Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:38:48.092282 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / एल निनो आणि ला निना
शेअर करा

T3 2019/10/15 00:38:48.096949 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:38:48.122109 GMT+0530

एल निनो आणि ला निना

हवामानबदलास कारणीभूत ठरणारे एल निनो आणि ला निना या विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

 

 

 

ख्रिसमसच्या दरम्यान दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास एल निनो म्हणतात. एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानबदलाला कारणीभूत ठरतेय. ही क्रिया अधूनमधून अचानकपणे घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो.
उष्ण कटिबंधातील प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याच्या तापमानातील फरक, की ज्यामुळे एल निनो अगर ला निना हे परिणाम प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंधातील पश्चिम भागावर स्पष्टपणे होत असल्याचे दिसून आले आहे.

एल निनोचा प्रभाव

विकसनशील देश हे शेती आणि मासेमारी यावर अवलंबून आहेत. ज्या देशांच्या सीमा प्रशांत महासागराला जोडलेल्या आहेत, तेथे हा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या दरम्यान दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यालगतच्या प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान अधूनमधून वाढते. त्यामुळे एल निनोचा प्रभाव दिसून येतो.
सन १९५० ते २०१२ या ६२ वर्षे कालावधीतील पहिल्या अर्ध्या भागातील अभ्यासावरून त्या काळात एल निनो या घटकाचा प्रभाव नव्हता, असेच दिसून आले आहे. मात्र वरील काळातील उत्तरार्धातील ३१ वर्षांत हे एल निनोचे परिणाम सात वेळा दिसून आले. या उत्तरार्धातील ३१ वर्षांपैकी अखेरच्या १५ वर्षांत म्हणजेच गेल्या १५ ते १७ वर्षांत तीन वेळा एल निनोचे अतिशय प्रभावी परिणाम जगभर जाणवले. त्यामुळे मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला.

एल निनो इपिसोड

पूर्व मध्य उष्ण कटिबंधातील प्रशांत महासागराचे सरासरीने ०.५ अंश सेल्सिअसने तापमान वाढणे एल निनोच्या काळात दिसून आले आहे. अशा प्रकारचे प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान वाढण्याचे प्रकार २ ते ७ वर्षे अंतराने दिसून येत आहेत. प्रशांत महासागराच्या पाण्याचे अशा प्रकारे तापमान वाढण्याचा कालावधी ७ ते ९ महिन्यांचा असू शकतो. त्यास एल निनो असे संबोधले जाते. यापेक्षा कालावधीत वाढ झाल्यास त्यास ‘एल निनो इपिसोड` असे संबोधले जाते.
अशा वेळी लागोपाठ दुष्काळी वर्षे येणे क्रमप्राप्त ठरते. हे सर्व नैसर्गिक बदल आहेत. त्यास शास्त्रीय आधार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेच्या प्रशांत महासागरच्या किनारपट्टीलगतचे पाण्याचे तापमान थंड असणे; त्यामुळे एल निनो परिणाम जाणवतात आणि प्रशांत महासागराचे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्‍यालगतच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान बराच काळ थंड राहण्याने, यास एल निनो एपिसोड असे संबोधले जाते.

सन २०१४ मधील एल निनो

१) एल निनोचा प्रभाव तपासताना प्रशांत महासागराचे विषुववृत्तावरील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सतत तीन महिने ०.५ अंश सेल्सिअसने ते ०.९ सेल्सिअसपर्यंत वाढल्यासच एल निनोचा प्रभाव दिसून येतो.
२) सध्याचे प्रशांत महासागराच्या अंतर्गत पाण्याचे तापमान विचारात घेऊन ते पृष्ठभागावर प्रभावीत झाल्यास या वर्षीचा एल निनोचा प्रभाव अधिक असणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
३) सध्याचे महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सन १९९८ प्रमाणे आहे. जगात सन १९९८ हे वर्ष अलीकडील काळात सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंदले गेले आहे. हवामानातील बदल या वर्षी मोठ्या प्रमाणात घडतील, असे अमेरिकन तज्ज्ञांचे मत असून, सन २०१४-१५ वर्ष हे भविष्यकाळ चिंताजनक असल्याचे सांगत आहेत.
४) या वर्षीचा एल निनो अतिशय प्रभावी असेल असे जगभरातील हवामानतज्ज्ञांचे मत आहे. काही तज्ज्ञांच्या मते उष्ण पाण्याचे प्रवाह पूर्व दिशेने प्रशांत महासागरात नोव्हेंबर महिन्यापासून वाहत आहेत आणि हा परिणाम पुढे नऊ महिने टिकेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम कॅलिफोर्नियामध्ये अतिवृष्टी होण्यात होईल. त्याचप्रमाणे अरिझोना राज्यातही अतिवृष्टी आणि थंडीचा प्रभाव दिसेल. तसेच ऑस्ट्रेलिया आणि मध्य आणि अमेरिकेत दुष्काळी स्थिती असेल.
५) सन १९५७-५८ १९६५-६६, १९७२-७३, १९८२-८३, १९८७-८८, १९८७-८८, १९९७-९८ ही एल निनो प्रभावी असणारी वर्षे होती.

एल निनोची लक्षणे

१) हिंदी महासागराच्या पाण्याचा पृष्ठभाग, तसेच इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियावरील हवेच्या दाबात वाढ होते.
२) ताहिती, मध्य पूर्व प्रशांत महासागराच्या भागावरील हवेचा दाब कमी होणे.
३) दक्षिण प्रशांत महासागराच्या भागातील ‘ट्रेड विन्डस्‘ म्हणजेच विषुववृत्तीय भागातून वाहणारे वारे कमकुवत असणे आणि त्यांची दिशा पूर्वेकडे असणे.
४) पेरू देशाच्या जवळ गरम हवा वर जाते; त्याचा परिणाम उत्तरेकडील पेरुव्हियन दुष्काळी भागात पाऊस होणे.
५) पश्चिम प्रशांत महासागरातील आणि हिंदी महासागरातील उष्ण पाण्याचे प्रवाह पूर्व प्रशांत महासागराकडे पसरतात. त्याचा परिणाम पश्चिम प्रशांत महासागराजवळच्या भागात दुष्काळ आणि कोरड्या पूर्व प्रशांत महासागराच्या भागात पाऊस असा होतो.
६) पूर्वेकडील उष्ण कटिबंधावरील आणि पश्चिम प्रशांत महासागराच्या पाण्यावरील हवेच्या दाबामधील फरकाने वाऱ्‍यांच्या दिशेत होणाऱ्‍या बदलाचा परिणाम यालाच ‘एल निनो’ असे म्हटले जाते. त्याची ताकद ‘सदर्न ऑसिलेशन इंडेक्स’द्वारा मोजली जाते. पृष्ठभागावरील हवेच्या दाबातील फरक हा ताहिती आणि डार्विन ऑस्ट्रेलिया यामधील मोजला जातो.
७) जेव्हा सरासरीपेक्षा कमी हवेचा दाब ताहिती येथे असतो आणि डार्विन येथे सरासरीपेक्षा अधिक हवेचा दाब असतो, त्याच्या प्रमाणावर एल निनोचा एपिसोड ठरवता येतो. येथील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. तेथील भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. तर जेथील पृष्ठभागाचे तापमान कमी होते, तेथे हवेचा दाब वाढतो.
८) उष्ण कटिबंधातील पूर्व मध्य प्रशांत महासागरात सातत्याने पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याने सातत्याने ‘एल निनो’साठी प्रभावी वातावरणनिर्मिती होते. त्यातूनच प्रशांत महासागराकडून वाहणाऱ्‍या वाऱ्‍याचा वेग कमी होतो. त्याचाच परिणाम पूर्वेकडील उत्तर भागातील ऑस्ट्रेलियामध्ये पाऊस होतो. प्रामुख्याने भारत, स्वीडन, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान या देशांवर परिणाम होतो.

एल निनोचे भारतावर होणारे परिणाम

१) सन १९९७-९८ मधील तुलना करता, भारतात सन १९९७-९८ मध्ये दुष्काळ नव्हता. भारतीय हवामान विभागाने या वर्षी एल निनोचे परिणाम ६० टक्के दिसतील, सर्वसाधारण मॉन्सून पावसापेक्षा कमी पाऊस होईल आणि तो सरासरीच्या ९५ टक्के असेल, असे भाकीत वर्तवले आहे. त्याचा परिणाम ऊस, कापूस, तेलबिया आणि भात पिकावर प्रामुख्याने जाणवेल. २) भारतात सन २००२ मध्ये मध्यम प्रभावी एल निनो दिसून आला, सन २००४ मध्ये प्रभावी एल निनोमुळे भारतात १२ टक्के सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. सन २००९ मध्ये प्रभावी ‘एल निनो’मुळे सरासरीपेक्षा २१ टक्के पाऊस कमी झाला. सन २०१२ मध्ये प्रभावी एल निनोमुळे सरासरीच्या आठ टक्के पाऊस कमी झाला. <३) महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा यावरून अंदाज येत असून, प्रामुख्याने तो जून आणि जुलै महिन्यात जाणवेल, असेच या माहितीवरून लक्षात येते. ४) नोव्हेंबर महिन्यात प्रशांत महासागराचे विषुववृत्ताजवळच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असल्याचे दिसून येते. जुलै महिन्यात त्यास नऊ महिने पूर्ण होत आहेत. त्यानुसार विचार केल्यास जून आणि जुलै महिन्यांत मॉन्सून कमी राहणे स्वाभाविक आहे. ५) जून-जलै महिन्यांत पावसातील मोठे खंड जाणवणे शक्य आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे साठे जुलैअखेर पुरतील, अशा प्रकारे पाणीवापराचे नियोजन करा ६) भातांच्या रोपवाटिका दोन टप्प्यांत अथवा तीन टप्प्यांत करून किंवा वेळ पडल्यास भाताची रोपे दापोग पद्धतीने तयार करण्याची तयारी ठेवावी. काही भागांत दुबार पेरणी करावी लागेल. त्यासाठी बियाण्याची तरतूद अधिक करणे गरजेचे आहे. तसेच कपाशी पिकाखालील क्षेत्र कमी ठेवावे.
७) प्रत्यक्ष आपल्या २५ मे या दिवशीच्या हवामान अंदाजात केव्हा आणि कोठे प्रभाव राहील ते स्पष्ट होईल.

एल निनो

जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते आणि प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमीकडून पूर्व दिशेस वारे वाहतात आणि ढग जमलेली पाण्याची वाफ तिकडे वाहून नेतात. तेव्हा पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती, अशा प्रकारे एल निनोचा परिणाम दिसतो.

ला निना

जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ला निना असे संबोधले जाते.

ख्रिसमसच्या दरम्यान दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास एल निनो म्हणतात. एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानबदलाला कारणीभूत ठरतेय. ही क्रिया अधूनमधून अचानकपणे घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो.
उष्ण कटिबंधातील प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याच्या तापमानातील फरक, की ज्यामुळे एल निनो अगर ला निना हे परिणाम प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंधातील पश्चिम भागावर स्पष्टपणे होत असल्याचे दिसून आले आहे.

 

स्त्रोत : अग्रोवन

2.94117647059
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
सौरभ Aug 28, 2017 10:25 AM

मान्सून वर परिणाम करणाऱ्या इतर जागतिक घटकांबाबत माहिती
समाविष्ट करावी

vipul Jun 02, 2017 10:25 AM

महत्वपूर्ण माहिती आहे आमच्या स्पर्धा परीक्षा च्या विध्यार्थ्यांसाठी

महेश प्रभाकर चौधरी Nov 15, 2015 11:41 AM

आपण दिलेली एल निनो ची महीती महत्व पुर्ण वाटली

शंकर बुळे Apr 20, 2015 08:29 PM

एल निनो-ला निना या संकटाची सुरुवात कधी पासुन झाली .

gajanan sharlawar at post chanakha taluka kelapur dist yavatmal mob 8888456419 Jul 10, 2014 07:47 PM

PLZ या वर उपाय शोधावे..

turakane V.B. Jul 04, 2014 02:15 PM

अल निनो चा प्रभाव कमी कार्नेकारिता संशोधन होणे गरजेचे आहे . वरील माहिती मोलाची आहे .

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:38:48.402022 GMT+0530

T24 2019/10/15 00:38:48.408055 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:38:47.999341 GMT+0530

T612019/10/15 00:38:48.017313 GMT+0530

T622019/10/15 00:38:48.081716 GMT+0530

T632019/10/15 00:38:48.082618 GMT+0530