Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:47:16.297707 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / मनमोहक - तरीही घातक विजा
शेअर करा

T3 2019/10/14 23:47:16.302416 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:47:16.328682 GMT+0530

मनमोहक - तरीही घातक विजा

आकाशात चमकणाऱ्‍या मनमोहक विजेचे अनेक प्रकार आहेत. सळसळत्या नागमोडी धावणाऱ्‍या विजा नेहमीच दिसतात; मात्र माळेत ओवलेल्या मण्यांसारखे तुटक-तुटक पडणाऱ्या विजाही असतात.

आकाशात चमकणाऱ्‍या मनमोहक विजेचे अनेक प्रकार आहेत. सळसळत्या नागमोडी धावणाऱ्‍या विजा नेहमीच दिसतात; मात्र माळेत ओवलेल्या मण्यांसारखे तुटक-तुटक पडणाऱ्या विजाही असतात. एखाद्या रिबन किंवा दोऱ्यासारखी हवेबरोबर झुलत सरकणाऱ्या विजाही दिसतात. अनेकदा विजेचे चेंडू अथवा गोळेही पडतात किंवा हवेत पुढे सरकताना आढळतात. विजेचे हे विविधरंगी आढळणारे गोळे अनेक करामती करतात.

  • त्यामागील विज्ञान पूर्णपणे न समजल्याने अशा विजा चमत्कारिक भासतात. ढगाकडून धन विद्युतभार स्थानांतरित झाल्यास धन विजा (पॉझिटिव्ह लायटनिंग) व ऋण विद्युतभार स्थानांतरित झाल्यास ऋण विजा (निगेटिव्ह लायटनिंग) असे संबोधतात.
  • जमिनीवर पडणाऱ्‍या दहापैकी आठ विजा या ऋण विजा असतात. धन विजांमध्ये जास्त करंट असतो. त्यामुळे त्या अधिक विध्वंसक ठरतात.

पहिले प्रकाश मग आवाज

  • विजा चमकतात तेव्हा हवेला जाळत जाणाऱ्‍या विद्युतप्रवाहामुळे प्रकाश, तर हवेच्या आकुंचन-प्रसरणाने ध्वनी उत्पन्न होतो.
  • प्रकाश एका सेकंदात ३०० लाख मीटर एवढ्या वेगाने, तर ध्वनी ३४० मीटर प्रती सेकंद वेगाने हवेतून प्रवास करतो. प्रकाश व ध्वनी वेगातील या तफावतीमुळे विजा चमकल्याच्या आपण आधी पाहतो आणि त्यांचा आवाज नंतर ऐकू येतो.
  • वीज चमकल्यानंतर त्या ठिकाणी निर्माण होणारी हवेची पोकळी भरून काढण्यासाठी अचानक होणाऱ्या हवेच्या आकुंचनामुळे बनलेल्या हवेच्या लाटा एकमेकांवर आदळतात आणि हवेतील कंपनामुळे स्फोटासारखा आवाज ऐकू येतो. विजांची ‘एकॉस्टिक शॉक वेव्ह’ म्हणजेच हवेची ही कंपने खिडकीच्या काचाही अनेकदा फोडून टाकतात.

बिनआवाजी आणि कोरड्या विजा

  • वळिवाच्या पावसाआधी ‘उन्हाळी विजा’ (हिट लायटनिंग) चमकताना दिसतात. त्या बिनआवाजाच्या असतात. त्याचप्रमाणे २५ ते ३० किलोमीटर लांब अंतरावर चमकणाऱ्‍या विजा आपल्याला दिसू शकतात; मात्र त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येण्याआधीच क्षीण होऊन हवेत विरून जातो.
  • पावसाचे थेंब जमिनीवर पोचण्याआधीच जेव्हा उष्णतेने त्यांचे बाष्पीभवन होते, अशा वेळी चमकणाऱ्‍या विजांना पावसाअभावी ‘कोरड्या विजा’ (ड्राय लायटनिंग) म्हणतात. या दोन्ही प्रकारच्याही विजा प्राणघातक असतात.

नागमोडी विजा

विजेचा प्रवाह हवेतून पुढे सरकताना नेहमी कमी रोध (resistance) असलेला मार्ग निवडतात. हवेचा रोध सर्वत्र सारखा नसतो, त्यामुळे सरळ रेषेऐवजी अनेक शाखा-उपशाखांसह विजा प्रवास करतात. त्यामुळे विजा अनेक वेळा वेड्यावाकड्या नागमोडी असतात.

 

स्त्रोत: अग्रोवन

2.86086956522
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:47:16.563043 GMT+0530

T24 2019/10/14 23:47:16.569717 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:47:16.222077 GMT+0530

T612019/10/14 23:47:16.244205 GMT+0530

T622019/10/14 23:47:16.287371 GMT+0530

T632019/10/14 23:47:16.288236 GMT+0530