Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:24:47.437146 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / कोवळ्या फुटी असलेल्या बागेमध्ये घ्या अधिक काळजी
शेअर करा

T3 2019/10/14 23:24:47.441995 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:24:47.470196 GMT+0530

कोवळ्या फुटी असलेल्या बागेमध्ये घ्या अधिक काळजी

एकाच ठिकाणी ओलांड्यावरती जास्त फुटी फुटलेल्या असल्यास अशा फुटींच्या पुंजक्‍यांमध्ये आर्द्रता वाढते व आतमध्ये प्रकाश चांगल्या रीतीने पोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये फुटींच्या आतल्या भागांमध्ये भुरी वेगाने वाढण्याची शक्‍यता असते.

कोवळ्या फुटी बागांची काळजी

बऱ्याच द्राक्ष विभागामध्ये मागील आठवड्यात पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडून नवीन फुटींवर जखमा झाल्या. या आठवड्यामध्येही सांगली व सोलापूर भागांमध्ये, तसेच विजापूरच्या जवळपासच्या भागामध्ये येत्या दोन दिवसांत हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये बुधवार ते शुक्रवार पुन्हा वादळी पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यामध्ये सर्व पाचही विभागांमध्ये सर्वसाधारणपणे वातावरण निरभ्र राहणार असले तरी अधूनमधून ढगाळ वातावरण राहून रिमझिम पावसाची शक्‍यता आहे. अशा प्रकारच्या पावसामुळे बागेमध्ये कसल्याही नुकसानाची शक्‍यता नाही. परंतु, पुढील आठवड्यामधील संभाव्य वादळी पावसासाठी सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. ज्या ठिकाणी कोवळ्या फुटी असलेल्या बागा असतील, अशा ठिकाणी जास्त काळजी घेणे जरुरी आहे. गेल्या आठवड्यात ज्या-ज्या ठिकाणी गारपीट झाली व कोवळ्या काड्यांवर जखमा झाल्या, अशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी री-कट घेऊन नवीन फुटी घेण्याचे प्रयत्न केले आहेत.

सांगलीचा काही भाग- विशेषतः कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर या भागांमध्ये पुढील आठवड्याच्या बुधवारी-गुरुवारी पुन्हा वादळी पावसाची शक्‍यता आहे. अशा ठिकाणी जखम झालेल्या काडींवरती री-कट अशा रीतीने घ्यावा, की नवीन येणाऱ्या फुटी पुढील आठवड्याच्या शुक्रवारी येण्यास सुरू होतील, जेणेकरून नवीन फुटी पुढील पावसापासून सुरक्षित राहतील.

मागील आठवड्यात सांगितल्याप्रमाणे कोवळ्या हिरव्या फुटींवरील हलक्‍या जखमा वेगाने भरून येतात व या काडींवर री-कट घेणे जरुरी नसते. हिरव्या काड्यांच्या आतल्या भागांमध्ये काड्यांच्या गाभ्यापर्यंत जखम पोचलेली असेल व वरची साल गारांमुळे फाटलेली असेल, तरच री-कटचा निर्णय घ्यावा; अन्यथा कार्बेन्डाझिम (50 डब्लूपी) एक ग्रॅम व कॉपर हायड्रॉक्‍साईड दीड ग्रॅम अथवा कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड 3 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. अशा फवारणीने वेलीच्या जखमा भरून निघण्यास मदत होते. तसेच झालेल्या जखमांतून बोट्रीओडिप्लोडिया आत जाण्याची शक्‍यता कमी होते, तर पावसामुळे वाढलेल्या आर्द्रतेमध्ये कोवळ्या फुटींवर येणारा बुरशीचा करपा नियंत्रित होतो.

नवीन फुटींची वेळीच विरळणी करा

नवीन फुटींची वेळीच विरळणी करणे अतिशय आवश्‍यक आहे. एकाच ठिकाणी ओलांड्यावरती जास्त फुटी फुटलेल्या असल्यास अशा फुटींच्या पुंजक्‍यांमध्ये आर्द्रता वाढते व आतमध्ये प्रकाश चांगल्या रीतीने पोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये फुटींच्या आतल्या भागांमध्ये भुरी वेगाने वाढण्याची शक्‍यता असते. या भुरीचे नियंत्रण वेळेवर न झाल्यास ढगाळ वातावरणामध्ये बागेतील भुरी नियंत्रित करणे कठीण होते. यासाठी काड्यांची विरळणी वेळेवर करून भुरीच्या नियंत्रणासाठी हेक्‍झाकोनॅझोल (50 ईसी) 1 मिली प्रतिलिटर किंवा फ्युसिलाझोल (40 ईसी) 25 मि.लि. प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अशा फवारणीने पावसानंतर जोमाने वाढणाऱ्या फुटीसुद्धा मंदावतात. यामुळे "सबकेन' झालेल्या फुटींमध्ये सुप्त अवस्थेतील फलधारणा होण्यास मदत होते.

स्त्रोत: अग्रोवन

3.03571428571
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:24:47.710051 GMT+0530

T24 2019/10/14 23:24:47.716174 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:24:47.364104 GMT+0530

T612019/10/14 23:24:47.383085 GMT+0530

T622019/10/14 23:24:47.423358 GMT+0530

T632019/10/14 23:24:47.424213 GMT+0530