Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 19:11:42.092096 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / काजूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
शेअर करा

T3 2019/05/26 19:11:42.096737 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 19:11:42.122276 GMT+0530

काजूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. काजू उत्पादनापासून मिळणा-या फायद्यातून आता शेतकरी व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करत आहे.

काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. काजू उत्पादनापासून मिळणा-या फायद्यातून आता शेतकरी व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेमुळे काजू पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढण्याचे प्रक्रिया उद्योग प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. काजूची बोंड़े फेकून दिले जातात. जवळजवळ उत्पादनाच्या ९० ते ९५ टक्के काजूची बाँडे वाया जातात.

काजू बोंडामध्ये पाणी-८७.९ टक्के, प्रथिने ०.२ टक्के, स्निग्ध पदार्थ ०.1 टक्के, पिष्टमय पदार्थ ११.६ टक्के, व क जीवनसत्च -२६८ मिलिंग्रॅम प्रति 100 ग्रॅम फळात असते. शिवाय कॅल्शियम फॉस्फरस व लोह इ. खनिजट्रन्थे थोड़या प्रमाणात असतात. चाया जाणा-या या काजू बोंडापासून सिरप, नेक्टर, जॅम, चटणी, कॅन्डी, सरबत इ. अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात.

पेय

काजू बोंडापासून पेय तयार करण्यासाठी चांगली पक, कीड़विरहित व ताजी बोंड़े निवड़ाचीत. निवड़लेली काजू बॉड़े स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. ही बोंडे मलमलच्या कापडात बांधून २ टक्के (२० ग्रॅम मीठ प्रतिलिटर पाणी) मिठाच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावीत. सर्व काजू बोंडे मिठाच्या द्रावणातून बाहेर काढून स्वच्छ पाण्यात थंड होण्यासाठी ठेवावीत. थंड झाल्यावर बोंडातील रुस बास्केट प्रेसच्या सहाय्याने काढून घ्यावे. काढलेला स्स ३ ते ४ तास मोठ्या स्टीलच्या पातेल्यात तसाच ठेवावा. त्यामुळे रसातील जड कण पातेल्याच्या तळाशी बसतील. पातेल्यातील वरचा रस दुस-या पातेल्यात मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. या गाळलेल्या रसातून खाली दिलेल्या घटकांच्या प्रमाणात काजू  बोंडापासून सरबत बनवावे .

घटक प्रमाण (१ किलो पेयासाठी )
काजू बोंडाचा रस ५०० ग्रॅम
साखर १४० ग्रॅम
सायट्रिक आम्ल २ ग्रॅम
पाणी ३५८ ग्रॅम
पोटॅशियम मेटाबायसल्फाईड ७४० मिलीग्रॅम

वरील सर्व घटक चांगले मिसळून मिश्रण मलमलच्या कापडातून


गाळून घ्यावे. नंतर मिश्रण गरम करून पोटॅशियम मेटाबायसल्फाईड त्यात मिसळाचे व ते गरम असतानाच निर्जतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरावे. नंतर बाटल्या त्वरित बंद करून बाटल्या उकळत्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून ठेवाव्यात. बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.

चटणी

काजू बोंडापासून जॅम तयार करण्यासाठी काजू बोंडापासून लगदा करून घ्यावा. चटणीसाठी लागणा-या विविध घटकांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

साहित्य :

घटक प्रमाण (१ किलो पेयासाठी )
काजू बोंडाचा रस १ किलो
साखर १ किलो
वेलची १५ ग्रॅम
दालचिनी १५ ग्रॅम
लाल मिरची पूड १५ ग्रॅम
आले १५ ग्रॅम
बारीक चिरलेला कांदा ६० ग्रॅम
लसून १५ ग्रॅम
मीठ ६० ग्रॅम
व्हिनेगार ९० मी.ली.

कृती: चटणी तयार करण्यासाठी प्रथम काजू बोंडाच्या गरामध्ये साखर व मीठ मिसळून एकत्र ठेवावे. सर्व मसाले एकत्र बारीक करून ते मलमलच्या कापडात बांधून पुरुचुडी तयार करून ती उकळत ठेवलेल्या मिश्रणात सोडावी. मिश्रण जॅमप्रमाणे घट्ट झाल्यावर ती पुरचुंडी काढून घ्याची व त्यात व्हिनेगार व २५० मिलिंग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात सोडियम बेंझोऐट हे परिरक्षक मिसळाचे व थोडा वेळ उकळून घ्यावे. अशाप्रकारे तयार केलेली चटणी गरम असतानाच निर्जतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरुन त्यावर पातळ मेणाचा थर द्यावा.

बाटल्यांना झाकणे लावून त्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. सिरप: काजू बोंडापासून स्स काढून घ्यावा. १ किलो स्सासाठी २ किलो साखर व २५ ग्रॅम सायट्रिक आम्ल एकत्र मिसळून साखर विरघळेपर्यंत गरम करावे आणि मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये सोडियम बेंझोऐट हे परिरक्षक ७१० मिलिग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात मिसळावे. अशा प्रकारे तयार केलेला सिरप निर्जतुक केलेल्या बाटलीत भरावा. नंतर बाटल्यांना झाकण लावून हवाबंद कराव्यात आणि बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. काजूसिरपमध्ये १:४ या प्रमाणात पाणी मिसळून काजू सरबत तयार करून आस्वाद घ्यावा.

स्कॅश

काजू बोंडापासून स्कॅश तयार करण्यासाठी वरील दिल्याप्रमाणे काजू बोंडापासून रस काढून घ्यावा. १ किलो काजू स्कॅश तयार करण्यासाठी २५० ग्रॅम काजू बोंडाचा स्स, ४२० ग्रॅम साखर, ७५ ग्रॅम सायट्रेिक आम्ल व ३२५ ग्रॅम पाणी एकत्र मिसळून मलमलच्या कापडातून पुन्हा गाळून घेऊन गरम करावे. गरम असतानाच त्यात ७५० मिलिग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड हे परिरक्षक मिसळावे. निर्जतुक केलेल्या बाटल्यात भरून ते पाश्चरीकरण करावे. काजू स्कॅशमध्ये १.२ या प्रमाणात पाणी मिसळून त्याचा आस्वाद घ्यावा.

जॅम

काजू बोंडापासून जॅम तयार करण्यासाठी सर्वप्रथम चांगली, पक, कीड़विरहित व ताजी बोंड़े निवड़ाचीत. निवड़लेली काजू बॉड़े स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. धुतलेली सर्व काजू बोंडे मलमलच्या कापडात बांधून २ टक्के (२० ग्रॅम मीठ प्रतिलिटर पाणी) मिठाच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावीत. सर्व काजू बोंडे मिठाच्या द्रावणातून बाहेर काढून स्वच्छ पाण्याने ३ ते ४ वेळा धुऊन घ्यावीत. स्टेनलेस स्टीलच्या सहाय्याने बोंडाचा बीकडील भाग कापून घ्यावा. कापलेली सर्व फळे मिक्सरमध्ये काढून त्याचा चांगला लगदा करावा. या लगद्यामध्ये एकास एक या प्रमाणात साखर मिसळून घट्ट होईपर्यंत मिश्रण चांगले उकळावे. जॅम गरम असतानाच निर्जतुक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरावा. बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

2.82222222222
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 19:11:42.411283 GMT+0530

T24 2019/05/26 19:11:42.418227 GMT+0530
Back to top

T12019/05/26 19:11:42.011643 GMT+0530

T612019/05/26 19:11:42.030174 GMT+0530

T622019/05/26 19:11:42.082117 GMT+0530

T632019/05/26 19:11:42.082884 GMT+0530