অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौर ऊर्जा उत्पादनांसाठी भारत सर्वांत मोठी बाजारपेठ

सौर ऊर्जा उत्पादनांसाठी भारत सर्वांत मोठी बाजारपेठ

जर्मनीमध्ये यंदा सौर ऊर्जा उत्पादनांसाठीचे अनुदान कमी करण्यात आल्यामुळे सौर ऊर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्या इतर बाजारपेठांचा अभ्यास करू लागल्या आहेत. यामध्ये भारत हा सौर ऊर्जा उत्पादनांसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ ठरू शकेल, असे अनुमान लक्‍स रिसर्च संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सौर ऊर्जा उत्पादनांबाबत जगातील सर्वांत मोठ्या 15 बाजारपेठांतील स्थितीविषयी या अहवालात अभ्यास करण्यात आला आहे. भारतामध्ये सौरसह इतर अपारंपरिक ऊर्जानिर्मिती उत्पादनांना मोठे अनुदान दिले जाते, यामुळे भारतात ही बाजारपेठ विकसित करण्याची मोठी संधी असल्याचे अनुमान या अहवालात काढण्यात आले आहे.

लक्‍स रिसर्चचे विश्‍लेषक जेसन एक्‍स्टिन म्हणाले, 'भारताची बाजारपेठ, तेथील सरकारी धोरण यामुळे सौर ऊर्जा उत्पादनांसाठी भारत जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ ठरू शकेल.''

भारतासह ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, रशिया, ब्राझील, मेक्‍सिकोमध्येही सौर ऊर्जा उत्पादनांना मोठी बाजारपेठ असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सायप्रस, इस्राईल व मलेशिया या देशांमध्येही चांगली संधी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारताने गेल्या वर्षी सौर ऊर्जा अभियान सुरू केले आहे. याद्वारे 2022 पर्यंत देशात 20 गिगावॉट सौर ऊर्जा निर्मितिक्षमता गाठण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. या अभियानाद्वारे, क्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर मॉड्युल्स निर्मिती करणाऱ्या स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. सध्या भारतात मोसर बेयर, टाटा बीपी सोलार हे क्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर मॉड्युल्सचे प्रमुख उत्पादक आहेत.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate