Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:13:7.988924 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना
शेअर करा

T3 2019/10/14 23:13:7.993438 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:13:8.018264 GMT+0530

संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना

उन्हाळ्यात आणि पावसाळा संपताना संत्रा झाडे वाळण्याची समस्या विविध संत्रा बागांमध्ये आढळत आहे. परिणामी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

उन्हाळ्यात आणि पावसाळा संपताना संत्रा झाडे वाळण्याची समस्या विविध संत्रा बागांमध्ये आढळत आहे. परिणामी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोठ्या मेहनतीने तयार केलेली संत्र्याची झाडे एकाएकी वाळल्याने मेहनत आणि पैसा वाया जातो. ते टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. मागील काही वर्षांचा हवामानाचा आढावा आणि संत्रा झाडे वाळण्याची कारणमीमांसा करण्यासाठी संत्रा बागायतदारांशी चर्चा केल्यानंतर काही प्रमुख कारणे निदर्शनास आली.

संत्रा झाडे वाळण्याची कारणे

 1. संत्रा बागेला ओलीत करण्यास पाण्याची कमतरता : दिवसेंदिवस उन्हाळ्याचा कालावधी वाढत आहे. दर वर्षी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी होत असल्याने भूजल पातळी खोलवर जात आहे. ओलिताकरिता पाण्याचा साठा कमी पडत असून, उन्हाळ्यात संत्रा झाडांना पुरेसे ओलीत करता येत नाही.
 2. उन्हाळ्यातील वाढलेले अधिक तापमान : जागतिक पातळीवरील तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्यातील विशेषतः एप्रिल-मे महिन्यामध्ये तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. या अधिक तापमान व जमिनीत ओलावा नसल्यामुळे संत्रा झाडे वाळतात.
 3. संत्रा झाडावरील अधिक फळधारणा : संत्रा झाडावर प्रमाणापेक्षा जास्त फळे (प्रतिझाड 2500 ते 3000 फळे) घेणे. जास्त फळधारणा झाल्यानंतर विरळणी न करणे, यामुळे संत्रा झाडांचे प्रकृतिमान खालावते. परिणामी झाडे वाळतात.
 4. अतिवृष्टीमुळे बागेत साचलेले पाणी : हवामानातील बदलामुळे पाऊस समप्रमाणात न होता काही काळातच भरपूर पडतो. कधी कधी पावसाची झड सारखी 3-4 दिवस राहते. त्यामुळे बागेत पावसाचे पाणी साचून झाडांची तंतुमय मुळे सडतात.
 5. बुरशीजन्य (फायटोप्थोरा) रोगाचा प्रादुर्भाव : जास्त झालेल्या पावसामुळे संत्रा बागेतील जमिनीमध्ये फायटोप्थोरा या बुरशीला पोषक हवामान उपलब्ध होते. त्यामुळे संत्रा झाडाच्या मुळांवर फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतो. मुळ्या सडून अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडते. झाडे वाळतात.
 6. संत्रा बागेत मशागतीचा अभाव : संत्रा बागेतील महत्त्वाच्या मशागतीकडे दुर्लक्ष करण्यामुळे संत्रा झाडांना हानी पोचते. त्यासाठी खतपुरवठा, ओलीत व्यवस्थापन, सल काढणे आणि आंतरमशागत इत्यादी कामे वेळच्या वेळी करणे आवश्‍यक आहे.

संत्रा झाडे न वाळण्याकरिता उपाययोजना

 • उन्हाळ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊनच योग्य संख्येत झाडाची लागवड करावी. त्यामुळे झाडे योग्य प्रकारे ओलीत करणे व पोसणे शक्‍य होईल.
 • जमिनीत ओलावा टिकून राहण्याकरिता उन्हाळ्यात संत्रा झाडांचा वाफा गवताने आच्छादित करावा.
 • उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करण्याकरिता बागेसभोवताली शेवरीसारखे सजीव कुंपण लावावे.
 • संत्रा झाडावर जास्त झालेल्या फळांची विरळणी करावी. प्रतिझाड 800 ते 1000 फळे ठेवावीत.
 • पावसाचे पाणी बागेत साचणार नाही याकरिता पावसाळा सुरू होताच ओलिताकरिता केलेले वाफे मोडून टाकावेत. दोन झाडांच्या मधोमध एक चर (2 फूट रुंद, 1 फूट खोल लांबीच्या दिशेने) खोदावा. या चरामधून साचलेले पाणी बागेबाहेर जाईल.
 • संत्रा बागेतील महत्त्वाची उदा. खतपुरवठा, ओलीत व्यवस्थापन, सल काढणे इत्यादी कामे वेळेवर करावीत.

 

डॉ. सुरेंद्र रा. पाटील, 9881735353

(लेखक उद्यानविद्या महाविद्यालय,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,

अकोला येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

2.93103448276
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:13:8.253509 GMT+0530

T24 2019/10/14 23:13:8.259897 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:13:7.921523 GMT+0530

T612019/10/14 23:13:7.940305 GMT+0530

T622019/10/14 23:13:7.979030 GMT+0530

T632019/10/14 23:13:7.979824 GMT+0530