Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:34:36.765612 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / बोरांपासून कँडी बनवणे
शेअर करा

T3 2019/10/17 05:34:36.770496 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:34:36.796876 GMT+0530

बोरांपासून कँडी बनवणे

या विभागात शेती पूरक व्यवसायांतर्गत बोरांपासून गोळ्या / कँडी कशी बनवावी यासंबधी माहिती दिली आहे.

बोरांपासून गोड गोळ्या उर्फ कँडी बनवणे

बोर (झिझिफस मॉरिटानिया एल) हे आपल्या देशाच्या कोरड्या तसेच अर्ध-कोरड्या भागात मुबलकपणे मिळणारे महत्त्वाचे फळ असले तरी आजपर्यंत त्याचा व्यापारी तत्त्वावर उपयोग करण्याचे कोणाच्या फारसे ध्यानात आलेले नाही. बोरामध्ये पोषणमूल्ये चांगल्या प्रमाणात असतात. थायमिन, रायबोफ्लाविन आणि नियासिन ही ब वर्गातील जीवनसत्वे त्यात भरपूर सापडतात. शिवाय बोरात क जीवनसत्व आणि बीटा-कॅरोटिन या अ जीवनसत्वाचादेखिल अंश सापडतो. बोरामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम व लोहासारखी खनिजे असतात. बोरापासून प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स) बनवल्यास ते बराच काळ टिकतील आणि त्यांना उत्तम बाजारपेठही मिळेल. सायफेट (CIPHET) ने, ऑस्मो-एअर ड्राइंग तंत्रज्ञानाचा वापर करून,बोराच्या गोड गोळ्या म्हणजेच कँडी बनवली आहे.

बोराची कँडी

चांगली फळे नळाच्या पाण्याने धुवून त्यांवरची माती, कचरा इ. काढले जातात. प्रत्येक बोराचे देठ हाताने काढले जाते. स्टेनलेस स्टीलच्या अत्यंत धारदार सुरीने बोराची साल काढतात. ह्या सर्व प्रक्रियेदरम्यान, खराबी किंवा संसर्ग टाळण्यासाठी, कमालीची स्वच्छता राखली जाते. ह्यानंतर फळाच्या गराच्या फोडी केल्या जातात व बिया काढून टाकतात. कँडीला फिका व एकसारखा रंग येण्यासाठी ह्या फोडींवर 0.2 % केएमएसने ब्लांचिंगची प्रक्रिया करतात. ऑस्मॉटिक एजंट (कारक) म्हणून साखरपाणी (30, 40, 50 and 60 °B) वापरतात. ह्याला 100 °C पर्यंत उकळवून व त्यात 0.2 % सायट्रिक ऍसिड टाकून साखरेचा पाक करतात. हा पाक नंतर वस्त्रगाळ करून वातावरणीय तापमानापर्यंत थंड करतात. प्रत्यक्ष बोराची कँडी बनवण्यासाठी एका भांड्यात बोरांच्या फोडी व साखरेचा पाक 1:2 (फोडीःपाक) ह्या प्रमाणात घेऊन 48 तासांपर्यंत मुरवतात. ह्यानंतर पाक काढून टाकतात व बोराच्या फोडी ट्रेमध्ये नीट ठेवून, ट्रे ड्रायरच्या सहाय्याने, 60 °C तापमानावर 5-6 तास सुकवल्या जातात. थंड झाल्यानंतर हे तुकडे पॅक करतात.

बोराच्या कँडीचे पोषणात्मक प्रमाण – आर्द्रता, TSS, ऍस्कॉर्बिक ऍसिड, आम्लता (ऍसिडिटी), एकूण साखर व रिड्यूसिंग साखर ह्या घटकांच्या संदर्भात - अनुक्रमे असे आहे - 10.08 %, 48 °B, 95.97 मिग्रॅ/100ग्रॅम, 0.225 %, 21.65 % व 9.67 %.

बोराच्या ह्या गोळ्यांचे पोषणात्मक मूल्य चांगले असते आणि मुलांनी (मोठ्यांनीसुद्धा) कृत्रिम रंग व चवी घालून बनवलेल्या इतर गोळ्यांपेक्षा बोराची कँडी खाणे नक्कीच हिताचे आहे.

अधिक माहिती येथे मिळेल


सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट-हार्वेस्ट इंजिनियरिंग ऍँड टेक्नॉलॉजी ,
लुधियाणा, 141004, पंजाब
दूरभाष: 91-161-2308669
इमेल: ciphet@sify.com

 

स्रोत: लुधियाणा येथील सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट-हार्वेस्ट इंजिनियरिंग ऍँड टेक्नॉलॉजीचे इ-वार्तापत्र

2.96503496503
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
shantaram mali Apr 04, 2015 02:22 PM

मला महारaष्ट्र सरकार वरील उद्योग सुरु करण्यसाठी काही अनुदान देणार का ,मला ट्रेनिंग कुठे आणि किती दिवसात मिळेल हि माहिती द्या कृपया .मी एक शेतकरी आहे .धन्यवाद .माजा फोन नंबर --96*****84

राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था Sep 04, 2014 01:10 PM

माननीय श्री समाधानजी तसेच श्री सहाणे जी आपण वर दिलेल्या इमेल वर किंवा फोन वर संपर्क करावा हि विनंती.
धन्यवाद

सहाणे प्रविण रामनाथ Aug 25, 2014 12:55 PM

इसकी जानकारी हमे महाराष्ट्र मे मिल सकती है क्या ओर खर्च कितना आयेगा

samadhan v. andh Jun 04, 2014 03:07 PM

आदरणीय सर ,
मी एक सर्वसाधारण शेतकरी असून मला बोरावरील प्रक्रिया हा व्यवसाय करावयाचा आहे तरी आपण मला हवी ती मदत कराल हि अपेक्षा आहे . माझा संपर्क नंबर :- ०८४४९४१५०००. व ०७७९८५७६७६२ आहे . आपल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:34:37.124494 GMT+0530

T24 2019/10/17 05:34:37.130505 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:34:36.682452 GMT+0530

T612019/10/17 05:34:36.702300 GMT+0530

T622019/10/17 05:34:36.754539 GMT+0530

T632019/10/17 05:34:36.755481 GMT+0530