Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:38:13.316348 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / हवामानावर आधारित पिकपद्धती व तंत्रज्ञान
शेअर करा

T3 2019/05/26 00:38:13.320760 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:38:13.345904 GMT+0530

हवामानावर आधारित पिकपद्धती व तंत्रज्ञान

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ०.५ अंश से.ग्रे. ने तापमान वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. जागतिक तापमान वाढीमुळे हवामान बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ०.५ अंश से.ग्रे. ने तापमान वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. जागतिक तापमान वाढीमुळे हवामान बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जागतिक तापमान वाढ व हवामान बदल

अमेरिकेतील हवामान शास्त्रज्ञ अलगोर आणि भारतीय हवामान शास्त्रज्ञ पचोरी यांनी हा विषय सर्व जगासमोर प्रथम मांडला. त्यांनी जागतिक तापमान वाढीची कारणे काय असावीत याचाही शोध घेतला, तेव्हा पृथ्वीवरील जंगलक्षेत्र मोठया प्रमाणात कमी झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आशिया खंडातील जवळपास ६० दशलक्ष हेक्टर, आफ्रिका खंडातील ५५ दशलक्ष हेक्टर तर लॅटिन अमेरिकेतील ८५ दशलक्ष हेक्टर जंगल क्षेत्र कमी झाल्याने त्यांनी निदर्शनास आणले. दुसरी बाजू वाढत जात असल्याने मोठया प्रमाणात हवेत कार्बन डायऑक्साईड वायू मिसळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. हवेत २१ टक्के ऑक्सीजन आणि ७८ टक्के नायट्रोजन वायूंचे प्रमाण असे एकत्रित ९९ टक्के या दोन वायूंचेच प्रमाण आहे. कार्बनडायऑक्साईडचे हवेतील प्रमाण केवळ o.o३ टक्के इतपत असताना ते o.o४ टक्के होताच कार्बडायऑक्साईड सूर्याची उष्णता ऊर्जा धरून ठेवून तापमानवाढीस कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले. या वायुबरोबरच विमानांच्या संख्येत होत असलेली वाढ हे फ्लोरोक्लोरो कार्बनचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात आले. या शिवाय हवेत जनावरांच्या रवंथ करण्यामधून बाहेर पडणारा मिथेन वायु आणि शेतीत तसेच भातशेतीतून खतांच्या वापरातून बाहेर पडणारा नायट्रस ऑक्साईड वायु, हवेत सुर्याच्या प्रकाशापासून मिळणारी ऊर्जा उष्णता साठवत असल्याने हवेच्या वातावरणाचे तापमान वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

जेव्हा पृथ्वी भोवतीच्या वातावरणाचे आणि हवेचे तापमान वाढते तेव्हा तेथील हवेचे दाब कमी होतात आणि वारे त्या भागावर मोठया प्रमाणात बाष्प वाहून आणतात, त्यामधून ढग निर्मिती होते आणि अशा कमी हवेच्या दाबाच्या पट्टयात अतिवृष्टी होते तर दुस-या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.

अशा प्रकारच्या हवामान बदलाने काही भागात ढगफुटी, अतिवृष्टी, महापूर तर दुस-या भागात दुष्काळ पिण्याचे पाण्याचे पृष्ठ, जनावरांचा चारा आणि पाणी प्रश्न तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीस कमी पाणी पुरवठा आणि त्याचा होणारा धान्य आणि शेती उत्पादनावरील अनिष्ट परिणाम या सर्व परिस्थितीचा सामना करणे भाग पडत आहे. या शिवाय काही भागावरील हवेचे तापमान घसरणे आणि त्यातून गारपीट होणे अशाही समस्या शेती क्षेत्रात निर्माण होऊ लागल्या. चक्रिय वादळांचे प्रमाण वाढून राहणीमानावर आणि शेती उत्पादनावर परिणाम होत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. त्यातूनच काही देशामधील गहू, भात व भरडधान्याचे

