Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:25:58.012026 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / द्राक्ष बागेत करावयाच्या कामांचे नियोजन
शेअर करा

T3 2019/10/17 05:25:58.016855 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:25:58.044899 GMT+0530

द्राक्ष बागेत करावयाच्या कामांचे नियोजन

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण चांगले असल्याचे दिसते.

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण चांगले असल्याचे दिसते. या वातावरणात घडाच्या विकासात जास्त अडचणी येणार नाहीत; परंतु काही ठिकाणी जर थंडी जास्त वाढली, तर मण्यांची वाढ थांबताना दिसेल. तेव्हा त्याबाबत सध्याच्या परिस्थितीत बागेत करावयाच्या कामांविषयी माहिती करून घेऊ या.
  1. ढगाळी वातावरण - या वातावरणात बागेत घडाचा विकास होण्यास अडचण येणार नाही. कारण ढगाळी वातावरणामुळे किमान तापमानात घट होणार नाही. घडाचा विकास होण्यास वातावरणात विशिष्ट तापमान असणे गरजेचे असते. अशा वातावरणात फक्त भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची थोडीफार शक्‍यता असेल. दिवसाचे तापमान जास्त वाढत राहिल्यास मणी उन्हात येऊन डागाळू शकतात. अशा परिस्थितीत घड सावलीत घेण्यास उपाययोजना कराव्यात. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे घडाच्या पुढील फूट तारेच्या खाली घेऊन घड सावलीमध्ये घेता येईल.
  2. थंडीचा परिणाम - काही ठिकाणी बागेमध्ये थंडी जाणवते. ज्या भागात ढगाळी वातावरण नाही, अशा ठिकाणी रात्रीचे (किमान) तापमान कमी झालेले दिसेल. या तापमानात द्राक्ष बागेत शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग मंदावतो. यामुळेच पेशींचे विभाजन किंवा पेशींचा आकार वाढल्यास विलंब लागतो. याचाच अर्थ मण्यांचा आकार अशा वातावरणात कमी राहू शकतो. अशा परिस्थितीत बागेत जर 12 ते 14 मि.मी. आकाराचे मणी असल्यास तापमान वाढविण्याकरिता मोकळे पाणी दिले जाते. ज्या ठिकाणी ही सुविधा आहे, त्या ठिकाणी ते शक्‍य होईल; परंतु पाणी देत असताना पाणी जमिनीत मुरेल याकडे लक्ष द्यावे. याकरिता आधी बागेत फणून घेतल्यास बागेत पाणी चांगले बसते. पाणी दिल्यानंतर बागेत भुरीचा प्रादुर्भाव जाणवतो. तेव्हा त्याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना बागेत कराव्यात.
  3. पानांच्या वाट्या होणे - बागेत बऱ्याच वेळा पानांच्या वाट्या झालेल्या आढळून येतात. ही परिस्थिती एक तर पालाशच्या कमतरतेमुळे किंवा फुलकिडी अथवा तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळेसुद्धा आढळून येते; परंतु या दोन्ही गोष्टींचा परिणाम किंवा प्रादुर्भाव वेगळा दिसून येतो. जेव्हा बागेत पालाशची कमतरता दिसते, तेव्हा फक्त जून झालेल्या किंवा जून होत असलेल्या पानांवर लक्षणे दिसून येतात. अशा परिस्थितीमध्ये पानांची वाटी ही आतमध्ये दिसून येते, तर दुसऱ्या परिस्थितीमध्ये वाटी झालेली पाने ही मुख्यतः कोवळ्या फुटींवर आढळून येतात. ही पानांची वाटी कीटकांनी रस शोषून घेतल्यामुळे झालेली असते. या वेळी बागेत वाढत्या तापमानामध्ये किडींचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. अशा परिस्थितीमध्ये आवश्‍यक त्या शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करून किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. याच सोबत बागेत कीटकांना पकडण्याकरिता चिकट सापळ्यांचा वापरसुद्धा करता येतो.
  4. मण्यांना चिरा पडणे - मणी चिरण्याची समस्या या वेळी बऱ्याच बागांत आढळून येते. यामध्ये विशेषतः काळ्या द्राक्षजातीमध्ये ही अडचण दिसून येते. काळ्या द्राक्षजातीमध्ये कृष्णा सीडलेस, शरद सीडलेसवर जास्त प्रमाणात दिसून येते. बागेतील आर्द्रता जास्त वाढल्यास बागेत लगेच क्रॅकिंग दिसून येते. यावर सध्या तरी कुठलाही उपाय दिसत नसला, तरी बागेत आर्द्रता आटोक्‍यात ठेवण्याकरिता पाण्यावर नियंत्रण ठेवणे जास्त महत्त्वाचे राहील.

संपर्क - 020 - 26956060 
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:25:58.302621 GMT+0530

T24 2019/10/17 05:25:58.309055 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:25:57.932468 GMT+0530

T612019/10/17 05:25:57.951748 GMT+0530

T622019/10/17 05:25:57.999212 GMT+0530

T632019/10/17 05:25:58.000666 GMT+0530