Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:20:58.168374 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / व्यवस्थापन कलम केलेल्या बागेचे...
शेअर करा

T3 2019/05/26 00:20:58.173121 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:20:58.199473 GMT+0530

व्यवस्थापन कलम केलेल्या बागेचे...

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्वत्र तापमान कमी झाल्याचे दिसते आहे. या तापमानात बागेत बऱ्याच चांगल्या तसेच वाईट घडामोडी होताना आढळून येतील.

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्वत्र तापमान कमी झाल्याचे दिसते आहे. या तापमानात बागेत बऱ्याच चांगल्या तसेच वाईट घडामोडी होताना आढळून येतील. द्राक्षवेलीमध्ये विशिष्ट तापमानामध्येच शरीरशास्त्रीय (फिजिऑलॉजिकल) हालचाली होत असतात. कमीत कमी तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली आल्यास या हालचाली मंदावतात. याचाच एक भाग म्हणजे वाढत असलेल्या मण्यांचा आकार या थंडीत कमी राहतो. द्राक्ष बागेत कलम केलेल्या ठिकाणीसुद्धा अशाच अडचणीला सामोरे जावे लागते. सध्याच्या परिस्थितीमध्ये बागेतील संभाव्य अडचणी व त्यावरील उपाय याबद्दलची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.

कलम केलेल्या बागेत सुरवातीच्या काळात (जवळपास 20-22 दिवस) फक्त डोळा फुटतो. त्यानंतर फुटीची वाढ व्हायला सुरवात होते. या वेळी वातावरणात आर्द्रता भरपूर असते व सोबतच तापमानसुद्धा वाढलेले असते. अशा परिस्थितीमध्ये कलमकाडीची वाढ फार जोमाने होते. बागेत आपण वाढ होण्याकरिता युरिया व 19 ः 19 ः 19 किंवा डीएपीची उपलब्धता या वेळी करतो. त्यानंतरच्या काळात तापमानात घट येताना दिसते. या काळात जवळपास दीड ते दोन फूट शेंडावाढ झालेली दिसते. या वाढीनंतर बागेत कलमकाडीचा शेंडा पिवळा पडताना आढळतो. फेरसची कमतरता नेमकी या वेळी बागेत आढळून येते. कमी प्रमाणात पाने पिवळी दिसत असल्यास फेरस सल्फेटची दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व लगेच जमिनीतूनसुद्धा पाच ते सहा किलो प्रति एकरप्रमाणे उपलब्धता करून घ्यावी. खुंटावर कलम केलेल्या बागेत ही परिस्थिती पहिल्या वर्षी जास्त आढळून येते.

कलम केलेले डोळे फुटण्यास विलंब होणे

कलम करण्याकरिता आपण ज्या वेलीवरून सायनकाडी घेतो, त्या ठिकाणी एक तर इथेफॉनची फवारणी झालेली असते किंवा काही ठिकाणी हाताने पानगळ झालेली असते. जी काडी आपण कलम करण्याकरिता वापरतो, त्या काडीवर डोळा जर फुगला नसेल, तर कलम केल्यानंतर डोळा फुटण्यास उशीर होतो. जर वातावरणात आर्द्रता व तापमान जास्त असेल, तर कलमकाडी लवकर फुटते, अन्यथा उशीर लागतो. उशिरा कलम केल्यानंतर बागेत काही दिवसांनंतर तापमान कमी होते. अशा वेळी डोळा फारच हळूहळू फुटतो. कलम करून एक ते दीड महिना संपला, परंतु डोळा अजून फुटत नाही अशी परिस्थिती असते. कलमकाडीचा डोळ्याजवळ काप घेतल्यास काडी हिरवी असल्याचे दिसते. विशेष म्हणजे बागेतील वातावरणाच्या असमतोलामुळे ही परिस्थिती आढळून येते. अशा वेळी बागेत नत्राचा पुरवठा व भरपूर पाणी दिल्यास आर्द्रता वाढेल व त्याचसोबत वेलीचा सॅप फ्लो वाढेल (काडी रसरशीत होईल).

पानांच्या वाट्या होणे

बागेत कलम केल्यानंतर नवीन फूट जोमाने होताना आढळून येते. वातावरणातील तापमान व आर्द्रता याकरिता मदत करते. अशा वेळी जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा व गरज यामध्ये संतुलन जर झाले नाही, तर फुटीच्या पानांच्या वाट्या होताना दिसते. जर ही पानांची वाटी आतल्या बाजूला झालेली असेल, तर वेलीमध्ये पोटॅशची कमतरता आहे असे समजावे. या वेळी दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात पोटॅश मिसळवून फवारणी केल्यास लवकरच त्याचे परिणाम दिसून येतात. कारण पाने कोवळी असल्यामुळे शोषण करण्याची शक्ती या वेळी चांगली असते.

यासोबत दुसरी परिस्थिती अशी, की कलम केल्यानंतर ज्या वेळी बागेत तापमान जास्त असते, अशा वेळी कोवळ्या पानांवर रस शोषण करणारी कीड जास्त त्रास देताना आढळते. कोवळ्या पानांमधून रस शोषून घेतल्यानंतर पानांच्या कडांवर तपकिरी रंग दिसतो. पानांची वाटी झालेली दिसते. किडीच्या प्रादुर्भावाने जास्त प्रमाणात कोवळी, नवीन पाने ग्रस्त झालेली दिसतात, तर पोटॅशच्या कमतरतेमुळे जवळपास जुनी झालेली पाने वाटी झाल्यासारखी दिसतात. अशा वेळी बागेत परिस्थिती पाहून खतांचा पुरवठा करावा. त्याचसोबत शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी वेळीच करून घ्यावी.

 

स्त्रोत: अग्रोवन

2.89743589744
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:20:58.437515 GMT+0530

T24 2019/05/26 00:20:58.443918 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:20:58.072013 GMT+0530

T612019/05/26 00:20:58.089209 GMT+0530

T622019/05/26 00:20:58.157752 GMT+0530

T632019/05/26 00:20:58.158665 GMT+0530