Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:55:21.070318 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 23:55:21.075516 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:55:21.103331 GMT+0530

गूळ निर्मिती

ऊस तोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे, अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

1) ऊस तोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे, अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

2) ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्‍स असलेल्या चरक्‍याची निवड करावी.

3) गुऱ्हाळासाठी चरक्‍याची गाळप क्षमता 65 ते 70 टक्केपर्यंत असावी. गाळप वाढल्यास सूक्ष्म कचऱ्याचे प्रमाण वाढते, रसातील सुक्रोजचे प्रमाण वाढते; परंतु खनिजे आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे गुळाचे औषधी महत्त्व कमी होते.

4) उसाच्या रसात फिनॉलिक द्रव्ये असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास त्याचा गुळाच्या रंगावर विपरीत परिणाम होतो. म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क टाळावा.

5) स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणात गूळ तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरक्‍याचा वापर करावा.

6) द्विस्तरीय पद्धतीच्या गाळणीतून रस चांगला गाळून घेऊन "फूड ग्रेड'चे प्लॅस्टिक अथवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा. मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या साहाय्याने प्लॅस्टिकच्या अथवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा.

7) हौदातून स्वच्छ रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून तो काहिलीत पुढील प्रक्रियेसाठी घ्यावा.

8) रस उकळण्यासाठी सुधारित काहिलीचा वापर करावा. या काहिलीच्या वापरामुळे गूळ प्रक्रियेसाठी साधारणपणे 16 टक्के कमी कालावधी लागतो. इंधनामध्ये 15 टक्‍क्‍यांची बचत होते.

9) रस उकळण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चिमणी चुलाण वापरावे. चुलाणावरून काहिल उतरण्यासाठी "फ्रेम- चाके- रूळ' यांचा समावेश असलेली यांत्रिक पद्धत वापरावी.

संपर्क - 0231 - 2651445 
प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

स्त्रोत: अग्रोवन

3.0157480315
baban Jan 27, 2018 05:32 PM

गुळ व पावडर उद्योगासाठी परवानगी लायसन्स. लागते का

प्रविण पवार Mar 26, 2017 01:29 PM

गुळ पावडर उद्योगासाठी परवानगी लायसन्स. लागते का

प्रविण पवार Mar 26, 2017 01:26 PM

गुळ पावडर उद्योगासाठी परवानगी लायसन्स. लागते का

नरसिंग देशमुख Jun 23, 2015 05:22 PM

गुळ तयार करण्या विषयीची चांगली माहिती दिली,त्या बद्दल आभार.गुळाची पावडर हल्ली शहरातून वापरली जाते आहे.तेंव्हा गुळ पावडर कशी तयार करावी या बद्दल माहिती देण्यात यावी.

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:55:21.472543 GMT+0530

T24 2019/10/14 23:55:21.478999 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:55:20.921187 GMT+0530

T612019/10/14 23:55:20.940592 GMT+0530

T622019/10/14 23:55:21.047031 GMT+0530

T632019/10/14 23:55:21.047961 GMT+0530