उत्पादन घटणार तर काही देशात ते काही वर्षी वाढणार अशी परिस्थिती स्पष्ट होऊ लागली. हवामान बदलाच्या समस्येने शेती क्षेत्र पुर्णत: ग्रासले. अत्रसुरक्षा धोक्यात येऊ लागली. जागतिक स्थरावर मोठया परिषदा २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू झाल्या. सन २०१५ च्या अखेरीस १९५ देशांचे पंतप्रधान पॅरिसमध्ये डिसेंबर २o१५ च्या शेवटच्या आठवडयात जागतिक परिषदेसाठी एकत्र आले आणि सर्व देशांनी मिळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर व वृक्ष लागवडीवर भर देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. पृथ्वीवरील जंगलातील वृक्ष हवेतील कार्बनडायआक्साईड मोठया प्रमाणात शोषण करून आपल्या फांद्यात व खोडात मोठ्या प्रमाणात साठवत होते. संपुर्ण जंगल आणि नैसर्गिक संपत्ती मानवाने नष्ट केली. आता सध्या अत्यंत विरळ जंगल अस्तिवात असून तेही काही वर्षात नष्ट झाल्यास हवामानबदलाचा वेग वाढेल आणि नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्याची वेळ मानवावर येईल. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजानी वृक्ष वल्ली आम्हा सोयरीअसा उपदेश आम्हास केला. मात्र मानवाने सोयरेच नष्ट केल्याने आता हवामानबदलाशी सामना करण्याची वेळ मानवावर आली. उत्तरध्रुवावरील बफांचे आच्छादन वितळू लागले असून नद्यांना महापूर येऊन पाणी समुद्रात मिसळत आहे. समुद्राची पाण्याची पातळी वाढत असून समुद्राकाठच्या वस्त्यामध्ये पाणी पाणी वाढत आहे. या वर्षी महाराष्ट्राच्या कोकणपट्टीलगतच्या समुद्रकिनारी पाण्याची पातळी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हवेतील ओझोनचा थर कमी होत असून त्यास काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे सुर्याचे निलकिरण मानवी शरीरावर परिणाम करतील आणि कातडीचे आजार वाढतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शिवाय डॅन्यु, चिकनगुनिया, स्वाईनफ्ल्यू या रोगाचे प्रमाण वाढत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. हवेच्या प्रदुषणामुळे मानवी शरीराला धोका निर्माण झाला आहे.

एलनिनोचा परिणाम

सन १९९८, सन २003, सन २oo९, सन २0१२ व सन २0१५ या वर्षात एलनिनोच्या परिणामाने दक्षिण आशियात, भारतात व महाराष्ट्रात दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. एलनिनो म्हणजे अमेरिकेचे पुर्वकिना-यालगतचे विषववृतीय भागातील प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याने त्यावरील हवा विरळ होऊन तेथील हवेच्या कमीदाबाचे क्षेत्र तयार होऊन हिंदीमहासागरावरील बाष्प वारे तिकडे वाहून नेतात आणि भारतात दुष्काळी अथवा भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. सन २०१५ सालच्या जुलै महिन्यापासून यावर्षीच्या म्हणजे सन २०१६ च्या जून महिन्यापर्यंत हा प्रभाव कमीअधिक प्रमाणात सातत्याने जाणवल्याने सन २०१५ मध्ये महाराष्ट्राला भिषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. सन २oo३, सन २०१२ व सन २०१५ मध्ये

