Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 09:45:53.785669 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / मणी सेटिंगनंतर घडाच्या विकासाकडे लक्ष द्या
शेअर करा

T3 2019/05/20 09:45:53.790221 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 09:45:53.815837 GMT+0530

मणी सेटिंगनंतर घडाच्या विकासाकडे लक्ष द्या

द्राक्ष बागेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सर्वत्र पाऊस झाला. बागेमध्ये वातावरण चांगले असून, मणी सेटिंग अवस्था संपलेल्या बागेमध्ये घडाचा विकास महत्त्वाचा आहे.

द्राक्ष बागेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सर्वत्र पाऊस झाला. बागेमध्ये वातावरण चांगले असून, मणी सेटिंग अवस्था संपलेल्या बागेमध्ये घडाचा विकास महत्त्वाचा आहे. 

मणी सेटिंगनंतरची अवस्था

या अवस्थेतील बागांमध्ये फळकूज, मणीगळ यासारख्या अडचणी कमी झाल्या असून, मण्यांचा विकास लवकर करण्यासाठी नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा असून, थंडी अद्याप सुरू झालेली नाही. मात्र पाऊस थांबल्यानंतर थंडी सुरू होईल. थंडी सुरू झाल्यानंतर मण्यांचा विकास होण्यामध्ये अडचणी येतात. म्हणून थंडी पडण्याआधी मणी सेटिंगनंतरचा जीएचा डीप, रिव्हर्स डीप, विरळणी आणि गर्डलिंग ही कामे करून घ्यावीत.

  • ज्या बागेमध्ये 6 ते 8 मि. मी. जाड मण्याची अवस्था आहे, अशा बागेमध्ये मण्यांचा विकास जलद होत असतो. त्यासाठी वेलीची मुळी चांगल्या प्रकारे कार्यरत राहील, याकडे लक्ष द्यावे. बोद घट्ट झाले असल्यास बोदाच्या बाजूला फणून घेतल्यास मुळीचे कार्य वेगाने होण्यास मदत होईल.
  • या वेळी तापमान कमी झाले असल्यास भुरीचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. त्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करून रोग नियंत्रणात ठेवावा.
  • ज्या बागेमध्ये घडाच्या आधी असलेली तळातील पाने काढली आहेत, तिथे काड्याची गर्दी कमी असून, रोगांचा प्रादुर्भाव कमी असेल. त्या दृष्टीने नियोजन करावे.

कलम केलेली बाग

या बागेत फुटीची वाढ होण्याची अवस्था आहे. काही बागेमध्ये डोळे फुटताना जळण्याची समस्या असल्याचे समजते. अशा ठिकाणी बुरशीनाशकांचे ड्रेंचिंग करावे. तसेच बागेमध्ये डीएपी 25 किलो प्रति एकर प्रमाणे जमिनीतून द्यावे. तसेच नत्राची उपलब्धता रोज करावी. त्यामुळे मुळी कार्यरत राहून पुढील निघालेली फूट वाढीला सुरवात होईल. पुढील थंडीच्या काळात फुटीची वाढ होणार नाही.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.02631578947
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 09:45:54.062167 GMT+0530

T24 2019/05/20 09:45:54.068463 GMT+0530
Back to top

T12019/05/20 09:45:53.718462 GMT+0530

T612019/05/20 09:45:53.737593 GMT+0530

T622019/05/20 09:45:53.775799 GMT+0530

T632019/05/20 09:45:53.776571 GMT+0530