Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:01:0.460296 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / द्राक्ष फुलोऱ्याची काळजी
शेअर करा

T3 2019/10/15 00:01:0.464904 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:01:0.488469 GMT+0530

द्राक्ष फुलोऱ्याची काळजी

सध्या बागेत वेल वाढीच्या विविध अवस्था दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागायतदारांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी द्राक्ष लागवड पट्ट्यात पाऊस झाला. सध्या बागेत वेल वाढीच्या विविध अवस्था दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागायतदारांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजच्या लेखामध्ये फळकूज आणि फुलोरा गळ आणि मण्यांच्या विकासातील समस्यांवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती घेऊया. 

फळकूज आणि फुलोरा गळ

 1. बागेमध्ये सध्या प्रीब्लुम अवस्था आहे किंवा फुलोरा अवस्था जवळ येत आहे. अशा बागेमध्ये फुलोरा गळ जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
 2. ज्या बागेमध्ये कॅनॉपी जास्त दाट आहे, अशा बागेत प्रीब्लुम अवस्थेमध्येच पाने पिवळी पडून गळायला सुरवात झाल्याचे दिसून येईल. ही समस्या मुख्यतः हलक्‍या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.
 3. फुलोरा अवस्था मध्येच चांगली गळ झाल्यास मणी थिनिंगचा खर्च वाचेल, असा आपला उद्देश असतो. म्हणून, आपण या कालावधीमध्ये बागेत पाण्याचा ताणसुद्धा देतो.
 4. पाण्याचा ताण कोणत्या अवस्थेत द्यावा, हे जरी आपल्याला माहीत असले तरी कोणत्या प्रकारच्या जमिनीत किती प्रमाणात पाण्याचा ताण द्यावा या गोष्टींचा ताळमेळ आपल्याला बसवणे शक्‍य होत नाही. अशातच वेलीच्या वाढीच्या शारीरिक हालचालींवर ताण बसतो. त्याचाच परिणाम म्हणजे जास्त प्रमाणात गळ दिसून येते. बऱ्याच वेळा घडाला हात लागला, की पूर्ण घड खाली झाल्याचे दिसते.
 5. तेव्हा, वेलीस पाण्याचा ताण बसणार नाही, याची मुख्यतः काळजी घ्यावी, सोबतच शेंडा पिंचिंग करून घ्यावे.
 6. ज्या बागेमध्ये उशिरा छाटणी झाली आहे, अशा बागेत सध्या प्रीब्लुम अवस्था आहे. जर पाऊस झाला असल्यास घडामध्ये पाणी जमा झालेले दिसून येते. या वेळी जास्त काळ पाणी साचून राहिल्यास फळकूज होण्याची शक्‍यता असते. याकरिताच बागेमध्ये मोकळी कॅनॉपी असणे गरजेचे असते.
 7. मोकळ्या अशा कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहिल्यामुळे पाणी लवकर उडून जाईल, घड सुकताना दिसेल. काही परिस्थितीमध्ये ओलांडे हलवून घेतल्यास घडातील व पानांवरील पाणी निघून जाईल. त्यामुळे फळकुजीपासून बचाव करता येईल.

मणी सेटिंग नंतरचे व्यवस्थापन

 1. द्राक्ष बागेत मणी सेटिंगनंतरचे व्यवस्थापन घडाचा विकास होण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते, कारण मणी सेटिंगची अवस्था संपली, की बागेमध्ये घडाचा विकास व्हायला सुरवात होते. त्या वेळी वातावरणसुद्धा पोषक असते. म्हणजेच, वातावरणात दिवसाचे तापमान 30-35 अंश सेल्सिअस असते.
 2. अशातच बागेमध्ये घडामधील मण्याचा विकास झपाट्याने व्हायला लागतो. परंतु त्यानंतर थंडी पडायला सुरवात होते. या काळात मण्याचा विकास थांबतो. मण्याचा आकार वाढत नाही, हे पाहून सध्याच्या परिस्थितीत कशाची गरज आहे, हे पडताळून पुढचे नियोजन करावे.
 3. बागेमध्ये वेळेवर बोदावरील कामे करून पांढरी मुळी जास्त वेळ कशी कार्यरत राहील, याची काळजी घ्यावी.
 4. या वेळी सोर्स सिंक अशाप्रकारे असावे, की घडाचा विकास चांगल्या प्रकारे करून घेता येईल.
 5. घडाच्या विकासात आवश्‍यक असलेली घडाच्या पुढील 10 ते 12 पाने फक्त ठेवून इतर पाने काढून टाकावीत.
 6. शेंडा पिचिंग वेळीच करून घेतल्यास सोर्स सिंकचा समतोल राहील.

संपर्क : 020-26956060 
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

2.97752808989
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:01:0.710058 GMT+0530

T24 2019/10/15 00:01:0.717322 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:01:0.393614 GMT+0530

T612019/10/15 00:01:0.410138 GMT+0530

T622019/10/15 00:01:0.450431 GMT+0530

T632019/10/15 00:01:0.451171 GMT+0530