Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:04:4.904157 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / मॉन्सूनसाठी उपग्रहाद्वारे मोजमापन
शेअर करा

T3 2019/10/15 00:04:4.908692 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:04:4.934842 GMT+0530

मॉन्सूनसाठी उपग्रहाद्वारे मोजमापन

उपग्रहामध्ये एकूण हवामानासंबंधी बहुउद्देशीय माहिती सतत गोळा करणारी इन्फ्रारेड साऊंडर्स, मायक्रोवेव्ह साऊंडर्स, मायक्रोवेव्ह इमेजर्स, स्कॅटरोमीटर्स आणि राडार अल्टिमीटर्स यांसारखी अतिप्रगत उपकरणे आहेत

केवळ हवामानाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र उपग्रह सोडण्याच्या मालिकेची सुरुवात भारताने ‘मेटसॅट’ (नंतर कल्पना-१ असे नामकरण) हा उपग्रह १२ सप्टेंबर २००२ रोजी अवकाशात सोडून केली. या मालिकेतील ‘इन्सॅट-३डीआर’ हा ९ सप्टेंबर २०१६ रोजी सोडलेला आपला अलीकडचा उपग्रह आहे.

त्यामध्ये एकूण हवामानासंबंधी बहुउद्देशीय माहिती सतत गोळा करणारी इन्फ्रारेड साऊंडर्स, मायक्रोवेव्ह साऊंडर्स, मायक्रोवेव्ह इमेजर्स, स्कॅटरोमीटर्स आणि राडार अल्टिमीटर्स यांसारखी अतिप्रगत उपकरणे आहेत. मॉन्सूनच्या अंदाजासाठी प्रमुख घटकांबाबत योग्य एककांत माहिती प्राप्त केली जाते.

’ ढगांची उंची, व्याप्ती आणि त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण ’ ढग आणि त्यांच्यावरील वातावरणातील तापमान आणि ’ समुद्रावरील तापमान ’ खुल्या समुद्रावरील वाऱ्यांचा वेग ’ बाष्पीकरणाची तीव्रता ’ हिमालयातील हिमनगांची व्याप्ती आणि स्थित्यंतरे अशा घटकांच्या माहितीचा वापर हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेग मोजणे, तिबेटच्या पश्चिम-मध्य व पूर्व पठारात वाढणारे तापमान आणि मध्य पाकिस्तानावरील कमी होणारे तापमान तपासणे; तसेच कमी दाबाचे पट्टे यांचा संख्यात्मक वेध घेणे यासाठी केला जातो. त्याआधारे गणिती पद्धतींनी मॉन्सूनचे आगमन आणि एकूण पर्जन्यवृष्टीबाबत अंदाज वर्तवला जातो.

मॉन्सूनदरम्यान घडणाऱ्या हवेतील काही विशिष्ट आंदोलनांमुळे मध्येच काही काळ पाऊस पडत नाही याचा मागोवाही उपग्रहाच्या छायाचित्रांनी आणि आकडेवारीने घेतला जातो. असा कोरडा काळ लांबला तर शेतात केलेली पेरणी फुकट जाते. म्हणून याबाबतचा अंदाज जास्तीत जास्त अचूक करून तो शेतकऱ्यांना वेळेवर कळवणे अतिशय महत्त्वाचे असते.

मॉन्सूनच्या अंदाजासाठी भारतात पूर्वी वापरल्या जाणाऱ्या १६ घटक आधारित प्रतिकृतीसाठीही उपग्रहाद्वारे मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जात असे. आता वापरात असलेल्या नव्या संख्यात्मक हवामान अंदाज प्रणालीसाठीदेखील उपग्रहाने दिलेली निरीक्षणे कळीची भूमिका बजावत आहेत.

पाऊस, हवामानाचा अंदाज अधिक अचूकतेने करण्यासाठी, उपग्रहाकडून मिळालेली छायाचित्रे-आकडेवारी आणि पारंपरिक वेधशाळेने गोळा केलेली माहिती यांचा संयुक्त वापर केला जातो. आता प्रत्येक जिल्ह्य़ासाठी मॉन्सूनदरम्यान एकूण पाऊस, जवळच्या काळातील पाऊस (४८ ते ७२ तास) आणि अनौपचारिकरीत्या आगामी २० दिवसांतील पाऊस याबद्दल भारतीय हवामान खाते अंदाज पुरवते.

‘उपग्रह हवामानशास्त्र’ अशी एक नवी शाखा उदयास आली असून भारत त्यात भरीव योगदान करू शकतो; कारण आपले स्वत:चे उपग्रह आता उपलब्ध आहेत.

 

लेखक : डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२

2.9347826087
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:04:5.407606 GMT+0530

T24 2019/10/15 00:04:5.414420 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:04:4.835299 GMT+0530

T612019/10/15 00:04:4.853463 GMT+0530

T622019/10/15 00:04:4.894208 GMT+0530

T632019/10/15 00:04:4.894977 GMT+0530