Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:47:2.155267 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / हवामान दर्शक यंत्र - कार्यशाळा
शेअर करा

T3 2019/10/15 00:47:2.159958 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:47:2.185790 GMT+0530

हवामान दर्शक यंत्र - कार्यशाळा

वातावरण बदलाशी अनुकूलन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना "हवामान दर्शक यंत्र" विषयाची कायर्शाळा घेण्यात आली त्यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

वातावरण बदल अ‍नुकुलन कार्यक्रम

शेतकरी हवामानदर्शक प्रशिक्षण / कार्यशाळा

अकोले तालुक्यात 12 गावांमध्ये वातावरण बदलाशी अनुकरन कार्यक्रम  चालु आहे त्यामध्ये महत्वाचे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम,महिलाविकास जीवनमान आधारीत कार्यक्रम होते. तसेच विषय पिक प्रात्यक्षित कार्यक्रम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेती निगडीत हवामान यंत्र आणि इतर अशा महत्वाच्या विषयावर हा कार्यक्रम चालू आहे .

शेती निगडीत हवामान यंत्र अकोले तालुक्यातील खालील गावांत बसवण्यात आले आहेत.

  1. केळी कोतुळ
  2. सोमलवाडी
  3. साकिरवाडी
  4. सातेवाडी

वरील CCA प्रकारच्या गावांमध्ये हवामान दर्शक यंत्रे बसवण्यात आली आहेत. ह्या यंत्रांचा फायदा , महत्व त्यापासुन मिळणारी माहीती ही सर्व  प्रकारची माहीती ग्रामस्थांना  समजणे गरजेचे आहे त्यासाठी CCA प्रकालपातील 12 गावांमध्ये शेती निगडीत हवामान यंत्राची माहीती देण्याची कार्यक्रम दि. 16/10/2013 ते 22/10/२०१३ या दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

शेती निगडीत हवामान यंत्राची माहीती शेतकरयांना देण्यासाठी WOTR संख्येचे हवामान विभाग प्रमुख श्री गणेश काकडे सर उपस्थित होते. त्याच बरोबर संजीवनी संस्थेचे तालुका प्रमुख श्री हरीभाऊ नागरे सर संस्था प्रतीनिधि श्री खेमनर आणि श्री ढवळे हे देखिल उपस्थीत होते. हवामान यंत्राची माहीती शेतक-याला व्यवस्थीत समजावी म्हणुन ही कार्यशाळा ज्या गावात हवामान दर्शक यंत्रे बसवीण्यात आली आहेत त्या यंत्राजवळ आयोजीत करण्यात आले होते त्यामुळे शेतक-याला यंत्र व यत्रांचे सर्व माहिती व त्याची नावे, त्यांचे कार्य हे व्यवथित समजावुन सांगण्यास मदत होते.

हवमान दर्शक यंत्राची माहीती समजावुन सांगतांना हे यंत्र बसवण्यामागील ऊद्देश समजावुन सांगण्यात आला .

आपल्या परिसरातील हवामानाची  माहीती गावातील लोकांना सहजरीत्या उपलब्ध व्हावी.

वातावरणामध्ये होणा-या बदलामुळे शेतीचे व शेतीनिगडीत व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. तरी ते होऊन न देण्यासाठी आपन गावांतील लोकांना हवामानात होणा-या बदलाची गावात वेळोवेळी माहीती सांगीतल्यावर ते होणारे नुकसान टाळु शकतात.

आपल्यागावात बसवण्यात आलेल्या हवामान यंत्रापासुण मिळालेल्या मागील वर्षाचा माहीतीचा आंदाज घेऊन पुढिल वर्षाच्या  पीकाचे नियोजन करणे शेतक-याना सोयीसकर ठरेल.

