অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुरीच्या संवेदनशील अवस्थेत करा एकात्मिक कीड नियंत्रण


सध्या तूर पिकातील हळवे वाण शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. गरवे वाण काही ठिकाणी शाखावृद्धी अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलकळी अवस्थेत आहेत. हीच वेळ पीक संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनक्षम असते. या कालावधीत पीक संरक्षणासाठी खालील एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती फायदेशीर ठरतील.
कामगंध सापळे - 
प्रतिहेक्‍टरी 5 याप्रमाणे वापरून घाटे अळीचे नियंत्रण करावे. 
यासाठी आर्थिक धोक्‍याची पातळी अशी -

  • घाटे अळी (हेलिकोव्हर्पा) - 5-6 पतंग प्रति सापळा सलग 2-3 दिवसांत किंवा 1 अळी प्रति 1-2 झाड किंवा 5-10 टक्के नुकसान झालेल्या शेंगा
  • पिसारी पतंगासाठी - 1 अळी प्रतिझाड
  • शेंगमाशीसाठी - 5 टक्के प्रादुर्भावित शेंगा दिसल्यास फवारणी करण्यास सुरवात करावी.
  • पतंगाच्या नियंत्रणासाठी 60-75 मचाण किंवा पक्षिथांबे प्रतिहेक्‍टरी उभारावेत, त्यामुळे पक्षी त्यावर बसून पिकावरील किडींचा फडशा पाडतील.
  • कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांसाठी फवारणी नियोजन

1) पहिली फवारणी - पीक फुलोऱ्यात असताना 5 टक्के निंबोळी अर्क (25 कि.ग्रॅ. प्रतिहेक्‍टर) अधिक 1 टक्का साबणाच्या पाण्याबरोबर फवारावे. एका हेक्‍टरसाठी 25 किलो निंबोळ्यापासून तयार केलेला अर्क वापरावा. 
2) दुसरी फवारणी - पीक फुलोऱ्यात असताना हेलीओकील (500 एलई) 5 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 
3) तिसरी फवारणी (रासायनिक कीटकनाशके) - पिकास जास्तीत जास्त शेंगा लागल्यानंतर करावी. वरील उपायांनी किडींचे नियंत्रण न झाल्यास ही तिसरी फवारणी खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची करावी. खाली दिलेले कीटकनाशकाचे प्रमाण हे प्रति 10 लिटर पाण्यासाठी आहे. आपल्या क्षेत्राप्रमाणे जेवढे लागेल तेवढे कीटकनाशक वापरावे.
तक्ता - compose/20-11-2014/agr.cs.(1) 
कॉपी आहे.

फवारणीसाठी कीटकनाशके

उपाययोजना व फवारणी वेळ +कीटकनाशक + +पाणी आणि प्रमाण 
+ +1 लि. +10 लि. +500 लि. 
पहिली फवारणी +ऍझाडीरेक्‍टीन 0.03 टक्के +5 मि.लि. +50 मि.लि. +2500 मि.लि. 
पीक फुलकळी अवस्थेत असताना +(300 पीपीएम) + + 
+हेलीओकील 2 टक्के 250 एलई +0.5 मि.लि. +5 मि.लि. +250 मि.लि. 
+पाण्यातील द्रावण + 
दुसरी फवारणी +क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही +2.80 +28 मि.लि. +1400 मि.लि. 
किंवा 
किडीने नुकसान पातळी ओलांडल्यावर+ 
+डायमेथोएट 30 टक्के प्रवाही +2.47 मि.लि. +24 मि.लि. +1235 मि.लि. 
तिसरी फवारणी +इन्डोक्‍झाकार्ब 14.55 टक्के +0.7 मि.लि. +7 मि.लि. +350 मि.लि. 
दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी + 
+ स्पिनोसॅड 45 टक्के प्रवाही किंवा +0.26 मि.लि. +133 मि.लि. 
+फ्ल्युबेंडामाईड 20 टक्के दाणेदार किंवा +0.5 ग्रॅम +5 ग्रॅम +250 ग्रॅम 
ईमामेक्‍टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार किंवा +0.44 ग्रॅम +4.4 ग्रॅम +220 ग्रॅम 
लॅम्डासायलोथ्रीन 5 टक्के प्रवाही किंवा +1.0 मि.लि. +10 मि.लि. +500 मि.लि. 
फ्ल्युबेंडामाईड 48 टक्के प्रवाही किंवा +0.2 मि.लि. +2 मि.लि. +100 मि.लि. 
रॅनाक्‍झीपीर 20 टक्के प्रवाही +0.3 मि.लि. +3 मि.लि. +150 मि.लि.

निंबोळी अर्क तयार करण्याची कृती

  • बाजारामध्ये ऍझाडीरेक्‍टीन 0.03 टक्के तीव्रतेचे तयार द्रावण मिळते; परंतु घरीही निंबोळी अर्क खालीलप्रमाणे बनवता येतो ः
  • पाच किलो वाळलेल्या निंबोळ्या साफ करून घ्याव्यात.
  • फवारणीच्या आदल्या दिवशी निंबोळी कुटून बारीक करून त्या 20 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवाव्यात.
  • सकाळी फडक्‍याने वरील अर्क चांगला गाळून घ्यावा. जास्तीत जास्त अर्क निघेल अशा प्रकारे कपड्याची पुरचुंडी पिळावी .
  • गाळून घेतलेल्या निंबोळी अर्कात पाणी टाकून 100 लिटर द्रावण तयार करावे. हे मिश्रण 5 टक्के तीव्रतेचे होईल.
  • वरील मिश्रणातून अर्धा लिटर मिश्रण वेगळ्या भांड्यात काढून त्यात 200 ग्रॅम साबणचुरा किंवा कपडे धुण्याची पावडर मिसळावी. हे मिश्रण निंबोळी अर्काच्या द्रावणात टाकून ते चांगले ढवळावे. लगेचच प्रादुर्भावित पिकावर फवारावे. हे मिश्रण 20 गुंठ्यांस पुरते.

संपर्क - प्रा. अशोक चव्हाण, 9420639498 
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate