অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ठिबक सिंचन पद्धती

ठिबक सिंचन पद्धतीत, झाडांना पाणी देताना मुख्‍य लाइनमधून, उप लाइन किंवा पार्श्व लाइनच्या तंत्राने त्याच्या लांबीनुसार उत्सर्जन बिन्‍दुंचा उपयोग करुन पाणी वितरित करतात. प्रत्येक ठिबक/उत्‍सर्जक मोजून-मापून, पाणी, पोषक तत्व आणि अन्‍य वृद्धिसाठी आवश्यक गोष्टींप्रमाणे विधिपूर्वक नियंत्रित एक समान निर्धारित मात्रेत पाणी सरळ झाडाच्या मुळाशी पोहोचवले जाते.

पाणी आणि पोषक तत्व उत्‍सर्जकातून, झाडांच्या मुळाशी पाहोचते आणि गुरुत्वाकर्षण आणि केशिकांच्या संयुक्त बळाच्या माध्यमाने मातीत शोषले जाते. अशाप्रकारे, झाडांतील ओलावा आणि पोषक तत्वांच्या कमतरतेला लगेच पुन:प्राप्‍त करता येते, आणि परत पाण्याची कमतरता झाडाला होणार नाही याची काळजी घेत त्याची गुणवत्ता त्याच्या इष्टतम विकासाची क्षमता आणि उच्च वंशवृद्धीची वाढ करता येते.

मॉडल ठिबकसिंचन प्रणाली डिजाइन

ठिबक सिंचन प्रणालीची आज गरज आहे कारण जल – प्रकृतिचा मानवाला मिळालेला उपहार, नेहमी असीमित आणि फुकट नाही. विश्वातील पाण्याच्या साठ्यात तीव्रतेनं ह्रास होत आहे.

ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे

  • वंशवृद्धित १५० % वाढ.
  • पूर्ण सिंचनाच्या तुलनेत ४०% पाण्याची बचत होते. अशाप्रकारे वाचवलेल्या पाण्याने इतर जमीन सिंचित केली जाऊ शकते.
  • बाग सतत,स्वस्थ वाढते आणि लवकर परिपक्व होते
  • लवकर होणा-या परिपक्वतेमुळे उच्च आणि जलदपणे गुंतवणुकीची परतफेड प्राप्‍त होते
  • खतांचा उपयोग केल्याने क्षमता ३०% वाढते
  • खतं वापरल्याने,आंतर-संवर्धन आणि श्रम कमी होतात
  • खत वापरुन लघु सिंचनपद्धतीचा वापर आणि रसायन उपचार करता येतो.
  • वांझ क्षेत्र,क्षारयुक्त खारट जमीन, रेती आणि डोंगराळ जमीन देखील मशागतीने आणि खतांच्या सहाय्याने उपजाऊ बनवता येते.

स्त्रोत : जैन इरिगेशन्स प्रणाली लि., जळगाव

 

अंतिम सुधारित : 6/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate