Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 17:54:27.837008 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / भुईमूग शेंगा फोडणी यंत्र
शेअर करा

T3 2019/06/26 17:54:27.842710 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 17:54:27.868811 GMT+0530

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र

भुईमूग शेंगा फोडणी यंत्राची माहिती मिळेल.

 

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र:

हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे आणि मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. हे कष्टाचे व खर्चिक काम स्वस्त व सुलभ करण्याकरिता शेंगा फोडणी यंत्र विकसित केलेले आहे. यामुळे शेंगा फोडण्याचे काम लवकर होऊन वेळेची व खर्चाची बचत होते. या यंत्राच्या रचनेत चार पाय असलेल्या एका लोखंडी पेटीत खालच्या बाजूस वक्राकार जाळी बसविलेली असते. पेटीच्या मध्यभागी फिरणाऱ्या दांड्यावर एक लांब हॅण्डल असतो. हॅण्डलच्या खालच्या टोकाला तीन खरबरीत लोखंडी ब्रश बसविलेले असतात. वक्राकार जाळीत चार ते पाच किलो शेंगा टाकून हॅंडल पुढे-मागे हलविला, की जाळीवरच्या ब्रशखाली शेंगा भरडल्या जातात आणि शेंगा व टरफले अलग होऊन जाळीतून खाली पडतात. नंतर शेंगदाणे वेगळे करावे लागतात. शेंगांच्या आकारमानाप्रमाणे जाळी बदलता येते, शिवाय जाळी व ब्रश यातील अंतर कमी-जास्त करता येते.

यंत्राची वैशिष्ट्ये -

  1. एका तासात एक मजूर सरासरी 60 ते 70 किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो.
  2. शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ, श्रम व पैसा वाचतो.
  3. यंत्राने शेंगा फोडल्यास सहा ते आठ टक्के फूट होते; मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात.
  4. यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.

 

 

संपर्क:

फोन नंबर - 02426 - 243219. 
कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, 
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी

स्त्रोत : अग्रोवन

 

 

2.97692307692
बाबुराव रणदिवे Dec 22, 2016 02:38 PM

मला शेंगा फोडणी यंत्राची किंमत सांगावी घ्यायची आहे मो.नं 95*****40

raju lohare Dec 10, 2016 08:42 AM

मला शेंगा फोडणी यंत्राची किंमत सांगावी घ्यायची आहे ८९७५६५६१२१

शरद मनोहर राणे Oct 25, 2016 04:00 PM

यंत्राची किमंत किती आहे

pramod vijay hake Sep 21, 2016 02:46 PM

यंत्राची अंदाजे किंमत किती आहे plz मला लवकर सांगा सर माझंही कॉन नो . 75*****95

ANIUDHA MIRIKAR Sep 15, 2016 06:17 PM

आपल्या मागणी करीत आणि मशीन च्या संधर्भात कृपया खालील फोन वर संपर्क साधावा. गर्जे नुसार आणि क्षमते नुसार किंमत राहील कमीत कमी रु 10000 पासून हे यंत्र उपलब्ध आहेत
1.Kamdhenu Expeller Industries
Wathoda, Nagpur
08*****486
Tinytech Plants
2.Railway Station, Rajkot
08*****824

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 17:54:28.267175 GMT+0530

T24 2019/06/26 17:54:28.274564 GMT+0530
Back to top

T12019/06/26 17:54:27.725930 GMT+0530

T612019/06/26 17:54:27.744634 GMT+0530

T622019/06/26 17:54:27.825209 GMT+0530

T632019/06/26 17:54:27.826346 GMT+0530