Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:47:29.474984 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / प्रीब्लूम, मणी सेटिंग अवस्थेतील द्राक्षबागांसाठी नियोजन...
शेअर करा

T3 2019/10/14 23:47:29.479771 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:47:29.506018 GMT+0530

प्रीब्लूम, मणी सेटिंग अवस्थेतील द्राक्षबागांसाठी नियोजन...

द्राक्षबागेत गेल्या आठवड्यात चांगले वातावरण होते. सध्या बागेमध्ये वाढीच्या प्रीब्लूम व मणी सेंटिंग या अवस्था आहेत. या अवस्थेत करावयाची कामे व त्यांचे नियोजन याविषयी माहिती घेऊ.

द्राक्षबागेत गेल्या आठवड्यात चांगले वातावरण होते. सध्या बागेमध्ये वाढीच्या प्रीब्लूम व मणी सेंटिंग या अवस्था आहेत. या अवस्थेत करावयाची कामे व त्यांचे नियोजन याविषयी माहिती घेऊ.

प्रीब्लूम अवस्थेतील द्राक्षबाग - या अवस्थेतील द्राक्षबागेत सध्या जीएची फवारणी व फेलफूट काढणे महत्त्वाचे असेल.

  1. बऱ्याच वेळा आपण घड दिसत नसल्यामुळे फेलफूट उशिरा काढतो; परंतु, वेलीवर द्राक्षघड हे डोळा फुटल्यानंतर ठराविक कालावधीमध्येच येतात. या कालावधीमध्ये पावसाळी वातावरण असते. कॅनॉपीमध्ये गर्दी वाढून रोगाच्या प्रादुर्भावास आवश्‍यक वातावरण लवकर तयार होते, तेव्हा वेळीच फेलफूट काढून टाकल्यास रोगाचा प्रसार कमी होईल. फवारणी करताना अपेक्षित कव्हरेज मिळेल व फुटींची वाढ व्यवस्थित होईल.
  2. प्रीब्लूम अवस्थेमध्ये घडाची लांबी व पाकळ्यांतील अंतर वाढवणे गरजेचे असते. असे केल्यास बागेमध्ये पुढील काळात विरळणी (थिनिंग) करण्याची फारशी गरज पडत नाही. याकरिता घडाच्या विशिष्ट अवस्थेमध्येच बागेत जीएची फवारणी करावी.
  3. वातावरणातील तापमान कमी झालेले असून, उशिरा छाटणी झालेल्या बागेमध्ये, तसेच जमीन भारी असलेल्या बागेमध्ये प्रीब्लूमची अवस्था 19-20 दिवसांमध्ये दिसेल. अन्य बागेमध्ये ती 17-18 दिवसांत दिसून येईल. प्रीब्लूम अवस्थेत आपण जीएची फवारणी साधारणतः 10 पीपीएमप्रमाणे करतो. मात्र, ही फवारणी करण्यास उशीर झाल्यास 10ऐवजी 15 पीपीएमने फवारणी करावी.
  4. तापमान कमी झाल्याने छाटणी उशिरा झालेल्या बागेत वेलीचा शेंडा वाढणे शक्‍य होत नाही. घडाच्या पुढे साधारणतः 10-12 पाने आवश्‍यक असतात. पानांची संख्या मणी सेटिंगपर्यंतच करून घेणे गरजेचे असते, तेव्हा प्रीब्लूम अवस्थेमध्येच नत्राचा आवश्‍यक तो वापर करून शेंडावाढ करून घ्यावी.
  5. मणी सेटिंग झालेली बाग - या बागेमध्ये आता मणी विरळणी हे महत्त्वाचे काम करावयाचे आहे. बागेत सोर्स - सिंकचे संतुलन ठेवून घडांची संख्या निर्धारित करून घ्यावी. या वेळी घडांची विरळणीसुद्धा महत्त्वाची असून, बागेत उशिरा आलेले व अशक्‍त असे बारीक घड काढून टाकणे सोपे होते.
  6. मणी थिनिंग करते वेळी द्राक्ष जात लक्षात घ्यावी - वेगवेगळ्या जातींमध्ये मण्यांचा आकार हा कमी-अधिक असतो. उदा. काळ्या रंगातील द्राक्षजातीमध्ये मण्यांचा आकार हा 22-24 मि.मी.पर्यंत असतो. अशा जातीमध्ये 70-80 मणी प्रत्येक घडामध्ये राखल्यास आकार व मण्याचे वजन चांगले मिळवण्यास मदत होते. मण्याचा आकार वाढणे, म्हणजेच प्रत चांगली मिळणे, असा त्याचा अर्थ होतो. याच तुलनेमध्ये थॉमसन सिडलेस, तास-ए-गणेश जातींमध्ये 100 ते 120 मणी राखले जातात.
  7. मणी सेटिंगनंतर पहिला डीप किंवा आता आपण वापरत असलेली नवीन फवारणीची पद्धत या गोष्टी संपल्यानंतर पुन्हा रिव्हर्स डीप घेण्याची अवस्था येते. या अवस्थेमध्ये थिनिंग करून घ्यावे. या वेळी मण्यांची वाढ फार जोमाने होते. त्यासाठी ठराविक कालावधीमध्येच मणी थिनिंग केल्यास सोर्ससिंकचा उपयोग चांगला होतो.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.02298850575
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:47:29.743284 GMT+0530

T24 2019/10/14 23:47:29.749594 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:47:29.379252 GMT+0530

T612019/10/14 23:47:29.399529 GMT+0530

T622019/10/14 23:47:29.463814 GMT+0530

T632019/10/14 23:47:29.464754 GMT+0530