অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विजांची रंगीत आतिषबाजी

विजांची रंगीत आतिषबाजी

विजांची रंगीत आतषबाजी

अनेकदा विजा वेगवेगळ्या रंगांच्या दिसतात. पांढऱ्याशुभ्र, निळसर, जांभळ्या, लालसर, केसरी इतकेच नाही, तर हिरव्या व पिवळ्या रंगांच्या विजाही दिसतात. विजांमध्ये इंद्रधनुष्याप्रमाणे सर्व रंगछटा आढळून येतात. विजांच्या रंगांची आतषबाजी खालील घटकांवर अवलंबून असते.

  • कुठलाही रंग प्रकाशाची डोळ्यांपर्यंत पोचणारी तरंगलांबी (वेव्हलेंथ) किंवा वारंवारिता, कंप्रता (फ्रिक्वेन्सी) यावर अवलंबून असतो.
  • जेव्हा विजांचे तापमान जास्त असते तेव्हा त्या पांढऱ्याशुभ्र किंवा निळसर दिसतात तर कमी तापमानाच्या विजा तांबूस किंवा लालसर दिसतात.
  • विजा चमकतांना पाण्याच्या थेंबातून प्रकाशाचे पृथक्करण झाल्याने एकच वीज वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या रंगांची भासू शकते. जवळून लालसर वाटणाऱ्या विजा दुरून पांढऱ्या किंवा दुधी रंगाच्या भासण्यामागे विजा व वेगवेगळ्या व्यक्तींच्या पाहताना होणारा कोन हा महत्त्वाचा घटक आहे.
  • सकाळी किंवा सायंकाळी जास्त अंतर कापत सूर्य प्रकाशाच्या होणाऱ्या वक्रीभवनाप्रमाणेच क्षितिजाजवळच्या मात्र दूरवर चमकणाऱ्या विजा अनेकदा गुलाबी किंवा केशरी रंग छटांमध्ये दिसतात.
  • वातारणातील धूलिकण, धुके, धूर, बर्फाचे कण, गारा, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, विविध पथदीप किंवा इतर उजेड यामुळे देखील विजांचा रंग वेगळा भासतो.
  • विज पडताना वातारणातील विविध वायूंचे विघटन होत त्याचे आयन बनताना स्थानिक हवामानानुसार वायू-प्रदूषणाच्या घटकांचे प्रकार व प्रमाण यावर देखील विजांचा रंग अवलंबून असतो.
  • विजा ज्या वस्तूवर कोसळतात त्या वस्तूंच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या प्रकाशावरही दिसणारा रंग अवलंबून असतो. विद्युत खांबावर व उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहावर किंवा ऊर्जा केंद्रावर तसेच ट्रान्स्फॉर्मर (रोहित्र) आदींवर कोसळणाऱ्या विजांच्या ठिणग्या हिरव्या, पिवळ्या रंगछटांमध्ये दिसतात.
  • दोन विजा एकाच रंगाच्या कधीच नसतात. इतकेच नाही तर एकाच विजेच्या वेगवेगळ्या शलाकादेखील विविध रंगछटा घेत अवतरतात.
  • विजांचे फोटो काढताना कॅमेऱ्यांच्या क्षमतांनुसार व प्रिंटिंगच्या प्रकारानुसारदेखील विजांचे रंग छायाचित्रणात वेगळे दिसू शकतात.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate