपे व गवत यांचे आच्छादन असे, त्यामुळे वारा, पाऊस इत्यादिंपासून संरक्षण व संवर्धन हे नैसर्गिकरीत्या होत होते. परंतु माणसाने आपल्या अन्न, पाणी आणि निवार्याच्या गरजा भागविण्यासाठी कालांतराने जमिनीवरील झाडे गवत इत्यादींना तोडण्यास सुरवात केल्याने त्याचा परिणाम जमिनीची धूप होण्यात झाला. जमिनीची धूप झाल्याने झाडांच्या मुळांचा आधार निघून गेला त्यांच्या वाढीस आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा नाश होऊ लागल्याने आणि झाडांना आवश्यक असलेला पाणी पुरवठाही अल्प होऊ लागल्याने त्याचा परिणाम जमिनीची सुपीकता कमी होण्यात झाला आणि त्याचा परिणाम म्हणून कृषीउत्पादकतेत घट होऊ लागली. एक इंच मातीचा थर निर्माण करण्यास निसर्गाला बरीच वर्ष लागतात. परंतु मानवाच्या स्वार्थी, हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे हा थर नाहीसा होण्याची शक्यता आहे. घुपेचे रौद्र रूप विचारात घेता मातीचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.

सेंद्रिय शेती खालील महत्वपूर्ण मुद्यांवर अवलंबून आहे जसे

  • मातीचे संवर्धन,
  • तपमानाचे व्यवस्थापन,
  • पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संवर्धन,
  • सौर उर्जेचा अधिकतम वापर व उपयोग,
  • गरजांमध्‍ये स्‍वावलंबन,
  • नैसर्गिक क्रमचक्र आणि जीवनाच्‍या स्‍वरूपांचे अनुपालन,
  • जनावरांची एकीकृतता,
  • नवीनीकरणीय संसाधनांवर अधिकतम अवलंबन, जसे पशु-बल

सेंद्रीय शेतीची मुख्य वैशिष्‍ट्ये

१) मातीचा सुपीकपणा कायम राखते.
२) सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे, ज्‍यामध्‍ये लहान शेतकर्‍यांसाठी विशिष्‍ट लाभ आहेत. 
सेंद्रीय शेती खालील सुविधांच्‍या योगे अन्न-सुरक्षा आणि गरीबांच्या हाताला काम आणि दोन पैसे जास्त फायदा मिळवून देते. 
  • कमी संसाधने व पाऊसपाणी असलेल्‍या क्षेत्रांत उत्पादनाची वाढ होणे,
  • शेत आणि आसपासच्‍या क्षेत्रात जैव विविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन होणे,
  • मिळकत वाढवणे किंवा खर्च कमी करणे,
  • सुरक्षित आणि विभिन्न खाद्यान्‍नांचे उत्पादन घेणे.
१) मातीचे संवर्धन – रसायनांचा वापर थांबविणे, ओल्‍या गवताच्‍या जागी पिकाचे अवशेष उपयोगात आणणे, सेंद्रीय आणि जैविक खताचा उपयोग करणे, पीक क्रमचक्र आणि बहु-पिकांचा अवलंब करणे, अत्यधिक नांगरणी करणे टाळा आणि मातीस हिरव्‍या किंवा ओल्‍या गवताखाली झाका.
२) तपमानाचे व्यवस्थापन – माती झाकून ठेवा, बांधावर झाडे-झुडपे लावा.
३) माती आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन – पाझर टाक्‍या खणा, उतार असलेल्‍या जमिनीवर समोच्‍च बांध घाला आणि समोच्च पंक्ति शेतीचा अवलंब करा, शेत-तलाव खणा, बांधांवर कमी उंचीचे वृक्षारोपण करा.
४) सौर उर्जेचा वापर करणे - वर्ष भर विविध पिके आणि वृक्षारोपण कार्यक्रमाच्‍या संयोजनाच्‍या माध्यमाने अधिक हिरवाई मिळवा.
५) स्वतःच्या गरजांमध्‍ये स्‍वावलंबन- स्‍वत:च बियाण्‍याचा विकास करा, कंपोस्‍ट, वर्मीकंपोस्‍ट, वर्मीवॉश, द्रव खते आणि वनस्पति अर्काचे उत्पादन.
६) जैववैविध्याचे अनुपालन – जीववैविध्य टिकून राहावे म्‍हणून आवास विकास करा, कीटकनाशकांचा वापर कधीही करू नका, जैववैविध्‍य निर्माण करा.
७) जनावरांची एकीकृतता – जनावरे ही सेंद्रीय व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण घटक आहेत आणि हे फक्‍त पशु-उत्पादनेच पुरवित नाहीत तर मातीमध्‍ये वापर करण्‍यासाठी पुरेसे शेण आणि मूत्र प्रदान करतात.
८) नवीनीकरणीय उर्जेचा वापर - सौर उर्जेचा, बायोगॅस आणि बैलांच्‍या द्वारे चालविण्‍यात येणारे पंप, जनरेटर आणि इतर यंत्रे ह्यांचा उपयोग करा

सेंद्रिय खतांचे प्रकार

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.
सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिक खाण्याचे खत, हाडांछे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.
१) शेणखत : शेण, मुत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फूरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हण्जे बायोगँसमध्ये उर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव 
य म्हणुन वापरले जाते.
२) कंपोस्ट खत :- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थाचे सुक्ष्मजीवजंतु मुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.
३) हिरवळीची खते :- लवकर वाढणा-या पीकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नागराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळते. जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.
गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. 
ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरीसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.
४) गांडूळ खत - ह्या खतात गांडूळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडूळाची अंडीपूंज, बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.
५) माशाचे खत - समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ज्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते याला माशाचे खत म्हणूनही म्हंटले जाते. 
६) खाटीकखान्याचे खत - खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.
डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्गुरू श्री अनिरुद्धबापूंनी) यांनी ग्रामविकासाचा मंत्र दिला व काळाची पावले ओळखून कर्जत कोठम्बे येथे ’अनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्यूट ऑफ ग्रामीण विकास’ हया संस्थेमध्ये सेंद्रिय शेतीचा 
पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरु केला. वरील सर्व गोष्टींचा विचार करता येणाऱ्या काळात संद्रीय शेती करणे सर्वार्थाने उपयोगी होणार आहे.

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate