Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:28:26.560512 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/17 05:28:26.565168 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:28:26.591359 GMT+0530

फळांचे लोणचे

कैरीच्या फोडी १ किलो, मीठ २५० ग्रॅम, मेथी पूड ५० ग्रॅम, जिरे ९५ ग्रॅम, लाल तिखट ३0 ग्रॅम, काळे जिरे ९५ ग्रॅम, बडीशेप ३0 ग्रॅम, तिळाचे अथवा मोहरीचे तेल २५० ग्रॅम.

कैरीचे लोणचे

साहित्य :

कैरीच्या फोडी १ किलो, मीठ २५० ग्रॅम, मेथी पूड ५० ग्रॅम, जिरे ९५ ग्रॅम, लाल तिखट ३0 ग्रॅम, काळे जिरे ९५ ग्रॅम, बडीशेप ३0 ग्रॅम, तिळाचे अथवा मोहरीचे तेल २५० ग्रॅम.

कृती : कैरीच्या फोडी स्वच्छ धुऊन त्याचे आवडीप्रमाणे तुकडे करावेत. तुकडे काळे पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात ठेवावेत. नंतर फोडी पाण्यातून काढून फोडींना मीठ लावून हे मिश्रण चार-पाच दिवस त्यामध्ये मसाला मिसळावा. पूर्ण थंड झाल्यावर कैरीच्या फोडी त्या मसाल्यात मिसळून सर्व मिश्रण स्वच्छ कोरड्या व निर्जतुक बरणीत भरावे.

आवळ्याचे लोणचे

प्रथम आवळ्याची पूर्ण फळे स्वच्छ धुऊन त्यानंतर गरम पाण्यात १० मिनिटे बुडून ठेवावीत. त्यामुळे फळे नरम पडण्यास मदत होते. त्यानंतर आवळ्याच्या फोडी करून बिया फेकून द्याव्यात. या फोडीपासून खालील घटक वापरून लोणचे तयार करता येते

साहित्य : आवळ्याच्या फोडी १.५ केिली, मीठ २५० ग्रॅम, मेथी २0 ग्रॅम, हळदपूड २० ग्रॅम, हिंग पावडर १० ग्रॅम, लाल तिखट ४० ग्रॅम.

पपईचे लोणचे

लोणच्यासाठी कची पपई येऊन ती स्वच्छ धुवाची. पपई कोरडी करून तिचे तुकडे करावेत. हिरवी साल व बिया काढून टाकाव्यात.

गराचे छोटे-छोटे तुकडे करून ते उकळत्या पाण्यात ३ मिनिटे बुडून ठेवावेत. नंतर ते निथळून कोरडे होऊ द्यावे. त्यांना मीठ चोळावे. नंतर उकळत्या पाण्यातून कोरड्या बरणीत भरून त्यात प्रत्येक किलो फोडी मागें २ चमचे मोहरी पावड़र व थोड़ी हलद टाकावी व नंतर सर्व तुकड़े पूर्ण बुडतील यानुसार व्हिनेगार घेऊन झाकण घट्ट लावावे. दोन ते तीन आठवड्यांत फोडी मुरून त्याचे उत्तम लोणचे तयार होते.

टोमॅटोचे लोणचे

साहित्य : लाल टोमॅटो १ किलो, हिरवी मिरची १० ते १२, लसूण पाकळ्या १o, आलें 1 इंच, जिरे ३ चमचे, व्हिनेगार दीड कप, तेल ४०० मिलिं. हळद २ चमचे, लाल तिखट ५ चमचे, मीठ ५० ग्रॅम.

कृती : प्रथम आले, लसूण व मिरचीचे तुकडे करून घ्यावेत. यापैकी निम्मे तुकडे वाटावेत व निम्मे तसेच ठेवावेत. टोमॅटो स्वच्छ धुऊन त्यांच्या बारीक फोडी कराव्यात. त्यांना व्हिनेगार, तिखट व जिरे यामध्ये मिसळावे. एका पातेल्यात तेल घालून गरम तुकडे तसेच व्हिनेगार घालून चांगले शिजवावेत . मधून चमच्याने फिरवत राहावे . संपूर्ण तेल वर आले कि,लोणचे तयार झाले , असे समजावे .


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

3.03921568627
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:28:26.879909 GMT+0530

T24 2019/10/17 05:28:26.886279 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:28:26.479648 GMT+0530

T612019/10/17 05:28:26.497031 GMT+0530

T622019/10/17 05:28:26.550377 GMT+0530

T632019/10/17 05:28:26.551168 GMT+0530