Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/22 06:37:57.166611 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / पर्यावरणपूरक सेंद्रिय शेती
शेअर करा

T3 2019/05/22 06:37:57.171548 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/22 06:37:57.195414 GMT+0530

पर्यावरणपूरक सेंद्रिय शेती

अतिउत्पादन घेण्याच्या लालसेने व पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वारेमाप वापर वाढला आहे. त्यातच गावरान बियाणे जाऊन संकरित बियाणे लागवडीकडेही कल वाढला आहे.

अतिउत्पादन घेण्याच्या लालसेने व पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वारेमाप वापर वाढला आहे. त्यातच गावरान बीयाणे जाऊन संकरित बियाणे लागवडीकडेही कल वाढला आहे. मात्र, फळे व भाजीपाल्यावरील कीटकनाशकांचे अंश थेट मानवी शरीरात जाऊ लागल्याने आज मानव विविध आजारांना बळी पडू लागला आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन राज्य शासनाने ‘सेंद्रिय शेती धोरण’ जाहीर केले आहे. त्यासाठीच सेंद्रिय शेती म्हणजे काय?  सेंद्रिय शेतीचे फायदे काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  
सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गचक्राच्या साह्याने करावयाची शेती. त्यात नैसर्गिक घटकांचा अधिकाधिक  पुनर्वापर आणि  कृत्रिम घटकांच्या कमीत कमी वापरासह या दोन्ही घटकांची योग्य सांगड घालणे आवश्यक असते.

सेंद्रिय शेती पद्धतीचे घटक

  • वनस्पतीजन्य पदार्थांचा कीडनाशक म्हणून वापर. उदा.निंबोळी , लसूण, तंबाखू, गोमूत्र, गांडूळ खत, नोडेप-कंपोस्ट खत अादी सेंद्रिय पदार्थांच्या वापरावर भर.
  • जीवाणू खतांचा अिधक वापर व संवर्धन, केरकचऱ्यासह टाकाऊ पदार्थ, सडलेली फळे, सांडपाणी यांचा वापर, निळ्या-हिरव्या शेवाळाचा खत म्हणून वापर.
  • सेंद्रिय, जैविक, हिरवळीची खते व पेंडी, मलमूत्र, मळी आदी घटकांच्या वापरावर भर. पाण्याचा प्रमाणशीर वापर करण्यासह मित्र कीटक व पक्ष्यांचे संरक्षण करणे.
  • जमिनीतून पिकांसाठी घेतल्या जाणाऱ्या अन्नद्रव्यांएवढी अन्नद्रव्ये जमिनीत जातील अशी व्यवस्था करण्यावर भर, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सुकर अशा शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य.
  • शेतीत पिकांची फेरपालट, मिश्रपीक पद्धत, द्विदल पिकांचा समावेश व नैसर्गिक साधनसंपत्तीचा साखळी पद्धतीने वापर करून जमिनीची उत्पादकता वाढवणे. यासह कमी मशागत व आच्छादन.

सेंद्रिय शेतीचे फायदे

  • आरोग्यास पोषक शेती माल देणारी, जमिनीची सुपीकता टीकवून ती वाढवणारी, पाण्याचा कमीत कमी व गरजेपुरता वापर करणारी, शून्य किंवा कमीत कमी भांडवल लागणारी, स्थानिक साधनसामग्री, ज्ञान व श्रमाच्या वापराची गरज असलेली ही शेती पद्धत आहे.

सेंद्रिय शेतीचे ऑयडॉल


कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील अल्पभूधारक शेतकरी तानाजी निकम यांनी अवघ्या दीड एकर शेतात लहरी निसर्गाशी दोन हात करून प्रतिकूल परिस्थितीतही कल्पकतेने सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले. या प्रयोगांतून त्यांनी जगातील सर्वात उंच भात पीक, सर्वाधिक शेंगा देणारी तुरीची झाडे व हरभऱ्याच्या पिकाचा जागतिक विक्रम केला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील लोहारा येथील कृषिभूषण शेतकरी विश्वासराव पाटील यांनी दोन सरींआड कमी पाण्यात उसाचे अधीक उत्पादन घेण्याचा प्रयोग केला आहे. याशिवाय गडचिरोलीतील धनराज जैन या आदिवासी भागातील शेतकऱ्यानेही केवळ पाऊण एकर जमिनीतून भाताचे उच्चांकी उत्पादन मीळवले आहे.


- अशोक देशेट्टी, केव्हीके, पाल ता. रावेर जि. जळगाव

3.05769230769
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/22 06:37:57.426589 GMT+0530

T24 2019/05/22 06:37:57.433125 GMT+0530
Back to top

T12019/05/22 06:37:57.074682 GMT+0530

T612019/05/22 06:37:57.092995 GMT+0530

T622019/05/22 06:37:57.155374 GMT+0530

T632019/05/22 06:37:57.156255 GMT+0530