महाराष्ट्र शासनाला जनावरांसाठी छावण्या उभाराव्या लागल्या. पाणी आणि चारा जनावरांना द्यावा लागला. लातूर शहराला सांगली- मिरज येथून रेल्वेवेंगनने पाणीपुरवठा करावा लागला. लोक शेती सोडून शहराकडे वळले. शेती व जनावरे सांभाळणे अवघड झाले. शहरे फुगु लागली तर खेडी ओस पडू लागली. खेडयातील राहणीमान आणि जनजिवन विस्कळीत झाले असून अशाच समस्या यापुढे येत राहिल्यास शेती करणारे शेतकरी शहराकडे धाव घेऊन आसरा शोधू लागतील आणि शेती अडचणीत येईल. शेतक-यांच्या आत्महत्येस अनेक कारणे असतीलही तरीपण प्रमुख कारणे हवामानबदल, एलनिनोचा परिणाम आणि मार्केट हीच असावीत, अशा निष्कर्षापर्यंत पोहचण्याइतपत त्यात तथ्य आहे, हे निश्चित.

हवामान बदलाचे मान्सून पावसावर परिणाम

मान्सून पावसाच्या आगमनावर, मान्सून पावसाच्या वितरणावर, पावसात पडणा-या खंडावर व खंडाच्या कालावधीवर तसेच एकूण सरासरी पावसावर हवामान बदलाचे मोठे परिणाम झाल्याचे दिसून येते. गेल्या ५ वर्षातील मान्सून आगमनाच्या आणि परतीच्या तारखा तसेच पावसात पडणा-या खंडाची संख्या आणि कालावधी लक्षात घेतल्यास खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम अडचणीत सापडल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्याच्या पीक पध्दतीवर मोठा परिणाम झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे पीक पध्दतीत बदल करणे तसेच तंत्रज्ञानात बदल गरजेचा वाटू लागला असून तो न केल्यास शेती तोट्यात जात आहे, असे शेतकरी वर्गाचे आणि शेतीविषयक अभ्यास करणा-या तज्ज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रातील सर्वच पिकांची उत्पादकता घसरत आहे. शेती उत्पादनात अस्थिरता आली आहे. सरासरी उत्पादन घटत आहे. आपत्कालीन पीक पध्दतीची गरज सातत्याने वाढत आहे. दुबार पीक पेरणीची वेळ खरीप हंगामात नित्याने कोणत्या ना कोणत्या महाराष्ट्रातील भागात आवश्यक बनत असून शेती व्यवसायात तोटा येणे नित्याचे झाले आहे. पावसावरची शेती बेभरोशाची झाली असून शेतक-यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे. एक मोठा प्रश्न बनला आहे. पाण्याशिवाय तंत्रज्ञान, सुधारित जाती, खते आणि व्यवस्थापन तोकडे पडत आहे. बागायत क्षेत्रावरही परिणाम झाला असून सन २०१५ साली धरणेही पुर्ण न भरल्याने कॅनॉलमधुन अपुरा पाणीपुरवठा करणे भाग पडल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिके पाण्याअभावी वाया गेल्याचे सर्वत्र चित्र दिसत होते.

