Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:28:46.707167 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / पेरूपासून तयार करा जॅम, जेली
शेअर करा

T3 2019/10/17 05:28:46.712050 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:28:46.738714 GMT+0530

पेरूपासून तयार करा जॅम, जेली

जेली तयार करण्यासाठी कच्चे परंतु पूर्ण वाढ झालेले पेरू वापरतात. प्रथम पेरू थंड पाण्याने स्वच्छ धुऊन त्याच्या लहान आकाराच्या फोडी करून घ्याव्यात.

जेली

जेली तयार करण्यासाठी कच्चे परंतु पूर्ण वाढ झालेले पेरू वापरतात. प्रथम पेरू थंड पाण्याने स्वच्छ धुऊन त्याच्या लहान आकाराच्या फोडी करून घ्याव्यात. या सर्व फोडी एका पातेल्यात (स्टेनलेस स्टील) घेऊन त्या पूर्ण बुडतील इतके पाणी घेऊन त्यामध्ये फोडीच्या प्रति किलोस दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून फोडी चांगल्या (अर्धा तास) शिजवाव्यात.

पातेल्यातील लगदा थोडा थंड झाला, की मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. कापडावर राहिलेला लगदा परत त्याच्या वजनाच्या 50 टक्के पाणी मिसळून साधारण 30 मिनिटे पुन्हा शिजवून घ्यावा. पल्प/लगदा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. दोन्ही वेळेस तयार झालेला रस एकत्र करून तो उभट भांड्यात रात्रभर स्थिर ठेवावा. दुसऱ्या दिवशी निवळलेला स्वच्छ रस काळजीपूर्वक दुसऱ्या पातेल्यात गोळा करावा.

पेरूच्या निवळलेल्या स्वच्छ रसापासून जेली तयार करण्यापूर्वी त्याची पेक्‍टीनसाठी परीक्षा करावी. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात रस वजन करून घ्यावा. त्यातील पेक्‍टीनच्या प्रमाणानुसार प्रति किलोस एक किलो (जास्त पेक्‍टीन असेल तर) किंवा तीन-चार किलो (पेक्‍टीन कमी असेल तर) साखर मिसळावी.

नंतर हे मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवावे. मिश्रण घट्ट होण्यास सुरवात झाल्यानंतर परीक्षण करावे. जेली परीक्षणासाठी एका चमच्यात थोडी जेली घेऊन ती थंड करावी व चमचा हळुवारपणे तिरपा करावा. मिश्रण एकसंध घट्ट स्वरूपात खाली पडले तर जेली तयार झाली असे समजावे. तयार झालेल्या जेलीमधील एकूण विद्राव्य घटक रिफ्रॅक्‍टोमीटरच्या साह्याने मोजल्यास 67 अंश ब्रिक्‍सच्या वर गेले तर जेली तयार झाली असे समजावे. जेली तयार झाल्याची खात्री झाल्यावर ती गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या कोरड्या रुंद तोंडाच्या बाटल्यांत भरावी व ती बाटली व्यवस्थित हवाबंद करून कोरड्या जागी ठेवावी.

जॅम

जॅम बनविताना परिपक्व फळे निवडून त्यापासून पल्प/ लगदा काढावा. प्रमाणीकरणानुसार कमीत कमी पल्प 45 टक्के, एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 68.5 टक्के व आम्लता 0.8 ते 1.0 टक्का असणे आवश्‍यक आहे. त्यानुसार एक किलो पल्प असेल तर त्यामध्ये 1.350 किलो साखर, 1.2 ग्रॅम सायट्रिक आम्ल व 1.5 ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट मिसळणे आवश्‍यक आहे.

प्रथम पल्प व साखर एकत्र करून घ्यावा. हे मिश्रण शेगडीवर ठेवून चांगले गरम करून, घट्ट करून घ्यावे. मिश्रण घट्ट होत आल्यानंतर त्यामध्ये सायट्रिक आम्ल व परिरक्षक टाकावे. परिरक्षक व सायट्रिक आम्ल टाकण्याच्या वेळी प्रथम ते एका ग्लासमध्ये विरघळून घेऊन मगच टाकावे. जॅम तयार झाल्याच्या चाचण्या घेऊनच नंतर रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये गरम टाकून हवाबंद करावा. तयार झालेला जॅम कोरड्या जागी व्यवस्थित साठवावा. सायट्रिक आम्ल आणि पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट वापरताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

जॅम तयार झाल्याच्या चाचण्या

रिफ्रॅक्‍टोमीटरच्या साह्याने एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण 68.5 अंश ब्रिक्‍सच्या वर असल्यास जॅम तयार झाला असे समजावे. मिश्रण एका चमच्यात घेऊन थंड करून खाली पाडण्याचा प्रयत्न केला तर ते एकसंध घट्ट स्वरूपात खाली पडते. एका पसरट ताटात पाणी घेऊन त्यामध्ये थंड केलेल्या मिश्रणाचा एक थेंब टाकला तर तो थेंब जशाच्या तशाच राहिला तर जॅम तयार झाला असे समजावे.

पेरूचे महत्त्व

पेरूच्या सरदार (लखनौ-49), अलाहाबाद सफेद, बनारसी या महत्त्वाच्या जाती आहेत. पेरू हे "क' जीवनसत्त्वयुक्त फळ आहे, त्यामुळे हिरड्या बळकट होतात, अन्नपचनास मदत होते व चांगली भूक लागते. जेवणानंतर पेरू खाल्ल्याने पचन सुलभ होते. या फळातील कॅल्शिअममुळे दात व हाडे मजबूत होतात.

हे फळ ताजे असताना खाल्ले तर फार चविष्ट लागते. या फळात आवळ्याच्या खालोखाल "क' जीवनसत्त्व आढळते. पेरू फळात जितके जीवनसत्त्व "क' असते त्याच्या 80 टक्के ते पेरूच्या बियांमध्ये असते, तसेच पेरूच्या गरापेक्षा पेरूच्या सालीमध्ये जीवनसत्त्व "क'चे प्रमाण जास्त असते. हे फळ स्वच्छ करून धुऊन बिया व सालीसहित खाणे फायद्याचे आहे. पेरूची फळे पिकल्यावर त्यामध्ये बहुतेक करून फ्रुक्‍टोज प्रकारची सहज पचणारी अतिगोड शर्करा असते; मात्र अनशापोटी पेरू खाल्ल्याने किंवा जास्त प्रमाणात पेरू खाल्ल्याने जुलाब होतात, पोट फुगते व ताप येतो.

पेरूच्या झाडाचे लाकूड शेतीची छोटी-छोटी अवजारे, नक्षीकाम यासाठी वापरतात. झाडाची साल व सुकलेली पाने यापासून भगवा रंग तयार करून तो कपडे रंगविण्यासाठी वापरतात. झाडाच्या सालीच्या रसाने जखमा बऱ्या होतात. साल पाण्यात उकळून गुळण्या केल्यास दातांचे दुखणे थांबते. याची पाने हगवणीवरसुद्धा गुणकारी असतात.

 

स्त्रोत: अग्रोवन

2.92105263158
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:28:47.040098 GMT+0530

T24 2019/10/17 05:28:47.046848 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:28:46.619060 GMT+0530

T612019/10/17 05:28:46.638164 GMT+0530

T622019/10/17 05:28:46.696522 GMT+0530

T632019/10/17 05:28:46.697387 GMT+0530