Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 01:11:41.204307 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / ओझोन थरावर परिणाम
शेअर करा

T3 2019/05/26 01:11:41.210356 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 01:11:41.236019 GMT+0530

ओझोन थरावर परिणाम

जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हरितगृह वायूंचे प्रमाण कमी राखण्यासंदर्भात विविध कायदे, नियम आहेत.

जागतिक पातळीवर हरितगृह वायूंच्या वाढीवर मर्यादा आणण्यासाठी विविध नियम तयार करण्यात आले असले तरी ओझोन थरावर परिणाम करणाऱ्या अल्पकालावधीच्या रसायनांवर अद्यापही नियंत्रण शक्‍य झाले नसल्याचा अहवाल संशोधकांच्या गटाने दिला आहे. अत्यंत कमी कालावधीच्या घटकांचे प्रमाण वाढत असून, त्याविषयी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. हे संशोधन "नेचर जियोसायन्स' मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हरितगृह वायूंचे प्रमाण कमी राखण्यासंदर्भात विविध कायदे, नियम आहेत. मात्र, या हरितगृह वायूंसाठी पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या काही घटकांचेही वातावरणातील ओझोनच्या थरावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

लिड्‌स विद्यापीठातील पृथ्वी व पर्यावरण विद्यालयातील संशोधक डॉ. रायन होस्सायनी यांनी सांगितले, की अत्यंत कमी कालावधीच्या घटकांची (very short-lived substances-VSLS) निर्मिती ही नैसर्गिक आणि औद्योगिक स्रोतातून होते. त्यातील औद्योगिक स्रोतातून तयार होणाऱ्या घटकावर बंधने आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षण नियमावलीचा आधार घेतला जातो. पूर्वी ही रसायने अत्यंत कमी प्रमाणात ओझोनच्या थराला इजा पोचवत होती. मात्र, त्यांचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत असून, अशीच वाढ कायम राहिल्यास त्याचे ओझोनच्या थरावर नक्कीच विपरीत परिणाम होऊ शकतात.

लिड्‌स विद्यापीठामधील संशोधकांनी पर्यावरणाच्या त्रिमितीय संगणकीय प्रारूपांचा वापर केला आहे. त्यामध्ये गेल्या दोन दशकांतील VSLS चे प्रमाण वापरण्यात आले आहे. पर्यावरणातील डायक्‍लोरोमिथेन मानवनिर्मित VSLS चे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्याबद्दल माहिती देताना संशोधक मार्टीन चिपरफिल्ड म्हणाले, की पर्यावरणातील डायक्‍लोरोमिथेन या वायूंच्या प्रमाणातील बदलांचा व त्यामागील नेमक्‍या स्रोतांवर सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे. सध्या क्‍लोरोफ्लोरोकार्बन च्या परिणामावर लक्ष ठेवण्यात येते. मात्र, ओझोन आणि वातावरणातील भविष्यातील अंदाजामध्ये अनिश्‍चितता निर्माण करण्याची ताकद वाढत्या डायक्‍लोरोमिथेनमध्ये आहे.

  • वातावरणामध्ये दीर्घकाळ राहणाऱ्या वायूंच्या तुलनेमध्ये कमी कालावधीसाठी राहणाऱ्या वायूंचा ओझोनच्या थरावरील परिणाम अत्यंत कमी दिसतो. मात्र, त्यामुळे ओझोनच्या थरामध्ये होत असलेली घट वातावरणावर परिणाम करण्यामध्ये सुमारे चारपट अधिक कार्यक्षम ठरू शकते.
  • स्ट्रॅटोस्फिअरच्या सर्वात खालील थरामध्ये असलेल्या ओझोनचे विघटन करण्यामध्ये VSLS अत्यंत कमी कालावधीत कार्यक्षम ठरू शकतात. त्याचा पर्यावरणावर परिणामही दीर्घकाळ राहू शकतो.
  • सागरातील वनस्पती, तणे ही VSLS चे मुख्य नैसर्गिक स्रोत असून, संशोधकांनी मानवनिर्मित VSLS पासून त्यांना वेगळे केले आहे. हे घटक एकूण ओझोन ऱ्हासाच्या 90 टक्केपर्यंत ऱ्हास करतात. त्यात मानवनिर्मित VSLS घटकांचे प्रमाण वाढत असल्याने भविष्यात धोका वाढू शकतो.

काळजीत पडली भर

अमेरिकेतील राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासन (NOAA) विभागातील डॉ. स्टिफन मॉन्टेझका यांनी सांगितले, की क्‍लोरोफ्लोरोकार्बनसारख्या वायूला पर्याय म्हणून ओझोनपूरक वायूमध्ये डायक्‍लोरोमिथेनचा वापर वाढत आहे. मात्र, त्यातील कमी कालावधीच्या रासायनिक घटकांचाही विपरीत परिणाम ओझोनच्या थरावर होत असल्याचे दिसून आल्याने काळजी वाढत आहे.

स्त्रोत: अग्रोवन

 

 

3.02083333333
sainath ware Aug 07, 2015 08:19 PM

good morning

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 01:11:41.472187 GMT+0530

T24 2019/05/26 01:11:41.478615 GMT+0530
Back to top

T12019/05/26 01:11:41.097186 GMT+0530

T612019/05/26 01:11:41.114776 GMT+0530

T622019/05/26 01:11:41.191448 GMT+0530

T632019/05/26 01:11:41.192448 GMT+0530