हवामानबदलाचे महाराष्ट्राच्या शेतीवरील परिणाम

  1. सन २000, २00१, २00२ आणि सन २003 मध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. सन २oo३ मध्ये महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील ११४ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. जनावरांच्या छावण्या उभारून शासनाने चारा व पाण्याची व्यवस्था केली होती. ऊस पिकावर लोकरी मावा व किढीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता घटली. विशेषतः कापूस पिकाची उत्पादकता घटली.
  2. सन २००४, २oo८ आणि २oo९ मध्ये जून आणि जुलै महिन्यात पावसात मोठे खंड पडले. कडधान्य उत्पादनावर विपरित परिणाम झाला. कापूस पिकाची उत्पादकता घटली.
  3. सन २00५, २00६, २oo७ व २०१३ मध्ये अतिवृष्टी झाली. शेतावरील पिके आणि मातीचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साठले. खरीप पिकांवर विपरित परिणाम झाल्यामुळे खरिपातील पिकांच्या उत्पादनावर व उत्पादकतेवर विपरित परिणाम झाला.
  4. सन २oo८, २oo९, २o११ व २०१४ मध्ये ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवेळी आणि अवकाळी पाऊस झाला. कोकणातील भात पिकांच्या काढणीवर विपरित परिणाम झाला. द्राक्षपिकाचे मोठे नुकसान झाले तसेच भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. प्रामुख्याने डाळिंब पिकास तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन महाराष्ट्रातील डाळिंब पिकाच्या बागांचे प्रचंड फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यातील अवेळी पावसाने हळदीच्या पिकांचेही नुकसान झाले.
  5. सन २०११ मध्ये ७ जानेवारी रोजी अहमदनगर येथे १.६ अंश सें.ग्रे. इतके कमी तापमान नोंदले गेले. तसेच कमी तापमान नाशिक येथेही नोंदले गेले. त्याचा विपरित परिणाम सर्वच पिकांवर झाला. विशेषत: द्राक्ष पिकावर अधिक परिणाम झाला. अतिथंडीने काही पिके नष्ट झाली.
  6. सन २०१५ मध्येही थंड वा-यामुळे मराठवाड्यातील केळी पिकाचे फार मोठे नुकसान झाले. अचानक तापमान घसरल्यास पिकांवर विपरित परिणाम होती. ८ अंश सें.ग्रे. पेक्षा तापमान खाली घसरल्यास प्रयत्न सुरू होतो. अतिथंड तापमानाचा कालावधी कमी असला तरी ब-याच वनस्पती ते सहन न करू शकल्याने मृत पावतात. ज्वारी व सुर्यफूल ही पिके अशावेळी थंडीचे बळी ठरली.
  7. सन २०१४ मध्ये फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात व सन २०१५ मध्ये मार्च, एप्रिल व मे महिन्यात मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात विस्तृत स्वरुपात गारपीट झाली. विदर्भातील आणि मराठवाडयातील गारपीटीच्यावेळी गारांचा आकार मोठा होता. त्यात म्हशी आणि इतर जनावरे व पक्षी मृत पावले. द्राक्ष, केळी, पपई, पेरू, फळभाज्या व ज्वारी पिकाचे प्रचंड नुकसान झाले.गहू व हरभरा पिकांचेही मोठे नुकसान झाले.
  8. महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टा विस्तारतोय : सन १९७२ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्याची मर्यादा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एक-दोन जिल्ह्यापुरती मर्यादित होती. त्यावेळी १० ते १२ जिल्ह्यातील ८४ तालुक्यापुरताच दुष्काळी पट्टा होता, तो सन २०१२ च्या दुष्काळात प्रचंड विस्तारला आणि १८ जिल्हे आणि १२३ तालुके प्रचंड दुष्काळाच्या खाईत सापडले. शासनाला चारा छावण्या उभारव्या लागल्या. सन २०१५ च्या दुष्काळामध्ये दुष्काळी पट्टा आणखी विस्तारला. महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यातील १३५ तालुके दुष्काळी परिस्थितीचा सामना करू लागले. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले कारण धरणातील पाणीसाठा अत्यंत अपुरा पडला. विहिरी व बोअरवेलचे पाणी आटले. कॅनॉलच्या पाण्याला मर्यादा आली तसेच उभे पिके वाळून गेली.

हवामानवर आधारित पीक पध्द्ती

पावसाचे अंदाज लक्षात घेवून पीक पध्ट्रती ठरविणे

भारतीय हवामानशास्त्र दरवर्षी एप्रिल महिन्यात लांब पल्ल्याचा हवामान अंदाज वर्तवते. तर साबळे मॉडेलनुसार २५ मे रोजी लांब पल्ल्याचा  स्थानिक स्वरुपाचा अंद्रज दिला जातो. त्यानुसार त्या भागात सरासरीपेक्षा  पाऊस कमी होईल  असा अंदाज दिला जातो.  त्यानुसार त्या भागात सरासरी पाऊस कमी  कालावधीची व कमी पाण्यावर येणा-या पिकांची निवड करावी. त्यात भुईमुग, सोयाबीन , घेवडा ,मुग , मटकी , उडीद , धने तसेच कमी कलावधींचं तुरींचं वाण,बाजरी , ज्वारी ,सुर्यफुल , मिरची इत्यादी पिकांच्या निवडीस प्रचंड वाव आहे. या शिवाय भाजीपाला पिकांपैकी कांदा तर बागायत क्षेत्रात भाजीपाला लागवडीस प्रचंड वाव आहे.रब्बी हंगामात रब्बी ज्वारी आणि हरभरा लागवडीसाठीहि प्रचंड वाव आहे.

