Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/27 01:55:40.380832 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / भुईमूग शेंगा फोडणी यंत्र
शेअर करा

T3 2019/06/27 01:55:40.385358 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/27 01:55:40.411059 GMT+0530

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र

भुईमूग शेंगा फोडणी यंत्राची माहिती मिळेल.

 

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र:

हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे आणि मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. हे कष्टाचे व खर्चिक काम स्वस्त व सुलभ करण्याकरिता शेंगा फोडणी यंत्र विकसित केलेले आहे. यामुळे शेंगा फोडण्याचे काम लवकर होऊन वेळेची व खर्चाची बचत होते. या यंत्राच्या रचनेत चार पाय असलेल्या एका लोखंडी पेटीत खालच्या बाजूस वक्राकार जाळी बसविलेली असते. पेटीच्या मध्यभागी फिरणाऱ्या दांड्यावर एक लांब हॅण्डल असतो. हॅण्डलच्या खालच्या टोकाला तीन खरबरीत लोखंडी ब्रश बसविलेले असतात. वक्राकार जाळीत चार ते पाच किलो शेंगा टाकून हॅंडल पुढे-मागे हलविला, की जाळीवरच्या ब्रशखाली शेंगा भरडल्या जातात आणि शेंगा व टरफले अलग होऊन जाळीतून खाली पडतात. नंतर शेंगदाणे वेगळे करावे लागतात. शेंगांच्या आकारमानाप्रमाणे जाळी बदलता येते, शिवाय जाळी व ब्रश यातील अंतर कमी-जास्त करता येते.

यंत्राची वैशिष्ट्ये -

  1. एका तासात एक मजूर सरासरी 60 ते 70 किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो.
  2. शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ, श्रम व पैसा वाचतो.
  3. यंत्राने शेंगा फोडल्यास सहा ते आठ टक्के फूट होते; मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात.
  4. यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.

 

 

संपर्क:

फोन नंबर - 02426 - 243219. 
कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, 
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी

स्त्रोत : अग्रोवन

 

 

2.97692307692
हेमराज चौधरी Sep 11, 2016 03:16 PM

यंञ कुटे उपलब्ध होइल त्याचि किमंत किती व्हाट्सअँपणो
94*****77 ई-मेल *****@gmail.com

rajkumar Sep 09, 2016 07:52 PM

सर मला यंत्राचे कोटेशन व यंत्र कोठे मिळेल याची माहिती पाठवा whtsapp No:- 98*****01

दुर्गेश मोहिते Aug 13, 2016 10:31 AM

सर मला यंत्राचे कोटेशन व यंत्र कोठे मिळेल याची माहिती पाठवा whtsapp No:- 98*****77

S G PURANIK Jul 30, 2016 12:07 PM

कोटेशन व परिपुर्ण नाही की पाठवा whats ap no 94*****47

मोहन लाड Jul 27, 2016 03:12 PM

यंत्र कोठे उपलब्ध होइल. आणी अंदाजे
किंमत काय असेल .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/27 01:55:40.748291 GMT+0530

T24 2019/06/27 01:55:40.754167 GMT+0530
Back to top

T12019/06/27 01:55:40.303570 GMT+0530

T612019/06/27 01:55:40.321299 GMT+0530

T622019/06/27 01:55:40.371041 GMT+0530

T632019/06/27 01:55:40.371794 GMT+0530