गावात हवामानयंत्र बसवल्यामुळे गावांतील लोकांना आपल्यापरीसरात असलेल्या वातावरणाची अचुक रीत्या माहीती मिळु शकते जसे की तापमान, आद्रता, पाऊस, वा-याचा वेग, वा-याची दीशा, हवेचा दाब, या सारख्या घटकांची माहीती त्वरीत मीळु शकते.

एक हवामान यंत्र हे आपल्यापरीसरातील किमान पाच कीलो मीटरची माहीती योग्य अशा प्रकारे आपणास देऊ शकते.

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये  शेतक-यांना यंत्रापासुन मिळणारी माहीती सांगण्यात आली. त्यामध्ये की तापमान, आद्रता, पाऊस, वा-याचा वेग, वा-याची दीशा, हवेचा दाब, या सारख्या घटकांची माहीती त्वरीत मीळु शकते.  आणी शेतीपुरक माहीती उपलब्ध होऊ शकते.

SMS- सेवा – शेतक-यांना हवामानाची माहीती देण्यासाठी WOTR संस्थेने प्रकल्पातील शेतक-याचे मोबाईल नंबर घेतले असुन त्यावर त्यांना रोजच्या रोज मोफत हवामानाची माहीती पाठवली जाणार आहे त्यामुळे शेतक-याना रोजच्या हवामानातील बदलाची माहीती होऊन त्यांना त्या विषयाची पुर्ण माहीती मिळु शकते. व शेतक-याला हा SMS मीळाल्यानंतर आपल्या शेतात असलेल्या पिकावर कोणती उपाययोजना करायची हे त्याला प्राप्त झाल्यानंतर SMS वरून त्याला समजण्यास मदत होईल.

कृषी सल्ला

कृषी सल्ला - हवामान दर्शक यंत्राच्या नोंदणी वरून घेतलेल्या माहितीच्या आधारे घेऊन त्यांना त्या सप्ताहाचा पिकाचे नियोजन व पिकासाठी उपयुक्त असा कृषी विषयक सल्ला आपणा शेतकरयाना प्रकल्पाच्या नधीतून गावामध्ये वाटर  संस्थे मार्फत दिला जात आहे .त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती नियोजनासाठी , पिकासंबधी अडचणी या वर मात करण्यासाठी उपयोगी ठरत आहे

माहितीदाता - गणेश काकडे

 

3.04827586207
gaurav Feb 15, 2017 05:11 PM

शेती विषय महिती

Prithviraj Gaikwad Feb 20, 2016 06:17 PM

Toलांडे,
२०१३ मध्ये weatherस्टेशन केळीकोतूळ मध्ये installकेले आहे

राहुल संपत लांडे Feb 19, 2016 01:21 PM

केळी कोतुळ हवामान दर्शक यंत्र किती साली बसविण्यात आले

पृथ्वीराज गायकवाड Dec 04, 2014 04:32 PM

वरील गावात बसविलेले हवामान यंत्र महागडे असते. त्याचा खर्च ३.५-४.५ लाखापर्यंत असतो. या यंत्रातून भारतीय हवामान शास्त्र विभाग, पुणे येथे पाठविला जातो. नंतर या विभागातून पुढील ३ दिवसांचा हवामानाचा विस्तृत अंदाज संबंधित संस्थेला पाठविला जातो. नंतर संबंधित संस्था हि माहिती शेतकऱ्यांना पुरविते. आपण जर वरील गावाच्या किमान पाच कीलो मीटरच्या परिक्षेत्रात येत असाल तर वॉटर संस्थेमार्फत हि माहिती पुरविली जाते. संपर्क: हरिभाऊ नागरे, ९८२२६१७२४२.

खोसकर लक्ष्मण परशराम Nov 23, 2014 09:37 AM

शेती विषय महिती

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:47:2.451507 GMT+0530

T24 2019/10/15 00:47:2.457398 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:47:2.058605 GMT+0530

T612019/10/15 00:47:2.076545 GMT+0530

T622019/10/15 00:47:2.143170 GMT+0530

T632019/10/15 00:47:2.145445 GMT+0530