Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 09:46:52.347357 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / डाळिंब आणि पेरुपासून क्रश
शेअर करा

T3 2019/05/20 09:46:52.352052 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 09:46:52.377799 GMT+0530

डाळिंब आणि पेरुपासून क्रश

डाळिंब आणि पेरू या फळांपासून बनविलेले क्रश हे पचनास सोपे तसेच गुणकारी व शरीरासाठी आरोग्यदायी असते.

डाळिंब आणि पेरू या फळांपासून बनविलेले क्रश हे पचनास सोपे तसेच गुणकारी व शरीरासाठी आरोग्यदायी असते. क्रश या पेयामध्ये एफ.पी.ओ.नुसार २५ टक्के फळांचा लगदा, ३.५ टक्क्यांपेक्षा कमी आम्लता आणि ५५ ब्रिक्स इतके साखरेचे प्रमाण असले पाहिजे. या फळांपासून बनवलेले क्रश हे बाजारात असलेल्या विविध कार्बोनेटेड पेथांपेक्षा उत्तम मानले जाते. कारण यामध्ये शरीरासाठी लागणारी पोषकतत्त्चे भरपूर प्रमाणात आढळतात.

डाळिंब

● डाळिंबामध्ये आम्लपदार्थ, साखर, जीवनसत्चे, खनिजे ही भरपूर प्रमाणात आढळतात. डाळिंबाचा रस हा आनुवंशिकतेने येणा-या मधुमेह आजाराला बरा करू शकतो.

● डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आढळतात. डाळिंबाचा रस ह्या रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आजाराला दूर ठेवतो. त्वचेवर तेज येण्यासाठी आणि स्मृती वाढविण्यासाठी देखील डाळिंबाचा रस उपयोगी पडतो.

पेरू

पेरू या फळामध्ये 'क' आणि 'अ' या जीवनसत्चांचे प्रमाण भरपूर आढळते. तसेच लोह फॉस्फरस आणि कॅल्शिअमसारखी खनिजे आढळून येतात. तसेच, संत्राच्या फळापेक्षा पाच पट जास्त 'क' जीवनसत्च आढळून येते. पेरू हे फळ कर्करोग, मधुमेह या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. पेरु हे फळ वजन कमी करण्यास मदत प्रक्रेिया :

अ) इाळिंबाचा रस काढण्याची प्रक्रिया

● परिपक डाळिंब स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.

● डाळिंबाची साल बाजूला काढून दाणे वेगळे करावेत. त्या द्वण्यांना दाब देऊन स्स वेगळा करावा. ह्या स्स गाळून घ्यावा.

ब) पेरूचा लगदा काढण्याची प्रक्रिया

● परिपक पेरु स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. पेरुचे छोटे-छोटे काप करावेत. त्या तुकड्यांचा लगदा करावा.

● तो लगदा चाळून घ्यावा. लगद्यापासून बिया वेगळ्या कराव्यात.

क) क्रश बनविण्याची प्रक्रिया

● डाळिंबाचा रस आणि पेरुचा लगदा एकत्र करावा. साखर, पाणी, सायट्रिक आम्लाचा उपयोग करून पाक तयार करावा.

● हा पाक डाळिंबाचा रस आणि पेरुचा लगदा यासोबत एकत्र करावा. या मिश्रणाला मंद आचेवर ५५ ब्रिक्स इतका टी.एस.एस. येईपर्यंत ठेवावे.

● हे पेय गरम असतानाच बाटल्यांमध्ये भरुन ठेवावे. या बाटल्यांमध्ये भरलेल्या पंथाला पाश्चराईज करावे.

● पाश्चराईज केल्यानंतर त्याला थंड करावे. थंड केलेल्या बाटल्यांना पुढील वापरासाठी साठवून ठेवावे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

2.95555555556
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 09:46:52.694890 GMT+0530

T24 2019/05/20 09:46:52.718625 GMT+0530
Back to top

T12019/05/20 09:46:52.266532 GMT+0530

T612019/05/20 09:46:52.285686 GMT+0530

T622019/05/20 09:46:52.337335 GMT+0530

T632019/05/20 09:46:52.338139 GMT+0530