Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:16:18.441520 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/15 00:16:18.446534 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:16:18.483771 GMT+0530

पनीर

दुग्धजन्य पदार्थांपेक्षा पनीरमध्ये अधिक पोषण मूल्य असते.

पनीरदुग्धजन्य पदार्थांपेक्षा पनीरमध्ये अधिक पोषण मूल्य असते. गरम दुधात सायट्रिक आम्ल मिसळल्यानंतर साकाळून वेगळे झालेले हिरवे पाणी (व्हे) काढून शिल्लक राहिलेल्या साक्‍यास दाब देऊन घट्ट केलेला पदार्थ म्हणजेच पनीर. पनीरमध्ये आर्द्रता 52.3 टक्के, स्निग्धांश 27.0 टक्के, प्रथिने 15.8, दुग्ध शर्करा 2.3 टक्के, खनिजे 1.9 टक्के असतात. उतारा - म्हशीच्या एक लिटर दुधापासून 160 ते 170 ग्रॅम, तर गाईच्या एक लिटर दुधापासून 120 ते 130 ग्रॅम पनीर मिळते. 

प्रक्रिया

-प्रथम स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये ताजे, स्वच्छ, निर्भेळ तीन लिटर दूध घ्यावे. 
-भांड्यातील दूध 82 अंश सेल्सिअस तापमानास पाच मिनिटे तापवावे, दूध तापवत असताना त्यास अधूनमधून ढवळत राहावे. 
-दुधाचे तापमान 75 ते 76 अंश सेल्सिअसपर्यंत कमी करावे, त्यामध्ये एक टक्का सायट्रिक आम्लाचे द्रावण बारीक धारेने मिसळावे. 
-थोड्याच वेळात दूध फाटलेले किंवा साकाळलेले दिसून येईल. साकाळलेल्या दुधातून बाहेर येणारे हिरवट- निळसर स्वच्छ पाणी दिसू लागेल, त्याच क्षणी सायट्रिक आम्लाचे द्रावण टाकणे आणि ढवळणे थांबवावे. 
-दुधातील घनपदार्थाचा साका बनलेला असेल, तो भांड्याच्या तळाला बसू द्यावा. 
-दुसऱ्या पातेल्याच्या तोंडावर तलम कापड बांधून त्यावर साकेसह फाटलेले दूध ओतावे, त्यामुळे साका किंवा छन्ना कापडावर जमा होईल. 
-वेगळ्या झालेल्या साक्‍यास कापडासह विशिष्ट आकाराच्या साच्यात ठेवून दाब द्यावा. 
-तयार झालेल्या पनीरचा पोत चांगला होण्यासाठी त्यास मीठमिश्रित (एक टक्का) थंड पाण्यात अर्ध्या तासापर्यंत ठेवावे. 
-थंड झालेल्या पनीरला शीतकक्षात साठवून त्याचा गरजेप्रमाणे वापर करावा.
- डॉ.पतंगे - ७५८८५७७९४१

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

2.96899224806
विनायक शिंपुकडे Jan 18, 2018 10:57 PM

नमस्कार सर
पनीर व्यवसायांसंबंधीत अधिक माहिती सांगा सर
इचलकरंजी. जि.कोल्हापूर
मोबा. नं . 98*****08

रामेश्वर फुलझलके Sep 26, 2017 08:59 AM

पनीर साठी बाजार आहे का सर
सर आपणाशी हा जोडधंदा सुरु करण्यासाठी काय भांडवल लागेल ,या
सर सरकार कडून काही अनुदान किंवा बँकेकडून लोन मिळेल का
त्यासाठी आणखी कच्चा माल काय लागेल .
सर मला मार्गदर्शन करा माझा मोबाईल नंबर 70*****96

दयानंद निकम Aug 19, 2017 10:39 PM

सर पनीर बद्दल सर्व माहिती व मार्गदर्शन मिळावे ही विंनती
माझा मोबाईल नंबर 95*****52

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:16:18.822239 GMT+0530

T24 2019/10/15 00:16:18.828421 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:16:18.355693 GMT+0530

T612019/10/15 00:16:18.375014 GMT+0530

T622019/10/15 00:16:18.430222 GMT+0530

T632019/10/15 00:16:18.431100 GMT+0530