पावसाच्या आगमनानुसार पीक पद्धतींची  निवड करणे

जून महिन्यात अथवा जुलै महिन्याच्या १०तारखेपर्यंत पावसाचं अगमन होऊन पेरणी  करावयाची झाल्यास सर्व कडधान्य- घेवडा , मुग , उडीद , चवळी, सोयाबीन, तूर  तसेच  सुर्यफूल, भुईमुग, कांदा धने ,मिरची , भाजीपाला , बाजरी,ज्वारी,मका इत्यादी पिकांना चांगला वाव आहे.

पावसाचे आगमन १५ जुलैपर्यंत झाल्यास पिक पद्धतीची निवड

सोयाबीन ,तूर कडधान्य पिके तसेच एरंडी , सुर्यफुल,धने, मिरची या पिकांबरोबर कांदा व भाजीपाला पिकांचे लागवडीस वाव आहे .

कपाशी पिकाचे क्षेत्र कमी करणे व दुसरी पिके घेणे

कपाशीची महाराष्ट्रातील उत्पादकता हेक्टरी २ क्विंटल पेक्षा कमी आहे. त्यामुळे अपुरे पाऊसमान असणाऱ्या वर्षात उतपादकता हेक्टरी २ क्विंटल पेक्षा कमी आहे. त्यामुळे अपुरे पाऊसमान असणाऱ्या वर्षात उत्पादकता आणखी खाली घसरते. पिक लागवडीनंतर तोटा झाल्याचे ध्यानात येते. मान्सून कालावधी आणि कपाशीचा कालावधी मॅच होत नसल्याने असे घडते . कपाशिखालील  ४० लाख हेक्टर क्षेत्रांपैकी २० लाख हेक्टर क्षेत्रावर तूर,मका,ज्वारी,मिरची,घेवडा,सोयाबीन या पिकांच्या लागवडीस प्रचंड वाव आहे. या शिवाय आणखी अनेक पिके आहेत, त्याचाही विचार होणे गरजेचे आहे.

रुबीरोमेन द्राक्षे व एग ऑफ द सन आंबा लागवड

जगातील किमतीवन फळामध्ये 'रुबीरोमन ' द्राक्ष आणि एग ऑफ द सन आंबा यांचा समावेश असून त्यांना हाय्व्ह्याल्यू फ्रूटकॉप्समधून जगभर ओळखले जाते. रुबिरोमन द्राक्षाची एक किलोची किमत आपल्या देशातील द्राक्षापेक्षा कितीतरी अधिकपटीत आहे. तर एग ऑफ द सन जातीच्या एका आंब्याची किमत १५०० डॉलरपर्यंत आहे. परंतु अद्याप आपल्या देशात या आंब्याची लागवड केली जात नाही .

डाळिंबाना परदेशात मागणी असून त्यासाठी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन

परदेशी बाजारपेठेत डाळिंबाची लागवड सेंद्रिय पद्धतीने करून परदेशी बाजारपेठेत विक्री होणे गरजेचे आहे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

3.03278688525
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:38:13.568163 GMT+0530

T24 2019/05/26 00:38:13.574442 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:38:12.968194 GMT+0530

T612019/05/26 00:38:12.989220 GMT+0530

T622019/05/26 00:38:13.304392 GMT+0530

T632019/05/26 00:38:13.307208 GMT+0530