অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ॠषिकृषी तंत्रज्ञान

ॠषिकृषी तंत्रज्ञान

आदिमानव रानटी अवस्थेत असताना जंगलातल्या झाडपाला आणि फळांवर आपली गुजराण करीत असावा.  त्याच्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली.  त्यांची संख्या वाढू लागली तसेतसे ते आदिमानव पाण्याच्या शेजारी वास्तव्य करू लागले.  जंगलातला एखादा पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्यात येऊ लागला.  त्याची पुनरुत्पत्ती होऊ शकते, हे लक्षात आल्यावर त्याने त्याच्या बिया लावल्या असाव्यात.  त्या यशस्वी झाल्यानंतर पुन्हा पुन्हा लावल्या जावून आदिमानव डे खाद्य खाऊ लागला असेल.  मला वाटत हीच ती कृषी संस्कृतीची सुरुवात असावी.

पाच हजार वर्षापूर्वी अरण्यात ॠषिमुनीचे आश्रय होते.  धनुर्विद्या शिकण्यासाठी शिष्य असायचे.

आश्रमाच्या आसपास त्या वेळचे ॠषी फळझाड आणो खाण्यासाठी भाजीपाला आणि तृणधान्य लावायचे.  त्यांची त्या वेळची शेती करण्याची पद्धत ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून होती.  त्याचं शोध आणि माहिती घेण्याचा प्रयत्न आजऱ्याचे जाणकार आणि अभ्यासू शेतकरी श्री.  देशपांडे यांनी केला.  अभ्यासांती आणि पुराणातले काही दाखले याच्यावरून त्यांनी, ॠषिमुनी कशा पद्धतीने शेती करायचे आणि कशाकशाचा वापर करीत होते हे शोधून काढले.  त्यातूनच हे ॠषिकृषी अंतर विकसित केले गेले.

एक जीव दुसऱ्या जीवाच्या बलीदानावर जगतो.  हे अंतिम सत्य ॠषिमुनिंनी सांगितलेले अगदी खर आहे.  वनस्पती अगदी सजीव आहेत आणि या सजीव वनस्पती जमिनितल्या असंख्य सूक्ष्मजीवांना मारून त्यांच्या अवशेषावर जगतात – वाढतात (आताचे शास्त्र सुद्धा हेच सांगतेय.)

वनस्पती आपल अन्न म्हणून सुक्ष्मजंतूचं शोषण करून घेतात.  तसच सुर्याप्रकाशातला कर्ब ग्रहण करूनही अन्न तयार करतात.  हे दोन्ही प्रकारचे ज्ञान ॠषिमुनिंनी समजावून घेतले असावे आणि मग त्या दृष्टीने त्यांनी त्यावेळची शेती केली.  सूर्यप्रकाशाच्या निर्मिताचा प्रश्न येत नाही.  फक्त वनस्पतींनी स्वतः साठी अन्न म्हणून शोषून घेतलेल्या मृत सुक्ष्म्जीवांची उणीव भरून काढण्याचा प्रश्न होतो.  त्याचा त्यानी मार्ग शोधून काढले.  ते मार्ग म्हणजेच ॠषिकृषी तंत्रज्ञान.  ते मार्ग म्हणजे (वडाच्या झाडाच्या पारंब्याखालाची माती) अमृतपाणी, बीजसंस्कार आणि आच्छादन.

वडाच्या झाडाच्या पारंब्याखालची १५ किलो माती १ एकरात सारख्या प्रमाणात पसरून मिसळायची म्हणजे सूक्ष्मजीव निर्माण होतील.  वडाची मातीच का?  तर त्यात गांडूळ खूप निर्माण होतात.  वडाच्या झाडावर पक्षांचा राहवाटा असतो.  त्यामूळे मलमूत्र जमिनीवर फार पडते आणि पारंब्यामध्ये नवनिर्मिती साठी लागणारे हार्मोन्स – इन्झाइमची निर्मिती करण्याचा प्रचंड गुण असतो.  (जनावर माजावर येण्यासाठी या पारंब्या खाऊ घालतात, आपणही कोवळ्या पारंब्याचा रस प्यायलो तर प्रचंड शक्ती जोम येतो.) म्हणून ही माती फार उपयुक्त ठरते.

या सूक्ष्मजीव – जंतूची वाढ करण्यासाठी अमृतपाणी वापरावे.  यासाठी पाव किलो देशी गाईच तूप + अर्धा किलो मध + १० किलो देशी गाईचे शेण + २०० लिटर पाणी यांचे मिश्रण म्हणजे अमृतपाणी.  हळद – आलं यांचे बियाणे या मिश्रणात बुडवून लावावे.  याची पिकावर फवारणी करावी.  जमिनीवर शिंपडावं म्हणजे सूक्ष्म जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते.

बिजसंस्कारांसाठी : बी सजीव असते म्हणून प्रकीया न करता संस्कार करावे लागतात.  बिजसंस्कारांसाठी अंगारा १ किलो (वडाच्या पारंब्याखालची माती) आणि अमृतवाणी याचं रबडी होईपर्यंत मिश्रण कराव आणि जे बी पेरायचे आहे.  त्या बियांवर ही रबडी एकसारखी बसेल अशा पद्धतीने शिंपडावी आणि मग ते बी पेरावं.  कडधान्ये, ताग वगैरेसारख्या बियाण्याला अंगारा ++ अमृतपाण्याच्या राबडीचे संस्कार करून सावलीत वाळवून पेरलं असता खुपचं चांगल पीक येत.

अंगारा – अमृतपाणी आणि बीजसंस्कार या तीनही गोष्टी कोणत्याही पीकपेरणीच्या वेळी केल्या तर खूपच फायदा होतो.  या तीन गोष्टींमुळे जमिनीत ८ -१० दिवसांत प्रचंड संखेने गांडुळे निर्माण होतात आणि एकदा गांडूळाचं कार्य सुरु झाल की, सूक्ष्म जीवाणू प्रचंड प्रमाणावर वाढतात.  जमिनीत हवा खेळती राहते.  ओलावा टिकतो.  गांडूळ म्हणजे योग्य वेळी योग्य असं पिकाच खाद्य तयार करून देणारा खत – कारखाना पिकांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचं सूक्ष्मजीव पुरवितो.  त्यामुळे पिक जोमाने वाढतात.

हे ॠषिकृषी तंत्रज्ञान अतिशय नगण्य खर्चाच असल्याने, शिवाय ॠषिमुनिंच्या काळातील्या कृषी संस्कृतीतल असल्याने, सकृतदर्शनी पटण्यासारख असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी एक अनुभव  म्हणून करून पाहावं.  जर पटलं, यश आलं तर, इतर तंत्रज्ञानाबरोबर याचाही वापर करायला काहीच हरकत नाही.

 

लेखक: प्रल्‍हाद यादव

स्‍त्रोत - कृषी प्रवचने

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate