Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:03:1.622302 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / वाढत्या आर्द्रतेने द्राक्ष बागेत वाढताहेत समस्या
शेअर करा

T3 2019/10/15 00:03:1.627183 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:03:1.655573 GMT+0530

वाढत्या आर्द्रतेने द्राक्ष बागेत वाढताहेत समस्या

सध्या सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी उघडीप दिसत असली तरी हवामानाच्या अंदाजानुसार पुन्हा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. बागेमध्ये आर्द्रता फार वाढलेली आहे.

सध्या सर्व द्राक्ष विभागामध्ये पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी उघडीप दिसत असली तरी हवामानाच्या अंदाजानुसार पुन्हा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. बागेमध्ये आर्द्रता फार वाढलेली आहे. यामुळे बागेत वेगवेगळ्या अडचणी उद्‌भवत आहेत. त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती या लेखातून घेऊ.

अवेळी पानगळ होणे

बऱ्याच बागांमध्ये ही परिस्थिती दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर पाऊस झालेल्या बागेमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. परिणामी, रोगांच्या जिवाणूने पानातील रस शोषून घेतल्याने पाने अशक्त झाली. पानांची देठांशी असलेली मजबुती कमी होऊन आता बागेत अवेळी पानगळ दिसून येत आहे.

बागेत रोगांचा प्रादुर्भाव होणे

गेल्या काही दिवसांतील सतत पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. बागेत निघालेल्या नवीन फुटींवर करपा व डाऊनी मिल्ड्यू या रोगांचा प्रादुर्भाव मुख्यतः दिसतो. अशा बागेत पानगळ होताना दिसून येईल. यावर त्वरित उपाययोजना करताना बागेतील कोवळ्या फुटी काढून टाकाव्यात. त्यानंतर शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी त्वरित करावी. कॅनॉपीमध्ये गर्दी अधिक वाढल्यास डाऊनी मिल्ड्यूची समस्या जास्त प्रमाणात राहील. तेव्हा कॅनॉपी मोकळी ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

डोळा फुटण्याची समस्या

द्राक्ष बागेत सध्या काही बागांमध्ये महत्त्वाचा डोळा फुटत (कापसत) असल्याची समस्या दिसून येते. 
ज्या बागेत बऱ्यापैकी पानगळ झाली व नवीन निघालेली फूटसुद्धा काढून टाकलेल्या बागेत ही समस्या जास्त दिसते. आपण फळछाटणीपूर्वी पानगळ करतो, तशीच परिस्थिती आता रोगांच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवली आहे. 
त्यावर मात करण्याकरिता काडीवर येणारी नवीन फूट तशीच वाढू द्यावी. ही फूट 4-5 पानांची झाल्यानंतर शेंडापिचिंग (फक्त टिकली मारणे) करावे. असे केल्याने खालचा महत्त्वाचा डोळा सुप्तावस्थेत राहील व फुटणार नाही. आपल्याला फळछाटणीकरिता काही वेळ थांबता येईल.

कलम काडी लवकर फुटणे

कलम करतेवेळी आपण परिपक्व झालेली काडी सायनकाडी वापरतो. ही काडी दोन डोळ्यांची असते. कलम केल्यानंतर ही काडी जवळपास 18 ते 20 दिवसांमध्ये फुटते.

  • जर कलम करण्याकरिता पूर्ण परिपक्व झालेली काडी वापरली नसल्यास लवकर डोळे फुटण्याची दाट शक्‍यता असते.
  • काही वेळा खुंटकाडी फार रसरशीत असते व कलम करण्याकरिता वापरण्यात आलेली काडी ही संजीवकाची फवारणी झालेल्या बागेतून घेतलेली असल्यास लवकर डोळा फुटण्याची परिस्थिती दिसून येईल.
  • काही वेळा वातावरणातील वाढती आर्द्रता व जास्त तापमानामुळे काडी लवकर फुटण्यास मदत होते. सायनकाडीवरील डोळा लवकर फुटला तरी घाबरण्यासारखे काहीच नाही.
  • जमिनीतून या वेळी दोन दिवसांतून अर्धा किलो युरिया देऊन वाढ व्यवस्थित करून घ्यावी. यामुळे सोबतच कलमजोडामध्ये कॅलससुद्धा तयार होईल.


020 - 26956060 
(लेखक द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत:अग्रोवन

 

2.95555555556
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:03:1.887833 GMT+0530

T24 2019/10/15 00:03:1.894316 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:03:1.525589 GMT+0530

T612019/10/15 00:03:1.544139 GMT+0530

T622019/10/15 00:03:1.611373 GMT+0530

T632019/10/15 00:03:1.612340 GMT+0530