Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:50:50.403719 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / द्राक्ष बागेतील समस्यांवर वेळीच करा उपाय
शेअर करा

T3 2019/05/24 20:50:50.408526 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:50:50.434298 GMT+0530

द्राक्ष बागेतील समस्यांवर वेळीच करा उपाय

सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत मण्यांचा, घडाचा विकासाचा कालावधी आहे. दरवर्षी या कालावधीमध्ये एकतर पाऊस किंवा थंडीचा तडाखा बसतो.

सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत मण्यांचा, घडाचा विकासाचा कालावधी आहे. दरवर्षी या कालावधीमध्ये एकतर पाऊस किंवा थंडीचा तडाखा बसतो. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव किंवा मण्यांचा आकार वाढण्याच्या अडचणी दिसायच्या; परंतु या वर्षी सध्या थंडी फारशी दिसत नाही. ज्या भागात ओलीताचे क्षेत्र आहे, अशा ठिकाणी मात्र थंडी जास्त जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत येत असलेल्या अडचणींबद्दल आजच्या लेखात माहिती दिली आहे.

...असे झाले संशोधन

द्राक्ष बागेत पाने पिवळी पडण्यास बरीच कारणे आहेत. याबद्दल यापूर्वी बऱ्याचदा चर्चा झालेली आहे. बागेत मणी सेटिंगनंतर आठ ते दहा मि.मी.च्या वाढीच्या अवस्थेत ही परिस्थिती जास्त जाणवते. या वेळी मण्यांच्या वाढीस आवश्‍यक तो जीए डीपद्वारे मण्यात गेल्यामुळे मण्यांची वाढ वेगाने होते. त्यामुळे घडाच्या (सिंक) विकासाकरिता पानांकडून, काडी, ओलांड्यातून व तसेच वेलीच्या इतर भागांतून (सोर्स) अन्नद्रव्य ओढले जाते. या वेळी या सर्व भागांपेक्षा पानांचे कार्य महत्त्वाचे असते.

पानांपासून मण्यास होणारा पुरवठा व असलेली उपलब्धता या गोष्टींचा ताळमेळ बसत नसल्यामुळे कॅनॉपीतील गर्दीत असलेली पाने पिवळी पडतात. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक पान सूर्यप्रकाशात येईल. याकरिता मणी सेटिंगनंतर सुद्धा गर्दी असलेल्या फुटी काढून टाकायला हरकत नाही.

दुसऱ्या परिस्थितीमध्ये पाने पिवळी पडण्याची कारणे म्हणजे फेरस किंवा नत्राची कमतरता असू शकते. खुंटावर असलेल्या वेलीवर पहिल्या वर्षी फेरसची कमतरता आढळून येते. अशावेळी जमिनीतून फेरस सल्फेटची पूर्तता करावी किंवा चिलेटेड स्वरूपात असलेल्या फेरसची फवारणी करून असलेली कमतरता लगेच भरून काढता येईल.

काडी लवकर परिपक्व होते

बागेमध्ये काडीची परिपक्वता काही ठिकाणी लवकर होते. अशावेळी बागेत घडाचा आकार कमी राहतो. तेव्हा बागेत वेळीच देठ परीक्षण करून घेतल्यास वेलीची परिस्थिती कशी आहे. याची कल्पना येते. आपण बागेत छाटणीच्या 60 दिवसांनंतर फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा देतो. तेव्हा बागेत यापूर्वीचा अनुभव असल्यास उपलब्ध असलेल्या 0:52:34 किंवा 12:61:0 अशा प्रकारच्या ग्रेडमधून परिस्थितीनुसार खते बदलावीत.

गर्डलिंगच्या अडचणी

द्राक्ष बागेत मणी सेटिंगनंतर गर्डलिंग करण्याची पद्धत आपण अवलंबतो. गर्डलिंग केल्यामुळे मण्यांचा आकार साधारणत: एक ते दीड मि.मी. वाढतो. यामुळे एकरी उत्पादनाचा विचार केल्यास जवळपास एक टन उत्पादनात घट होते. परंतु आपण बऱ्याचवेळा गर्डलिंगची योग्य वेळ सांभाळत नसल्यामुळे काही अडचणीला तोंड द्यावे लागते.

थॉमसन सीडलेसमध्ये चार ते सहा मि.मी. व तसेच शरदमध्ये सहा ते आठ मि.मी. मण्याच्या अवस्थेत गर्डलिंग केल्यास त्याचे परिणाम चांगले होत असल्याचे दिसून आले. बऱ्याचवेळा बागायतदार छाटणीपासून दिवस मोजतात. त्यानुसार बागेत गर्डलिंग करतात; परंतु वातावरणातील तापमान किंवा छाटणीच्या वेळी असलेल्या पावसामुळे बाग फुटायला व वाढ होण्यास कमी-अधिक वेळ लागतो. त्यामुळे गर्डलिंग दिवसांचा विचार न करता स्टेजपासून करणे महत्त्वाचे असते.

गर्डलिंग करण्याकरिता बागेत महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा, तो म्हणजे वेलीवर असलेली घडांची संख्या व उपलब्ध असलेले पाणी. वेलीवर घडांची संख्या जास्त असल्यास व पाण्याचा पुरवठा त्या वेळी पूर्ण झाला नसल्यास गर्डलिंगचे परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे वेलीला ताण बसतो. ताण बसल्यामुळे गर्डलिंगची जखम भरत नाही. कालांतराने बागेत उत्पादनक्षमता कमी होते. कधी कधी खोड वाळायला सुरवात होते. या परिस्थितीवर मात करण्याकरिता बागेत घडांची संख्या मोजली असल्यास (एक घड प्रति वर्ग फूट) व तसेच बागेत पाणी भरपूर असल्यासच गर्डलिंग करावे.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.08695652174
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:50:50.664463 GMT+0530

T24 2019/05/24 20:50:50.670865 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:50:50.321417 GMT+0530

T612019/05/24 20:50:50.342728 GMT+0530

T622019/05/24 20:50:50.393536 GMT+0530

T632019/05/24 20:50:50.394429 GMT+0530