অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौर निर्जंतुकीकरणासाठी पारदर्शक आच्छादनाचा वापर फायदेशीर

सौर निर्जंतुकीकरणासाठी पारदर्शक आच्छादनाचा वापर फायदेशीर

सौर निर्जंतुकीकरणासाठी जमिनीवर पारदर्शक आच्छादनाचा वापर

पिकामध्ये मातीतून येणाऱ्या रोग व किडीमुळे मोठे नुकसान होत असते. ते टाळण्यासाठी प्रामुख्याने रासायनिक पद्धतीचा वापर केला जातो. मात्र, दक्षिण अरिझोना येथील पॉलीटनेलमध्ये सौर निर्जंतुकीकरणासाठी जमिनीवर पारदर्शक आच्छादनाचा वापर अधिक फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. उन्हाळ्यामध्ये एका आठवड्यापेक्षा कमी काळामध्ये निर्जंतुकीकरण करणे शक्‍य होते. हे संशोधन "हॉर्ट सायन्स'मध्ये प्रकाशित झाले आहे.

ज्या भागामध्ये अधिक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो, अशा ठिकाणी सौर निर्जंतुकीकरण ही पद्धती अधिक फायदेशीर ठरू शकते. ही पद्धती अन्य फ्युमिगेशन सोबतही वापरता येते. निर्जंतुकीकरणाच्या कार्यक्षमता मातीचे तापमान किती वाढते, त्यावर अवलंबून असते. ओलसर मातीमध्ये पाण्याची वाफ होऊन तापमान अधिक काळ वाढलेले राहते. हॉर्ट सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, दक्षिण अरीझोना येथील तापमान सौर निर्जंतुकीकरणासाठी आदर्श आहे. संशोधक उर्सुला शुच, हॅन्सन आणि टिलक महातो यांनी पारदर्शक पॉलीइथिलीन आच्छादनांची कार्यक्षमता तपासण्यासाठी काही प्रयोग केले. त्यांनी विविध प्रकारच्या पॉलीइथिलीन सोबत तुलनात्मक अभ्यास केला. त्यातून पिकातील तणे आणि अन्य किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल. त्याविषयी माहिती देताना उर्सुला शुच यांनी सांगितले, की अन्य महिन्याच्या तुलनेमध्ये जून महिन्यात या विभागामध्ये दिवसा सूर्याची किरणे आणि तापमान अधिक राहते. उन्हाळ्यातील महिन्यांच्या सुरवातीच्या काळात सापेक्ष आर्द्रताही कमी असते, त्यासोबत वाढलेले तापमान सौर निर्जंतुकीकरणाकरिता आदर्श ठरते. या कालावधीमध्ये लागवडीची क्षेत्रेही तयार होत असतात.

असा आहे प्रयोग

  • तुस्कान येथील दोन उंच टनेलमध्ये प्रयोग केले गेले. मे अखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन्ही टनेलमध्ये पारदर्शक पॉलीइथिलीन आच्छादनाचा (अतिनिल किरणे स्थिर करणाऱ्या गुणधर्मांच्या) वापर केला. पूर्णपणे पाण्याने भिजवलेल्या गादीवाफ्यावर आच्छादन केले. त्या वेळी प्रतिदिन सौर किरणांचे सरासरी 29.8 मिलीज्यूल प्रतिवर्गमीटर आणि बाह्य तापमान 38 अंश सेल्सिअस होते. मातीतील पाच सेंटीमीटर खोलीपर्यंतचे तापमान 45 ते 55 अंश सेल्सिअस अनुक्रमे 15 आणि 8 तास प्रतिदिन राहिले. या प्रक्रियेमुळे मातीतील रोगकारक सूक्ष्मजीव, किडी आणि तणांचे बीज यांचा नायनाट होण्यास मदत झाली.
  • प्रयोगामध्ये मातीचे तापमान 15 सेंटीमीटर खोलीपर्यंत निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त राहते. केवळ एक आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.
  • टनेलच्या बाहेर शेतीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी थोडा अधिक कालावधी लागतो. तरीही ते फायदेशीर राहते.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate