Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/02/17 07:26:24.413716 GMT+0530
शेअर करा

T3 2019/02/17 07:26:24.418239 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/02/17 07:26:24.443666 GMT+0530

मशरूम ओळख

मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘आळिंबी’ असे म्हटले जाते.

मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘आळिंबी’ असे म्हटले जाते. पावसाळ्यात निसर्गात ही वनस्पती आपल्याला आढळते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.

निसर्गात अनेक मुशरूम आढळतात. परंतु त्यात काही विषारी देखील असतात. मशरूम जगात १२,००० हून अधिक जाती आहेत. आज जागतिक मशरूम उत्पादन ८.४९५ दशलक्ष मॅट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोप, २७% उत्तर अमेरिका व १४% पूर्व आशिया खंडात घेतले जाते. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत केली जाते. जर्मनीमध्ये मशरूमचे सर्वात अधिक सेवन केले जाते.

भारतामध्ये बटन (Agaricus bisporus), शिंपला (pleurotus sp.), धानपेढ्यांवरील (Volvariella volvacea) या जातीच्या मशरूमची लागवड केली जाते.

बटन मशरूम

 

बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतांवर केली जाते. दीर्घ मुदतीची पद्दत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्दतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बी पेरले जाते. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो व उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.

शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम)

 

नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते.

संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.

धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. २०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी आळंबीचे उत्पादन घेऊ शकतो.

 

स्त्रोत : वनराई संस्था

3.1484375
Anonymous Jan 17, 2018 04:52 PM

मला मशरुम चा व्यवसाय चालु करायचा आहे.मला माहिती हवी आहे
chetan thakare - 99*****21

वाघमारे गुरुनाथ सोमनाथ Aug 03, 2017 10:39 AM

मश्रुमचे बीज नाशिकमध्ये कोठे मिळते मो. नो. आणि पत्ता मिळेल काय -

गणेश घनवट Jun 27, 2017 03:25 PM

मला मशरुम चा व्यवसाय चालु करायचा आहे.मला माहिती हवी आहे.

प्रकाश राऊत Mar 26, 2017 08:26 PM

नाशिक मधील मशरूम खरेदी करणारी संस्था कोणती ते कळवा 73*****11

अभिषेक देसले Mar 08, 2017 04:04 PM

मशरूम ऊत्पादनासाठी मार्गदर्शन पाहिजे मो. 95*****76

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/02/17 07:26:24.781470 GMT+0530

T24 2019/02/17 07:26:24.787418 GMT+0530
Back to top

T12019/02/17 07:26:24.330834 GMT+0530

T612019/02/17 07:26:24.354139 GMT+0530

T622019/02/17 07:26:24.403740 GMT+0530

T632019/02/17 07:26:24.404571 GMT+0530