Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:42:34.985893 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / ढगाळ वातावरणात आंबा, काजू पिकाची घ्या काळजी
शेअर करा

T3 2019/10/14 23:42:34.990552 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:42:35.015500 GMT+0530

ढगाळ वातावरणात आंबा, काजू पिकाची घ्या काळजी

कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला ऑक्‍टोबर महिन्यात पालवी येऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते.


कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला ऑक्‍टोबर महिन्यात पालवी येऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते. मात्र चालू वर्षी पावसाचा हंगाम लांबल्यामुळे पालवी व पर्यायाने मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला.
 • त्यातच मोहोर फुटण्यास सुरवात झाल्यानंतर गेल्या महिन्यात एक दोन दिवस कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे फुटलेल्या मोहोरावर व छोट्या कणीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.
 • सध्या पुन्हा कोकणात पोषक थंडी सुरू झाल्याने मोहोर फुटण्याची प्रक्रिया जोमाने सुरू झाली. मात्र, त्यात 01 जानेवारीच्या तुरळक पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पूर्वीच्या व नवीन येत असलेल्या मोहोरावर तुडतुडे, फुलकिडी यांसारख्या किडी व करपा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यावर खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

पूर्ण वाढलेले तुडतुडे करड्या रंगाचे, पाचराच्या आकाराचे 3 ते 5 मि.मी. लांब असतात. त्यांची पिल्ले काळसर तपकिरी रंगाची असतात. तुडतुडे कोवळी पालवी, मोहोर तसेच कोवळ्या फळांच्या देठातून रस शोषून घेतात. परिणामी मोहोर कमकुवत होतो व गळतो. तसेच छोटी फळे देखील गळतात. तुडतुड्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होते. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण झाड काळसर दिसते. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या फवारणीसूचीचा अवलंब करावा. त्यातील

 • आंब्याचे झाड मोहोर फुटण्याच्या आधी बोंगे फुटण्याच्या स्थितीत असल्यास, इमिडाक्‍लोप्रीड (17.8 टक्के प्रवाही) 3 मि.लि. प्रति 10 लिटर किंवा क्‍लोथियानिडीन (50 टक्के) 1.2 ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.
 • आंबा पीक पूर्ण फुलोऱ्यावर आले असल्यास, थायामेथोक्‍झाम (25 टक्के) 2 ग्रॅम प्रति 10 लिटरप्रमाणे फवारणी करावी.
 • या द्रावणामध्ये भुरी व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम फवारणीच्या वेळी मिसळावे.

फुलकिडींचा प्रादुर्भाव

सध्या मोहोरावर फुलकिडींचा देखील प्रादुर्भाव दिसून येत आहे. फुलकिडीच्या पिवळ्या तसेच काळ्या प्रजाती आढळून येत आहेत. फुलकिडी आकाराने फारच लहान, 1 ते 1.5 मि.मी. लांब, निमुळत्या आकाराच्या असतात. त्या कोवळी पाने, मोहोरातील फुले व मोहोराचे दांडे तसेच लहान फळे खरवडतात. त्यामुळे तेथे करड्या रंगाचे चट्टे उठतात. पाने वरच्या बाजूला वळतात, मोहोर तांबूस होऊन गळतो. तर फळांवर करड्या रंगाचे चट्टे उठतात.

 • फुलकिडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 15 मि.ली. प्रती 10 लि. पाण्यातून किंवा फोझॅलॉन 15 मि.लि. प्रति 10 लि. पाण्यातून यांसारख्या कीटकनाशकांचा वापर करावा.
 • तसेच फळांवरील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी, स्पिनोसॅड (45 एसएल) 2.5 मि.ली. प्रती 10 लिटर किंवा थायामेथोक्‍झाम (25 डब्ल्यू.डी.जी.) 2 ग्रॅम प्रती 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी.
 • आंबा पिकावर करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव देखील संभवतो.
 • करपा रोगामुळे मोहोरातील फुले व मोहोराचे दांडे तपकिरी काळसर होतात. मोहोरावर काळसर ठिपके उठतात. तर भुरी रोगाची राखाडी रंगाची बुरशी मोहोरावर वाढलेली दिसते. त्यामुळे मोहोर वाळतो, मोहोराचे दांडे सुकतात व फळधारणा होत नाही.
 • या रोगांच्या नियंत्रणासाठी बागेत स्वच्छता राखावी. रोगट फांद्या कापून काढाव्यात आणि गळून पडलेल्या रोगट पानांचा नाश करावा. तसेच झाडावर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर किंवा 1 टक्का बोर्डोमिश्रण (1-1-100) किंवा कार्बेन्डॅझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारावे. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या फवारणी सूचीचा अवलंब करावा.

काजू पिकातील कीड व रोग नियंत्रण

काजू पीक सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सर्वच जातींना (वेंगुर्ला- 1 ते वेंगुर्ला- 8) मोहोर आलेला आहे. मात्र काही स्थानिक रोपांच्या लागवडीमध्ये काही ठिकाणी पालवी अवस्था, तर काही ठिकाणी मोहोर येण्यास सुरवात झाली आहे.

टी मॉस्किटोचा प्रादुर्भाव
या पालवी व मोहोरावर काजूवरील ढेकण्या (टी मॉस्कीटो)चा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. पूर्ण वाढलेले ढेकण्या तसेच त्यांची पिल्ले कोवळ्या पालवीतून, मोहोरातून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात व त्या जागी विषारी द्रव सोडतात. त्यामुळे कोवळ्या पालवीवर व मोहोरावर काळे चट्टे उठतात. हे चट्टे वाढून पूर्ण पालवी व मोहोर सुकतो, जळल्यासारखा दिसतो. फळावर काळ्या रंगाचे खोलगट खड्डे उठतात. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट संभवते.
फुलकिडीचा प्रादुर्भाव
काजू बागेत कोवळ्या पालवीवर व मोहोरावर फुलकिडीचा (थ्रिप्स) देखील प्रादुर्भाव दिसून येत आहे. फुलकिडी पिवळसर रंगाच्या, अतिशय सूक्ष्म आकाराच्या असतात. त्या कोवळी पालवी, कोवळा मोहोर तसेच कोवळी फळे खरवडतात. फळांवर करड्या रंगाचे चट्टे उठलेले दिसतात. काजू बिया खराब दिसतात, वेड्यावाकड्या वाढतात, तसेच उत्पादनात घट येते.
या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या फवारणी सुचीचा वापर करावा. 
- मोहोर अवस्थेतील बागेमध्ये, प्रोफेनोफॉस 10 मि.लि. प्रति 10 लिटरप्रमाणे फवारणी करावी. 
- फळधारणा सुरवात झालेल्या बागेमध्ये, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ( 5 टक्के) 6 मि. लि. प्रति 10 लिटर. 

संपर्क- 
1) डॉ. बी. एन. सावंत, 9422436117 
2) प्रा. ए. वाय. मुंज, 9422918452 
(प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग.)

 

स्त्रोत: अग्रोवन

2.82608695652
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:42:35.235179 GMT+0530

T24 2019/10/14 23:42:35.241348 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:42:34.895595 GMT+0530

T612019/10/14 23:42:34.912110 GMT+0530

T622019/10/14 23:42:34.975540 GMT+0530

T632019/10/14 23:42:34.976454 GMT+0530